रेनो इंडियाच्या वतीने उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने काईगर, ट्रायबर आणि क्विडची मर्यादित आवृत्ती दाखल – नोंदणी 2 सप्टेंबर पासून सुरू

मुंबई– 2 सप्टेंबर 2022 (GPN) :-  सणासुदीचा माहौल साजरा करण्याच्या उद्देशाने भारतामधील पहिल्या क्रमांकाच्या युरोपियन ब्रँडच्या वतीने ग्राहकांसाठी संपूर्णपणे उत्सवी मर्यादित आवृत्ती (लिमिटेड एडिशन एलई) बाजारात दाखल करण्यात आली असून या नाविन्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलियोत – काईगर, ट्रायबर आणि क्विडचा समावेश आहे. नाविन्यावर आपले लक्ष केंद्रित करत या मर्यादित आवृत्त्यांचे आरेखन (डिझाईन) ग्राहकांच्या बदलत्या मागण्या लक्षात घेऊन करण्यात आले आहे.

उत्सवी मर्यादित आवृत्ती उत्पादन श्रेणी ड्यूएल टोन कॉम्बिनेशन असलेल्या पांढऱ्या रंगात आणि मिस्ट्री ब्लॅक रूफ ओन्लीमधील सर्व ट्रान्समिशनच्या आरएक्सझेड प्रकारातील रेनो काईगर आणि ट्रायबर त्याचप्रमाणे क्लाइंबर प्रकारात उपलब्ध असणार आहे. वाहनांच्या आकर्षकतेला चालना देणाऱ्या या मर्यादित श्रेणीत नजरेत भरणारी मन:शांती देणारी रंगाची अंतर्गत सजावट सोबत स्पोर्टी रेड एक्सेंट भोवताली फ्रंट ग्रिल, डीआरएलएस/हेडलॅम्प व साईड डोअर डिकॅल्स देण्यात आले आहेत.

रेनो काईगर भारताला रेनो’च्या पाच वैश्विक बाजारपेठेत चालना देण्यासाठी सक्रीय आहे. या मर्यादित आवृत्ती म्हणजे एलई’मध्ये वर नमूद करण्यात आलेल्या सर्वच वैशिष्ट्यांसह, रेनो काईगर फेस्टीव्ह एलई लाल रंगात व्हील सिल्व्हरस्टोन आणि कॅलिपर्स देऊ करते, ज्यामुळे वाहनाचा स्पोर्टी रांगडेपण अधिकच वाढते. जागतिक दर्जाच्या टर्बोचार्ज्ड 1.0 लिटर पेट्रोल इंजिनची शक्ति लाभलेली रेनो काईगर एक पाऊल पुढचा ड्रायव्हिंग अनुभव आणि वायरलेस स्मार्टफोन चार्ज व क्रूझ कंट्रोल कार्यासह आराम उपलब्ध करून देते. रेनो काईगर’ला नामांकित वैश्विक वाहन मूल्यांकन कार्यक्रम, ग्लोबल एनसीएपीकडून 4-स्टार सेफ्टी रेटींग फॉर एडल्ट ऑक्युपंट सेफ्टीचा पुरस्कार लाभलेला आहे.

रेनो ट्रायबरमधील वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांच्या मनात मोठे स्थान निर्माण झाले असून ती अद्वितीय गुणवत्ता, आटोपशीरपणा आणि आकर्षक डिझाईनसह सर्वोत्तम मूल्याचे पॅकेजिंग देते. या सर्व वैशिष्ट्यांसोबत, मर्यादित आवृत्ती श्रेणी, रेड एक्सेंटसह नवीन रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे. ट्रायबर एलई ही पियानो ब्लॅक व्हील कव्हर आणि डोअर हँडल्ससह अधिक आकर्षक बनते. रेनो ट्राईबर सर्वच श्रेणीत उत्तम दर्जाची आसन जागा देऊ करते आणि या प्रवर्गात सर्वाधिक जास्त 625एल बूट स्पेस (पाय ठेवण्याची जागा) देण्यात आली आहे. सर्वच वैशिष्ट्ये उत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांसह ग्लोबल एनसीएपीद्वारे 4-स्टार सेफ्टी रेटींग फॉर अॅडल्ट ऑक्युपंट सेफ्टीसह उपलब्ध आहेत.

आकर्षकपणा, नाविन्यपूर्णता आणि प्रवडणारी किंमत अशा वैशिष्ट्यांवर उभारलेली रेनो क्विड भारतातील रेनोकरिता खऱ्या अर्थाने गेम चेंजिंग उत्पादन असून 4,00,000 पेक्षा अधिक आनंदी ग्राहक आहेत. रेनो क्विड एलई अतिरिक्त स्टाईलसह उपलब्ध असून फ्रंट आणि रियर स्कीड प्लेटमध्ये रेड हायलाईटरूफ रेल्स सोबत  बाह्य सजावटीत लालमधील सीपिलरवर “क्लाइंबर डीकॅल देण्यात आला आहे. त्याशिवाय व्हील कव्हरमधील पियानो ब्लॅक रंग आणि ओआरव्हीएम कारच्या एकंदर व्हिज्यूअल अपीलमुळे भर पडते.

ही उत्सवी मर्यादित आवृत्ती अद्वितीय किंमतीसह अतिरिक्त आरेखन वैशिष्ट्यांसोबत अनुक्रमे काईगर आरएक्सझेड, ट्रायबर आरएक्सझेड आणि क्विड क्लाइंबरच्या सध्याच्या चालू किंमतीसह ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

उत्सवी मर्यादित आवृत्ती श्रेणीची नोंदणी आजपासून रेनो अधिकृत विक्रेत्यांकडे सुरू आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "रेनो इंडियाच्या वतीने उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने काईगर, ट्रायबर आणि क्विडची मर्यादित आवृत्ती दाखल – नोंदणी 2 सप्टेंबर पासून सुरू"

Leave a comment

Your email address will not be published.


*