- आयएचसीएलचे मुंबईमध्ये हॉटेल ‘जिंजर गोरेगाव’
- १०२ खोल्यांची सुविधा असलेले ‘जिंजर गोरेगाव’ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे
मुंबई, ८ऑगस्ट २०२२ (GPN): भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसीएल) ने मुंबईमध्ये जिंजर गोरेगावचा शुभारंभ होत असल्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे जिंजर ब्रँडने भारताच्या आर्थिक राजधानीत आपली ओळख अजून जास्त प्रभावी केली आहे. ब्रँडचे शानदार, आरामदायी डिझाईन आणि आपल्या पाहुण्यांना प्रभावी, आधुनिक व निरंतर आतिथ्यशीलतेचा अनुभव प्रदान करण्याच्या सेवा सिद्धांतानुसार या हॉटेलची रचना करण्यात आली आहे.
श्री.पुनीत छटवाल, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर,आयएचसीएल म्हणाले,”भारतातील सर्वात मजबूत हॉस्पिटॅलिटी बाजारपेठेत आयएचसीएलचे दहावे हॉटेल जिंजर गोरेगाव सुरु होत आहे. मुंबईतील वेगाने विकसित होत असलेले उद्योग व व्यवसाय केंद्र गोरेगावमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा पुरेपूर उपयोग हे हॉटेल करून घेईल. या प्रॉपर्टीसाठी पेन वर्कर्स सीटिंग कंपनीसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे.”
१०२ खोल्यांची सुविधा असलेले जिंजर गोरेगाव वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. इथून नेस्को आयटी पार्क, नेस्को एक्झिबिशन सेंटर (बॉम्बे एक्झिबिशन सेंटर) आणि फिल्म सिटीमध्ये सहज पोचता येते. जिंजरमधील नव्याने डिझाईन करण्यात आलेल्या सिग्नेचर खोल्या, फिटनेस सेंटर आणि संपूर्ण दिवसभर सेवा देणारे डायनर या हॉटेलची वैशिष्ट्ये आहेत.
मुंबईतील एक महत्त्वाचे बिझनेस आणि निवासी केंद्र असलेल्या गोरेगावात अनेक मोठे कॉर्पोरेट व आयटी पार्क, शॉपिंग मॉल्स आणि औद्योगिक झोन आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तारित भाग असलेली आरे कॉलनी हे शहरी जंगल गोरेगावात असल्याने पर्यटकांचा इकडे खूप ओढा असतो. हे हॉटेल धरून मुंबईमध्ये आयएचसीएलची एकूण १३ हॉटेल्स होतील, त्यापैकी तीन हॉटेल्सचे विकासकाम अद्याप सुरु आहे.Ends

Be the first to comment on "आयएचसीएलचे ‘जिंजर गोरेगाव’ हॉटेलचे मुंबईमध्ये शुभारंभ: इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसीएल) ने केली घोषणा."