एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा ३० जून २०२२ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीचा आर्थिक निकाल

AU Small Finance Bank Limited (AU Bank)

Mr. Sanjay Agarwal, MD & CEO, AU Small Finance Bank -File Photo GPN

मुंबई-, 21 जुलै, 2022 (GPN):- एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज झालेल्या आपल्या बैठकीत ३० जून २०२२ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी आर्थिक निकालांना मंजूरी दिली.

एयू बँकेकडून वाढती महागाई व व्‍याजदरामध्‍ये वाढ झालेली असताना देखील प्रभावी वाढीची नोंद – पीएटीमध्‍ये वार्षिक ३२ टक्‍क्‍यांची वाढ, पीपीओपीमध्‍ये वार्षिक २८ टक्‍क्‍यांची वाढ, ठेवींमध्‍ये वार्षिक ४८ टक्‍क्‍यांची वाढ, सीएएसए गुणोत्तरामध्‍ये ३९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ, जीएनपीए १.९६ टक्‍यांपर्यंत वाढला आणि २० राज्‍ये व २ केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये ९५० हून अधिक टचपॉइण्‍ट्सपर्यंत उपस्थितीमध्‍ये वाढ झाली.

  • व्‍यवसाय गती व जमाच्‍या संदर्भात मागील ५ वर्षांमध्‍ये सर्वात प्रबळ पहिल्‍या तिमाहीमध्‍ये (क्‍यू१) वितरण ८,४४५ कोटी रूपये (वार्षिक ३४५ टक्‍क्‍यांहून अधिक), पहिल्‍या तिमाहीसाठी संकलन कार्यक्षमता १०५ टक्‍के राहिली.
  • ठेवी वार्षिक ४८ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ५४,६३१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचल्‍या; सीएएसए गुणोत्तर आर्थिक वर्ष २०२२ च्‍या पहिल्‍या तिमाहीमधील २६ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत ३९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.
  • ताळेबंद 38% टक्‍क्‍यांनी वाढून ७१,०४१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले.
  • नफा – आर्थिक वर्ष २०२३ च्‍या पहिल्‍या तिमाहीसाठी निव्‍वळ नफा वार्षिक ३२ टक्‍क्‍यांनी वाढून २६८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला; आर्थिक वर्ष २०२३ च्‍या पहिल्‍या तिमाहीसाठी आरओए १.५ टक्‍के आणि आरओई १४.० टक्‍के झाली.
  • मालमत्ता दर्जा अधिक सुधारला, तर एकूण एनपीए काहीसे तिमाही-ते-तिमाही १.९६ टक्‍क्‍यांनी घसरले, निव्‍वळ एनपीए ०.५६ टक्‍के; मानक पुनर्रचित मालमत्ता क्रमाक्रमाने २.५ टक्‍क्‍यांवरून २ .१ टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाली.
  • १४४कोटी रूपयांचे कॉन्टिंजन्‍सी प्रोव्हिजन आणि ४१ कोटी रूपयांचे फ्लोटिंग प्रोव्हिजन या स्‍वरूपात अतिरिक्‍त प्रोव्हिजनिंग.
  • एलआयटी (लिव्‍ह इट टूडे) क्रेडिट कार्ड लॉन्‍च – भारतातील पहिले सानुकूल क्रेडिट कार्ड, जे ग्राहकांना जलदपणे कार्डचे लाभ निवडण्‍याचे स्‍वातंत्र्य देते.
  • बँकेने ३४ नवीन टचपॉइण्‍ट्सची भर केली, ज्‍यामुळे त्‍यांचे भौतिक नेटवर्क २० राज्‍य व २ केंद्रशासित प्रदेशांमधील (यूटी) ९५३ टचपॉइण्‍ट्सपर्यंत पोहोचले.
  • वार्षिक ठेवी ४८ टक्‍क्‍यांनी वाढून ३७,०१४ कोटी रूपयांवरून ५४,६३१ कोटी रूपये झाल्या, सीएएसए गुणोत्तरामध्ये आणखी सुधारणा होऊन मागील वर्षाच्‍या २६ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत ३९ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले. आर्थिक वर्ष २०२३ च्‍या पहिल्‍या तिमाहीमध्ये निधी-आधारित वितरण ३४५ टक्‍क्‍यांनी वाढून ८,४४५ कोटी रुपये झाले. मागील वर्षी याच तिमाहीत ते १,८९७ कोटी रूपये होते, ज्‍यावेळी कोविड २.० मुळे कमी बेस होता. आर्थिक वर्ष २०२३ च्‍या पहिल्‍या तिमाहीसाठी नॉन-फंड वितरण पाच पट वाढून ४८१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले, तुलनेत मागील वर्षी याच तिमाहीमध्‍ये कोविड २.० मुळे ७९ कोटी रूपये होते.

बँकेचा एयूएम वार्षिक ३७ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ५०,१६१ कोटी रूपयांवरून ३६,६३५कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. यासोबत तिमाहीसाठी १०५ टक्‍क्‍यांची सातत्‍यपूर्ण संकलन कार्यक्षमता दिसून आली, ज्‍यामुळे मालमत्ता दर्जा गुणोत्तरांमध्‍ये स्थिर वाढ झाली. एयू ०१०१, व्हिडिओ बँकिंग, क्रेडिट कार्डस्, यूपीआय क्‍यूआर इत्‍यादी सारख्‍या प्रॉपर्टीजसह बँकेचे डिजिटल सेवांमध्‍ये प्रबळ स्‍थान कायम आहे. या सर्व प्रॉपर्टीजमध्‍ये प्रबळ गती दिसण्‍यात येत आहे. 

या कामगिरीबद्दल बोलतानाएयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे एमडी आणि सीईओ श्री. संजय अग्रवाल म्हणाले, “असामान्यपणे आव्हानात्मक वातावरणात काम करूनही बँक म्हणून आम्ही गेल्या २१ तिमाहीत केलेल्या प्रगतीमुळे मला खूप आनंद झाला आहे. आमचे व्यवसाय मॉडेल आमच्या रिेटेल-केंद्रित शाखा बँकिंग फ्रँचायझीसातत्याने स्थिर मालमत्तेच्या गुणवत्तेसह उत्तम स्थितीत असलेली मालमत्ता क्षेत्रेआमच्या डिजिटल उपक्रमांमध्ये वाढ आणि उच्‍च प्रशासन मानकांवर सतत लक्ष केंद्रित करून चालवलेल्या प्रत्येक तिमाहीसह अधिकाधिक शाश्‍वतपूर्ण होत आहे. यासाठी मी आमच्या ग्राहकांचे साथीच्या रोगानंतर त्यांचे व्यवसाय सामान्य झाल्यामुळे त्यांचे ईएमआय भरण्‍यासाठी आभार मानतो आणि त्यांच्या प्रयत्‍नांमध्ये त्यांना यश मिळो अशी शुभेच्छा देतो.

आर्थिक वर्ष २०२३ ची पहिली तिमाही आमच्यासाठी गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम तिमाहींपैकी एक होती, कारण आम्ही मुख्य घटकांमध्‍ये उत्तम कामगिरी केली जसे – सीएएसए गुणोत्तर व किरकोळ ठेवींच्या मिश्रणात सुधारणा, उत्तरेकडील १०० टक्‍के संकलनाद्वारे समर्थित आमच्या जीएनपीए प्रमाणातील घटप्रत्येक मालमत्ता व्‍यवसायामध्ये वाढस्थिर स्‍प्रेड्स आणि मालमत्ता गुणवत्ता व एकूण उत्तम नफा. आम्ही आमच्या वितरणाचा विस्तार करत आहोत आणि आमच्यासाठी उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या संधी मिळवण्यासाठी, तसेच भविष्याकरिता सुसज्‍ज राहण्यासाठी डिजिटल उपक्रमब्रॅण्डिंग व वितरणामध्ये गुंतवणूक करत आहोत. आम्ही या तिमाहीत ईशान्य भागात पदार्पण केले आणि दक्षिण भारत व पूर्व भारतातील नवीन बाजारपेठांमध्ये आम्हाला उत्तम मान्‍यता मिळत आहे.-Ends.

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा ३० जून २०२२ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीचा आर्थिक निकाल"

Leave a comment

Your email address will not be published.


*