
जागतिक हृदय दिनानिमित्त, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलने बेस्टच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरना सीपीआर प्रशिक्षण देऊन मुंबईच्या बेस्ट “हार्टलाइन”शी संलग्न केले
मुंबई, २८ सप्टेंबर २०२२ (GPN): हृदयविकार हे भारतातील मृत्यूचे मुख्य कारण आहे आणि आपल्या आरोग्यसेवा यंत्रणेवरील एक मोठे ओझे आहे. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने १०० हून अधिक बेस्ट कर्मचाऱ्यांना सीपीआर प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलने बेस्टशी सहयोग केला आहे. बेस्ट ही मुंबईकरांची हृदयवाहिनी असून दररोज सुमारे १९ लाख प्रवासी बेस्टने प्रवास करतात.
या संदर्भात माहिती देताना मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमधील सल्लागार हृदयविकारतज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता म्हणाले, “आपल्या देशात अनेक तरुण हृदयविकाराच्या झटक्याने आयुष्य गमावतात, ही अत्यंत वेदनादायक परिस्थिती आहे आणि कार्डिअॅक अरेस्ट या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जाते. हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये दर वर्षी वाढ होत आहे. भारतीयांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे जनुकीय दृष्ट्या हृदयविकार होण्याची त्यांना अधिक शक्यता आहे आणि पाश्चिमात्य संस्कृती अंगीकारल्यामुळे म्युटेशनमध्ये बदल होतो. त्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. तुमच्यात कोणतीही लक्षणे दिसत नसतील तरी मधुमेह व रक्तदाब, तसेच स्ट्रेस टेस्ट, २डी इको, कोलेस्टरॉल आणि ईसीजी वर्षातून एकदा तपासणे गरजेचे आहे.
बेस्ट मुंबईचे सीएमओ डॉ.अनिलकुमार सिंगल म्हणाले, “कर्मचाऱ्यांमधील हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी बेस्टने स्वस्थ भारत अभियान २०१६ मध्ये सुरू केले. हे कॅम्पेन खूपच परिणामकारक ठरले. कारण गेल्या ७ वर्षांमध्ये अँजिओप्लास्टि, बायपास शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली. कोव्हिडोत्तर परिस्थितीमध्ये सीव्हीडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची काळजी हृदयविकारतज्ज्ञांना आहे. अशा परिस्थितीत आमच्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा हे कॅम्पेन सुरू करत आहोत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात हृदयातील रक्तवाहिनीच्या आजारामुळे वर्षभरात दर तीन मृत्यूंपैकी एक म्हणजेच १७.९ मिलियन मृत्यू होतात आणि प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार केल्याने यापैकी ८६% मृत्यूंना प्रतिबंध करता येऊ शकतो.
Be the first to comment on "जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने जागृती निर्माण करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलने मुंबईची “हृदयवाहिनी” बेस्टसह आरोग्य उपक्रम आयोजित केला"