इंडिया@७५: सद्गुरूंचे ‘हर घर तिरंगा’ ला प्रोत्साहन, राष्ट्रगीत गायले, विस्मरणात गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कथांना उजाळा दिला

 

ऑगस्ट १४, २०२२ (GPN) – स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवाची लाट देशभर पसरत असताना, ईशा फौंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी राष्ट्रगीत गाऊन पाठवलेल्या एका संदेशात म्हटले आहे: “अब्जावधी हृदयांमध्ये वास करणारी ही माता आहे. माझी प्रिय भारतमाता, तू आमच्या हृदयाचे ठोके, आमच्या ओठांवरचं गाणं आणि जगाला वाट दाखवणारा प्रकाश असू दे.” 

व्हिडियो इथे पाहा – सद्गुरूंनी गायलेले राष्ट्रगीत –

https://twitter.com/sadhgurujv/status/1558474990613577728

राष्ट्रीय झेंड्याशी भावनिक नातं जोडणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेमध्ये लोकांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत सद्गुरू म्हणाले, “तिरंगा, जो आपल्या प्रिय भारताचे प्रतिक आहे, आपल्याला प्रदेश, धर्म, जात आणि वंश, याच्यापलीकडे जाऊन एकत्र आणतो. हे प्रतिक आपल्या मनात आणि हृदयात असंच फडकत राहून आपलं भव्य भारताचं स्वप्न खरं करण्याच्या दिशेनं पुढे जायला मदत करू दे.

भारताच्या विकासाच्या प्रक्रियेपासून जे वंचित राहिलेले आहेत, त्यांच्या कल्याणाची आणि समृद्धीची खात्री करण्यासाठी राष्ट्रीयत्वाची भावना आणखी प्रबळ करण्याची गरज आहे यावर सद्गुरूंनी भर दिला. 

“आपण प्रचंड प्रमाणात प्रगती केली आहे, पण त्याचवेळी, जवळपास ३.५ ते ४ कोटी लोक या विकासाच्या प्रक्रियेतून वंचित राहिलेले आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक जण दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. जर आपल्याला भारताच्या नवीन पर्वामध्ये सर्वांना समाविष्ट करायचे असेल, जर आपल्याला भव्य भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी आणि शक्यता मिळणं अत्यंत महत्वाचं आहे.” असे सद्गुरू म्हणाले. 

“जवळपास १.४ अब्ज लोक म्हणजे स्वतःच एक विश्व आहे. जर तुम्हाला हे छोटसं विश्व व्यवस्थित सांभाळायचं असेल, तर आपल्यातली राष्ट्रीयत्वाची भावना अगदी प्रबळ असली पाहिजे, जेणेकरून आपण अनेक अडचणींवर मात करून एक समृद्ध राष्ट्र घडवू शकू. समृद्धी ही फक्त संपत्तीबद्दल नसते: समृद्धी म्हणजे आपण ज्याला भारत म्हणतो त्या भूप्रदेशात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्याचं कल्याण.” असेही ते म्हणाले. 

सद्गुरूंचा स्वातंत्र्य दिनाचा संदेश पाहा:

https://twitter.com/sadhgurujv/status/1554516953586233345

स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ या भारत सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून, सद्गुरूंनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील विस्मरणात गेलेल्या काही स्वातंत्र्य वीरांच्या कथा पुन्हा जिवंत केल्या आहेत. 

“एक कृतज्ञताशून्य राष्ट्र फार पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून गेल्या पिढ्यांनी आपल्यासाठी जे केले आहे त्याचा आपण आदर करून त्यांच्याबद्दल कृतज्ञ असणं अत्यंत महत्वाचं आहे.” असे सद्गुरू म्हणाले. 

जतींद्र दास ते जलखारी बाई, ही सद्गुरूंच्या आवाजात स्वातंत्र्य वीरांच्या कथा सांगणारी एक संपूर्ण प्ले –लिस्ट आहे. 

या स्वातंत्र्य दिनी, सद्गुरू ईशा योग केंद्र, कोइम्बतुर मध्ये भारताच्या तिरंग्याचे ध्वजारोहण करतील. त्याचबरोबर भारताच्या ७५ वर्षांचे स्वातंत्र्य साजरे करण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

स्वातंत्र्य दिनाचा व्हिडियो डाउनलोड करा:

https://drive.google.com/drive/folders/17GjGKruogWfg8Ac6M4gAYw6Kuc1SLm3E?usp=sharing

‘आजादी का अमृतमहोत्सव’ च्या निमित्ताने सद्गुरूंचा संदेश डाउनलोड करा. 

https://drive.google.com/drive/u/0/folders/1q0xFk9FlI7_bOdxYMeAjO5efIxBvR4D4

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "इंडिया@७५: सद्गुरूंचे ‘हर घर तिरंगा’ ला प्रोत्साहन, राष्ट्रगीत गायले, विस्मरणात गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कथांना उजाळा दिला"

Leave a comment

Your email address will not be published.


*