सिट्रोनची नवीन सी ५ एअरक्रॅास एसयूव्ही भारतात लाँच : अधिक आरामदायी, मजबूत आणि अनोख्या डिजाईनने युक्त एसयूव्ही

  • सिट्रोनच्या नवीन सी एअरक्रॉस एसयूव्हीची सुरूवातीची किंमत आहे INR 36,67,000 (एक्सशोरूम दिल्ली
  • ऑनबोर्ड कम्फर्ट बेंचमार्क, नवीन सी एअरक्रॉस एसयूव्ही मध्ये सिट्रोनचा अॅडव्हान्स कम्फर्ट सस्पेंशन, नवीन सिट्रोन अॅडव्हान्स कम्फर्ट सीट्स, प्रशस्त जागा आणि मॉड्यूलरिटी .
  • एक्सटीरियर हायलाइट्सनवीन फ्रंटएंड डिझाइन, मागील बाजूस व्हिज्युअल सिग्नेचर, १८ डायमंडकट अलॉय व्हील्स. इंटिरियर हायलाइट्सन्यू १० टचस्क्रीन आणि सेंटर कन्सोल, गियर शिफ्टर आणि ड्राइव्ह मोड बटणे
  • १९ शहरांमधील २० ला मेसन सिट्रोन फिजिटल शोरूम्स द्वारे विक्री, ज्यात थेट १०० टक्के ऑनलाईन खरेदीद्वारे संपूर्ण भारतातील ९० हून अधिक शहरांमध्ये समर्थित.

मुंबई, सप्टेंबर २०२२ (GPN): सिट्रोन इंडिया ने INR 36,67,000 या सुरूवातीच्या किमतीसह (एक्सशोरूम दिल्ली) नवीन सी एअरक्रॉस एसयूव्ही लाँच करण्याची घोषणा केली आहे. या नवीन सी एअरक्रॉस एसयूव्हीला एक डिझाईन मेकओव्हर दिला गेला आहे, जो तिला अधिक खास, आधुनिक आणि डायनॅमिक स्वरूप देतो. २०२१ मध्ये भारतात पदार्पण झाल्यापासून सी एअरक्रॉस एसयूव्हीला या वर्गातील सर्वात आरामदायी आणि मॉड्यूलर एसयूव्ही मानले जाते

२०२२ च्या नवीन अवतारातील ही कार आता अधिक आकर्षक आणि गतिमान असुन ती उच्च दर्जाच्या रंगानी, प्रशस्तपणाने मजबूत अंतर्गत सामग्रीसह आकर्षक डिजाईनने आणि एसयूव्हीच्या आमरामदायी गुणांनी युक्त आहे

नवीन सिट्रोन C5 एअरक्रॉस एसयूव्हीप्रास्ताविक किंमत (एक्सशोरूम दिल्ली)

Shine (Dual-Tone) INR  36,67,000

नवीन सिट्रोन सी५ एअरक्रॉस एसयूव्ही: कम्फर्ट आणि मॉड्यूलरिटीसाठी एक बेंचमार्क– 

सिट्रोन्स डिएनएच्या कम्फर्टचे फ्लॅगशिप मॉडेल म्हणून, नवीन सी एअरक्रॉस एसयूव्हीच्या वैशिष्ट्यांसोबत या विभागामध्ये वेगळी ठरते, जी वापरास सुलभ असुन एसयूव्हीचा एक दर्जेदार अनुभव देणारी आहे. सिट्रोन मध्ये खास प्रोग्रेसिव्ह हायड्रॉलिक कुशन्स सस्पेन्शन आहेत, ही एसयूव्ही रस्त्यांची अपूर्णता कमी करून प्रवाशांना खऱ्याफ्लाइंग कार्पेटचाअनुभव देते. प्रवासास संपूर्ण आरामदायी बनवते. ही या सेगमेंटमधील एकमेव एसयूव्ही आहे जी तीन इंडिविजुअल स्लाइडिंग, रिक्लिनिंग आणि मागे घेता येण्याजोगे प्रशस्त सीट देते, ज्यामुळे तुम्हाला एसयूव्हीमध्ये चांगल्या मॉड्यूलरिटीचा आनंद घेता येतो. ५८० एल ते १६३० एल बूट व्हॉल्यूम सेगमेंटसाठी हा एक रेकॉर्ड आहे. एकॉस्टिक लॅमिनेटेड फ्रंट विंडो ककुन इफेक्ट पर्यायासारखी आजुन बरीचशी वैशिष्य या कारमध्ये आहेत.

नवीन सिट्रोन सी एअरक्रॉस एसयूव्ही आता नवी दिल्ली, गुडगाव, मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद, कोची, चेन्नई, चंदीगड, जयपूर, लखनऊ भुवनेश्वर, सुरत, नागपूर, विझाग, कालिकत आणि कोईम्बतूर या १९ शहरांमध्ये २० ला मेसन सिट्रोन फिजिटल शोरूममध्ये किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहे

नवीन सिट्रोन सी एसयूव्हीसाठी १०० % थेट ऑनलाइन खरेदी उपलब्ध असेल. डीलर नेटवर्कच्या बाहेरील ग्राहकांसह ९० हून अधिक भारतीय शहरांमधील ग्राहकांना या थेट ऑनलाइन उपक्रमाद्वारे कव्हर केले जाईल जिथे ते थेट कारखान्यातून ऑर्डर करू शकतात

नवीन सी५ च्या वॉरंटी प्रोग्रामचा एक भाग म्हणून,कंपनी ३६ महिने किंवा १०,००० किमी (जे आधी पुर्ण होईल) साठी वाहनाची वॉरंटी देते, स्पेअर पार्ट्स आणि अॅक्सेसरीज साठी वॉरंटी असेल आणि अधिक कम्फर्ट आणि मोबिलिटी साठी २४/ रोडसाइड असिस्टंन्ट असेल. संपूर्ण नेटवर्कवर अॅक्सीडेंट वॉरंटी आणि मेंटेनंस पॅकेजेस देखील उपलब्ध आहेत

दर्जेदार अनुभवासाठी नवीन सी५ ग्राहकांना सिट्रोन फ्युचर श्योर ऑफर देईल हे सर्वसमावेशक पॅकेज ग्राहकांना ……. रु.(अटी आणि नियम लागू) पासून सुरू होणार्या सुलभ मासिक पेमेंटसह सिट्रोनचा मालक बनण्याची संधी देते. पॅकेजमध्ये नियमित देखभाल, अॅक्सिडेंट वॉरंटी, रोडसाईड असिस्टंट आणि पाच वर्षांसाठी ऑनरोड फायनेंसिंग देखील समाविष्ट आहे

रोलँड बूचारा (स्टेलेंटिस इंडिया, सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर) म्हणाले, “सिट्रोन पोर्टफोलिओमधील आमची प्रमुख नवीन सी५ एअरक्रॉस एसयूव्ही लाँच करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि यात सिट्रोन अॅडव्हान्स कम्फर्ट प्रोग्रामच्या सर्व घटकांचा समावेश आहे. सी एअरक्रॉर लाँच झाल्यापासून या श्रेणीतील सर्वात आरामदायी आणि फ्लेक्झीबल एसयूव्ही म्हणून ओळखली जाते, जी आता अधिक प्रतिष्ठित, आधुनिक आणि गतिमान मेकओव्हरने युक्त असुन ही भारतीय ग्राहकांना निश्चीतच आकर्षित करेल.” 

सौरभ वत्स, ब्रँड हेड, सिट्रोन इंडिया म्हणाले, “आरामदायी, ऑनबोर्ड कम्फर्ट आणि मॉड्यूलरिटीची नवीन सी एअरक्रॉस एसयूव्ही अधिक स्पष्ट बाह्य रूपासह, अधिक सुंदर आणि गतिमान आहे . ही अधिक आधुनिक, आतील उच्च दर्जाचे रंग आणि मरेटियलसह नवीन डिझाइन सादर करते. मागील बाजूस अनोखी नवीन थ्री डायमेंशल सिग्नेचर, नवीन १८ डायमंडकट अलॉय व्हील आणि 10 टचस्क्रीन आणि सेंटर कन्सोलची नवीन रचना ही सी सेगमेंटमधील ग्राहकांना नक्कीच आकर्षित करेल.” 

ग्राहक आता आपल्या जवळच्या ला मेसन सिट्रॉन फिजिकल शोरूमला भेट देऊन टेस्टड्राइव्ह घेऊ शकतात आणि नवीन सिट्रोन सी ची टेस्ट ड्राइव घेऊ शकतात. www.citroen.in या वेबसाईटवर ऑनलाइन कार बुकिंग करता येईल.

 

 

 

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "सिट्रोनची नवीन सी ५ एअरक्रॅास एसयूव्ही भारतात लाँच : अधिक आरामदायी, मजबूत आणि अनोख्या डिजाईनने युक्त एसयूव्ही"

Leave a comment

Your email address will not be published.


*