
वोकहार्ड् हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे कन्सलटंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखिजा, आणी वोकहार्ड् हॉस्पिटलचे कन्सलटंट सायकॅट्रीस्ट डॉ. मलिक मर्चंट
मुंबई, 21 सप्टेंबर 2022 (GPN): वोकहार्ड् हॉस्पिटलच्या वतीने आज मुंबई सेंट्रल शाखेत स्लिप डिसऑर्डर क्लिनिक (झोपेशी संबंधित विकारांचा दवाखाना) लॉन्च करण्यात आले. या माध्यमातून झोपेच्या आरोग्याविषयीच्या समस्या हाताळण्यात येणार आहेत. झोपेच्या एकंदर आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होतात. तरीही झोपेशी संबंधित विकारांकडे बहुतांशी दुर्लक्ष होते किंवा त्यावर पुरेसे उपचार घेतले जात नाहीत. आपल्या आयुष्यातील एक-तृतीयांश वेळ झोपेत जातो, मात्र सामान्य लोकांमध्ये झोपेच्या महत्त्वाविषयी म्हणावी तितकी जागरूकता नाही. या दवाखान्यात स्लिप अपेनिया, इनसोमनिया, हायपरसोमनिया, घोरणे, पॅरासोमनिया इत्यादी झोपेशी संबंधित सर्वच विकार हाताळण्यात येणार आहे. दवाखान्याचे व्यवस्थापन पाहण्यासाठी न्यूरोलॉजिस्ट, सायकलॉजिस्ट, सायकॅस्ट्रीट आणि स्लिप टेक्निशियन इत्यादी तज्ज्ञांची टीम उपलब्ध असेल.
फिलिप्स हेल्थकेअरकडून 2021 दरम्यान आयोजित सर्वेक्षणानुसार, 93% भारतीयांत झोपेचा अभाव दिसून आला, प्रत्येक रात्री 8 तासांहून कमी झोप त्यांना मिळाली. 58% च्या मते पुरेशी झोप न मिळाल्याने कामावर परिणाम होतो, तर 11% व्यक्तिंनी अपुऱ्या झोपेपायी कामकाजातून सुट्टी घेत असल्याचे सांगितले, रात्री पुरेशी झोप न झाल्याने आपण कामाच्या ठिकाणी झोपतो याची कबुली 11% व्यक्तिंनी दिली तर कामकाजाच्या ठिकाणी आपले सहकारी झोपत असल्याची साक्ष 38% लोकांनी दिली. कामाच्या ताणापायी तुटक झोप होत असल्याचा निर्वाळा 15% व्यक्तिंनी दिला तर केवळ 2% लोकांनी अपुऱ्या झोपेविषयी तज्ज्ञ चर्चा केल्याचे स्पष्ट केले.
या लॉन्चविषयी बोलताना वोकहार्ड् हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे कन्सलटंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखिजा म्हणाले, “प्रत्येक प्रौढ व्यक्तिसाठी किमान 7-9 तासांची पुरेशी झोप अनिवार्य असते. झोपेच्या आरोग्याचा विषय अलीकडे अमेरिकन हार्ट असोसिएशनने मेट्रिक ऑफ कार्डीवेसक्यूलर हेल्थ म्हणून समाविष्ट केला आहे. वारंवार झोपेत अल्पकालीन किंवा दीर्घकालीन अडथळे येत असल्यास आरोग्यात गुंतागुंत निर्माण होते. तसेच घोरण्याच्या सर्वसामान्य समस्येविषयी बोलताना, यामुळे केवळ जोडीदाराला त्रास होत नाही तर स्लिप अपेनियासारखा गंभीर आरोग्य विकार उदभवतो. ज्याचे ज्ञान/आकलन, चयापचय आणि हृदय व रक्तवाहिनीसंबंधी आरोग्यावर लक्षणीय दीर्घकालीन नकारात्मक परिणाम दिसून येतात.
वोकहार्ड् हॉस्पिटलचे कन्सलटंट सायकॅट्रीस्ट डॉ. मलिक मर्चंट म्हणाले, “झोपेतील अडथळ्यासाठी काही घटक जबाबदार असतात. आपण आपल्या आयुष्यात एक-तृतीयांश वेळ झोपतो, मात्र सामान्य लोकांमध्ये झोपेच्या महत्त्वाविषयी पुरेशी जागरूकता नसते. झोपेत अडचणी आल्यास शारीरिक आणि भावनिक समस्या निर्माण होतात. पुरेशी झोप न लागल्याने नैराश्य, चिंता, मूड स्विंग, राग, एकटेपणा इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात. झोपेच्या विकाराला ताण हा आणखी एक घटक जबाबदार ठरतो.
अपुऱ्या झोपेपायी वैद्यकीय विकारांना आमंत्रण मिळते आणि आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. भारतात, झोपेशी संबंधित विकारांवर निदान आणि व्यवस्थापनविषयक निश्चित सुविधा दिसून येत नाही. हे लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या बहुआयामी टीमने एकत्र येऊन आपापल्या विषयातील अनुभवाच्या साथीने झोपेशी संबंधित विकरांच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन झोपेच्या आरोग्याशी निगडीत सर्व समस्यांवर व्यापक निराकरण उपलब्ध करून दिले आहे.
Be the first to comment on "वोकहार्ड् हॉस्पिटलच्या वतीने मुंबई सेंट्रल केंद्रात प्रथमच स्लिप डिसऑर्डर क्लिनिक सुरू"