बँक ऑफ बडोदाच्या अकाउंट अ‍ॅग्रीगेटर प्रणालीद्वारे उपलब्ध डिजिटल कर्जे

Bank of Baroda (BoB) Logo

फायनान्शिअल इन्फर्मेशन यूजर म्हणून बँक प्लॅटफॉर्मवर सक्रिय

मुंबई, 11 ऑक्टोबर, 2022 (GPN): भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा द्वारे फायनान्शिअल इन्फर्मेशन यूजर (Financial Information Unit) म्हणून अकाउंट अ‍ॅग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर (Account Aggregator) सक्रिय झाल्याचे आज जाहीर केले. त्याचबरोबर बँकेने या प्लॅटफॉर्ममार्फत डिजिटल कर्जवितरणही उपलब्ध शक्य झाले आहेत. पहिल्या टप्प्यात बँकेने AA परिसंस्थेच्या माध्यमातून आपल्या डिजिटल व्यक्तिगत कर्ज प्रवासाचे एकात्मीकरण केले. बँकेद्वारे देऊ केल्या जाणाऱ्या अन्य डिजिटल कर्ज उत्पादनांचेही आता एकात्मीकरण केले जाणार आहे.

बँक ऑफ बडोदाकडून डिजिटल व्यक्तिगत कर्ज (पर्सनल लोन) घेण्यासाठी अर्ज करणारे आता त्यांचा वित्तीय डेटा तंटामुक्त, डिजिटल व पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने शेअर कळवण्यास संमती देऊ शकतात, यामुळे कर्जावरील प्रक्रिया वेगाने होणार आणि श्रेष्ठ दर्जाचा ग्राहक सेवा देणे शक्य होईल.

बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्रीजॉयदीप दत्ता रॉय यावेळी म्हणाले, “अकाउंट अ‍ॅग्रीगेटरमुळे बँकेला अधिक व्यक्तिनुरूप व आकर्षक अनुभव ग्राहकांना देण्याची संधी मिळते. आम्ही या प्रवासात जसे प्रारंभकर्ते आहोत, तसेच IRDA, SEBI आणि PFRDA यांच्याद्वारे नियमन केले जाणारे अन्य BFSI घटकही लवकरच अकाउंट अॅग्रीगेटर चौकटीत सामावले जातील आणि ग्राहकांना अनन्यसाधारणरित्या व्यक्तिनुरूप उत्पादन लोन देण्याची आमची क्षमतेत आणखी सुधारेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.”

बँक ऑफ बडोदाचे मुख्य डिजिटल अधिकारी श्रीअखिल हांडा म्हणाले, “तंत्रज्ञानाने भारतातील बँकिंगचा चेहराच बदलून टाकला आहे आणि लक्षावधी भारतीयांना कर्जे तसेच गुंतवणुकीचे पर्याय पुरवण्याच्या सध्याच्या चाकोऱ्या मोडून टाकण्याची क्षमता अकाउंट अ‍ॅग्रीगेटर परिसंस्थेत आहे. अकाउंट अ‍ॅग्रीगेटर प्रणालीचे अनेक लाभ आहेत, ग्राहकांना त्यांच्या आर्थिक माहितीवर अधिक नियंत्रण देणे आणि ग्राहकांचा अनुभव

सुधारण्यापासून ते फसवणुकीचे प्रकार टाळणे व देखरेखीची क्षमता वाढवण्यापर्यंत अनेक लाभ यात आहेत. डिजिटल परिसंस्थेला सक्षम करणाऱ्या या लक्षणीय घटकामुळे बँकांची ग्राहकांना नवोन्मेषकारी वित्तीय उत्पादने व सेवा देण्याची क्षमता खूपच वाढली आहे, असे आम्हाला वाटते.”

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, बँक ऑफ बडोदाने अकाउंट अ‍ॅग्रीगेटर प्रणालीचा स्वीकार केला आहे. याद्वारे प्रथम सुरू करण्यात आलेली सेवा म्हणजे फायनान्शिअल इन्फर्मेशन प्रोव्हायडर (FIP) होय. यामध्ये बँकेचे ग्राहक त्यांचे बँकिंगविषयक तपशील अन्य सेवा पुरवठादारांसोबत सहजपणे शेअर करू शकतात. ग्राहकांमधील वाढती जागरूकता व वैविध्यपूर्ण घटकांचा या परिसंस्थेतील समावेश यामुळे ही प्रणाली अधिक दमदार होणार आहे आणि तिचा वापर करणाऱ्यांची संख्याही वाढणार आहे.

अकाउंट अ‍ॅग्रीगेटर प्रणाली व्यक्तींना त्यांचा बँकिंग/वित्तीय डेटा सहजपणे उपलब्ध करून देते तसेच त्यावर अधिक नियंत्रणही देते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वित्तीय घटकांकडील आपली माहिती एकत्रित पद्धतीने शेअर करण्याचा पर्यायही त्यांना उपलब्ध होतो. यामुळे कर्जासाठी अर्ज करताना किंवा अन्य सेवा उपलब्ध करून घेताना वेळ व कष्ट लक्षणीयरित्या वाचतात.

बँक ऑफ बडोदाच्या डिजिटल कर्जवितरण प्लॅटफॉर्ममार्फत डिजिटल पर्सनल लोन घेण्यासाठी बँकेचे आधीपासूनचे व नवीन ग्राहक अर्ज करू शकतात. बॉब वर्ल्ड मोबाइल अ‍ॅप, नेट बँकिंग आणि बँक ऑफ बडोदाची वेबसाइट यांच्या माध्यमातून पूर्णपणे डिजिटल व पेपरलेस पद्धतीने हा अर्ज केला जाऊ शकतो.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदाच्या अकाउंट अ‍ॅग्रीगेटर प्रणालीद्वारे उपलब्ध डिजिटल कर्जे"

Leave a comment

Your email address will not be published.


*