बँक ऑफ बडोदाने बडोदा तिरंगा डिपॉझिट सुरू केले

Bank of Baroda (BoB) Logo

५.७५% प्रति वर्ष आकर्षक व्याजदर ऑफर करणारी विशेष घरगुती रिटेल मुदत ठेव योजना ४४४ दिवस आणि ६.००% प्रति वर्ष ५५५ दिवसांसाठी.

ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% प्रति वर्ष अतिरिक्त व्याज दर मिळतो.

नॉन-कॉलेबल ठेवींसाठी ०.१५% अतिरिक्त मिळतो.

मुंबई,१६ ऑगस्ट २०२२ (GPN):- बँक ऑफ बडोदा (बँक), भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एकने आज बडोदा तिरंगा ठेव योजना, उच्च व्याजदर देणारी विशेष मुदत ठेव उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली. बडोदा तिरंगा ठेवी दोन टेंडर मध्ये उपलब्ध आहेत.५.७५% प्रति वर्ष व्याजदराची ऑफर ४४४ दिवसासाठी तर ६.००% प्रति वर्ष व्याजदराची ऑफर आहे ५५५ दिवसांसाठी.

ही योजना १६ ऑगस्ट पासून ते ३१डिसेंबर२०२२ पर्यंत सुरू आहे आणि २ कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ ठेवींवर लागू आहे.पुढे, ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% प्रति वर्षचा अतिरिक्त व्याज मिळेल, तर नॉन-कॅलेबल ठेवींना ०.१५% प्रति वर्ष अतिरिक्त मिळेल.

श्री अजय के. खुराणा, कार्यकारी संचालक, बँक ऑफ बडोदा म्हणाले, “भारताला स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना, ग्राहकांना आनंद साजरा करण्याचे आणखी एक कारण देताना आम्हाला आनंद होत आहे. बडोदा तिरंगा ठेव योजना उच्च व्याज दर आणि भारतातील आघाडीच्या आणि सर्वात विश्वासार्ह बँकेने समर्थित असलेल्या दोन कार्यकाळांमधून निवडण्याची लवचिकता देते.”

बँक ऑफ बडोदाचे ग्राहक मोबाइलद्वारे ऑनलाइन एफडी उघडण्यासाठी बॉब वर्ल्ड वापरू शकतात.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदाने बडोदा तिरंगा डिपॉझिट सुरू केले"

Leave a comment

Your email address will not be published.


*