ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एका मोबिलिटीचा गोईगोनेटवर्कसोबत सहयोग

EKA Mobility collaborates with goEgoNetwork for charging infrastructure

गोईगोनेटवर्क हे एकाच्या ९-मीटर बसचे अधिकृत इलेक्ट्रिक चार्जिंग सोल्यूशन पुरवठादार असून ते ३० किलोवॅट, ६० किलोवॅट आणि १२० किलोवॅटची एआरएआय व ओसीपीपी मान्यताप्राप्त स्टेशन्स उभारणार आहेत

मुंबई, २१ सप्टेंबर, २०२२ (GPN): इलेक्ट्रिक वाहने व तंत्रज्ञान कंपनी आणि पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी असलेली ‘एका मोबिलिटी’ या कंपनीतर्फे गोईगोनेटवर्क या भारतातील आघाडीच्या चार्जिंग पायाभूत सुविधा पुरवठादार कंपनीशी सामंजस्य करार करून सहयोग केल्याची घोषणा करण्यात आली. या करारानुसार सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना भक्कम, नियमांना अनुसरून व उत्तम जोडणी असलेल्या ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा व आधुनिक चार्जिंग स्टेशन्स पुरविण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारानुसार, गोईगोनेटवर्क हे एकाच्या ९ मीटर बससाठी अधिकृत चार्जिंग सोल्यूशन पुरवठादार असणार आहेत. त्यांच्यातर्फे देशभरातली संस्थात्मक ग्राहकांसाठी ३० किलोवॅट, ६० किलोवॅट आणि १२० किलोवॅटची एआरएआय व ओसीपीपी मान्यताप्राप्त स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. एका मोबिलिटी अँड पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता, एका मोबिलिटीचे कार्यकारी संचालक डॉ. हिर्देश ठाकूर आणि गोईगोनेटवर्कचे संचालक श्री. ऋषी बागला, गोईगोनेटवर्कचे सहसंस्थापक श्री. सयांतन चक्रवर्ती, श्री. प्रवीण कुमार आणि श्री. धीमन कदम यांच्या सन्माननीय उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

या सहयोगाबद्दल माहिती देताना एका अँड पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता म्हणाले, “भारताचे महत्त्वाकांक्षी नेट-झीरो उत्सर्जन ध्येय साध्यकरण्यासाठी भक्कम, कार्यक्षम व विश्वासार्ह ईव्ही परिसंस्था स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गोईगोनेटवर्क या भारतातील एक आघाडीचे चार्जिंग पायाभूत सुविधा पुरवठादार असलेल्या कंपनीशी आम्ही केलेल्या सहयोगाने भारतभरात आमच्या ९-मीटर ई-बसच्या संस्थात्मक ग्राहकांसाठी फास्ट-चार्जिंग नेटवर्कची खात्री होणार आहे. भारतात ही नवऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांच्या मोठ्या प्रामाणावर स्वीकारार्हता वेगाने साध्य होण्यासाठी शाश्वत, फायदेशीर व कार्यक्षम ईव्ही उपाययोजना आणण्यासाठी आम्ही अत्यंत उत्साहात आहोत. आमच्या ९-मीटर ई-बसचे फास्ट चार्जिंग करण्याची खातरजमा करण्यासाठी गोईगोनेटवर्कशी हातमिळविणी केल्याचा आम्हाला आनंद आहे. सहज उपलब्ध असलेले इलेक्ट्रिक चार्जिंग पायाभूत सुविधा उभारल्याने आपल्या देशात सार्वजनिक वाहतुकीच्या विद्युतीकरणाच्या वेगवान परिवर्तनाला चालना मिळे आणि नेट-झीरो उत्सर्जन ध्येये साध्य करता येतील, अशी आम्हाला खात्री आहे.

या भागीदारीबद्दल गोईगोनेटवर्कचे संचालक श्री. ऋषी बागला म्हणाले, “एका मोबिलिटीसोबत केलेल्या भागीदारीने आम्ही गोईगोनेटवर्कमध्ये प्रचंड उत्साहात आहोत. आमचे ईव्ही चार्जिंग नेटवर्क, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक वाहनतळ, शैक्षणिक संस्था, चार्जिंग पार्क, हॉस्पिटल आणि अशा अनेक ठिकाणी अस्तित्वात आहे. आमची एका मोबिलिटीशी भागीदारी हे आमची चार्जिंग सोल्यूशन्स वैश्विक असल्याचे द्योतक आहे आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या व आकाराच्या ईव्हीसाठी वापरले जाऊ शकते.

जगभरातील शहरांमधील शाश्वत व कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाच्या ९-मीटर इलेक्ट्रिक बस या भक्कम पाया उपलब्ध करून देतात. हे उत्पादन भारतात डिझाइन व उत्पादित केले आहे. त्यांना अलिकडेच सेंट्रल मोटर व्हेइक रुल्स (सीएमव्हीआर) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे आणि पहिली बॅच लवकरच रस्त्यांवर धावताना दिसेल. या बसमध्ये ३१ प्रवासी व चालक यांच्यासाठी आसनक्षमता व उभे राहून प्रवास करण्याची क्षमता असून एका चार्जमध्ये एकाच्या इलेक्ट्रिक बस २०० किमीची रेंज ऑफर करतात.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एका मोबिलिटीचा गोईगोनेटवर्कसोबत सहयोग"

Leave a comment

Your email address will not be published.


*