क्हार्ड हॉस्पिटल ग्रुप साजरा करीत आहे “रुग्ण सुरक्षा सप्ताह- २०२२” १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ ~ कर्मचारी सदस्यांसाठी तीन दिवसांचा उत्साही उपक्रम ~

मुंबई, १५ सप्टेंबर २०२२ (GPN): वोक्हार्ट हॉस्पिटल्स लि. हि भारतातील तीन नंबर ची सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल्सची एक नामांकित शृंखला आहे. ज्याच्या शाखा नागपूर, नाशिक, राजकोट, मुंबई सेंट्रल (दक्षिण मुंबई) आणि मीरा रोड (उत्तर मुंबई) या ठिकाणी आहेत. रुग्णाला उपचारादरम्यान दर्जेदार आरोग्यसेवा देण्याबरोबरच रुग्णाची सुरक्षा देखील तेवढीच  महत्वाची असते. रूग्णांची काळजी आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी नियमित प्रक्रियेला बळकटी देण्याचा उद्देश वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा आहे. WHO ची यावर्षीची थीम आहे, “हानी शिवाय औषोधोपचार”, आणि वोक्हार्ट हॉस्पिटल्स औषोधोपचारा शिवाय अनेक बाबींवर काम करत आहे.

१५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत समूह-व्यापी रुग्ण सुरक्षा सप्ताह कार्यक्रम होणार आहे. याचे उद्घाटन वोक्हार्ट हॉस्पिटल्स लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. झाबिया खोराकीवाला यांनी केले. या उपक्रमावर बोलताना श्रीमती खोराकीवाला म्हणाल्या, “प्रतिबंध हा उपचारांपेक्षा कधीही चांगलाच असतो. जगभरातील आरोग्य सेवेमध्ये असुरक्षित आरोग्य सेवा हे रुग्णाच्या हानीचे प्रमुख कारण आहे जी टाळता येऊ शकते. वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये, आम्ही दर्जेदार सेवा देण्यावर विश्वास ठेवतो.”

तीन दिवस चालणाऱ्या ह्या उपक्रमांमध्ये आमच्या सर्व परिभाषित सुरक्षा प्रोटोकॉलला बळकटी देणारे अनेक परस्परसंवादी कार्यक्रम असतील जसे की औषधोपचार व्यवस्थापनाची सुरक्षा यावर संवाद साधले जातील, अग्निसुरक्षा, जोखीम व्यवस्थापन, सुरक्षा जागरूकता चर्चा, स्पॉट सेफ्टी ऑडिट इ.

याव्यतिरिक्त दररोज कर्मचारी, रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा असेल, घोषवाक्य स्पर्धा, सुरक्षेशी संबंधित समस्यांवरील एक मिनिटाचा व्हिडिओ दाखवण्यात येईल जो कि रुग्णांच्या सुरक्षेसाठी वचनबद्धता मजबूत करेल. या कार्यक्रमांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या समावेश असेल.

वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे ग्रुप क्लिनिकल डायरेक्टर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, डॉ क्लाईव्ह फर्नांडिस यावेळी बोलताना म्हणाले, “वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये आम्ही नेहमीच रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. आमचे सर्व क्लिनिकल आणि ऑपरेशनल प्रोटोकॉल रुग्णांची सुरक्षितता लक्षात घेऊन परिभाषित केले जातात. “वोक्हार्ट हॉस्पिटल्स लाइफ विन्स” येथे हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या सहयोगींमध्ये आमच्या परिभाषित प्रोटोकॉलला बळकटी देण्यासाठी असे जागरूकता कार्यक्रम नियमितपणे आयोजित करत असतो.”

वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे  प्रमुख डॉ. वीरेंद्र चौहान म्हणाले, “आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षितता जागरुकतेशी संबंधित कार्यक्रम आणि प्रशिक्षण सातत्याने घेतो ज्यामुळे रुग्णांची सुरक्षा आणि दर्जेदार काळजी घेतली जाते.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "क्हार्ड हॉस्पिटल ग्रुप साजरा करीत आहे “रुग्ण सुरक्षा सप्ताह- २०२२” १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ ~ कर्मचारी सदस्यांसाठी तीन दिवसांचा उत्साही उपक्रम ~"

Leave a comment

Your email address will not be published.


*