
(L-R): Shri. Debdatta Chand – ED, Ms. PV Sindhu – Olympic winner and Indian badminton player, Shri. Vikramaditya Singh Khichi, Shri. Sanjiv Chadha – MD & CEO, Shri. Rakesh Sharma – Head Marketing & Branding, Shri. Kidambi Srikanth- Indian Badminton Player and Shri. Joydeep Dutta – ED at Bank of Baroda’s 115th Foundation Day celebration in Mumbai.
पाच अशा व्यक्तीं /कंपन्या ज्यांनी त्यांच्या समुदायासाठी, समाजासाठी आणि देशासाठी हातभार लावलेला आहे त्यांना ‘बडोदा सन अचिव्हमेंट अवॉर्ड्स’ प्रदान करते
बँकेच्या 115व्या वर्षाचा विषय आहे “वर्धित तंत्रज्ञान, समृद्ध जीवन”

Bank of Baroda (BoB) Logo
मुंबई, 21 जुलै 2022 (GPN): भारतातील आघाडीच्या सार्वजनिक बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा (बँक) ने आज 20 जुलै 2022 रोजी आपला 115वा स्थापना दिन साजरा केला. हा महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी बँकेने आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या, समाजावर भरीव प्रभाव टाकणाऱ्या आणि त्यांच्या प्रवासातून इतरांना प्रेरणा देणाऱ्या पाच प्रेरणादायी व्यक्तींना/कंपन्यांना ‘बडोदा सन अचिव्हमेंट अॅवॉर्ड्स 2022’ प्रदान केले.
“वर्धित तंत्रज्ञान, समृद्ध जीवन” हा बँकेच्या 115व्या स्थापना दिनाचा विषय आहे, जो बॅंकेत तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो ग्राहक सुविधा वाढविण्यासाठी, अधिक चांगल्या आणि अधिक वैयक्तिकृत सेवा प्रदान करण्यासाठी, स्वयंचलित प्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी, फसवणूक थांबवण्यासाठी आणि ग्राहक संबंध अधिक सखोल करण्यासाठी. 2021 मध्ये, बँकेने ‘बॉब वर्ल्ड’ – एक पूर्ण-सेवा मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्म सुरू केला जो बँकेच्या 95% किरकोळ सेवा प्रदान करतो आणि आतापर्यंत त्याचे 23 दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत.
बँकेच्या 115व्या स्थापना दिनानिमित्त श्री. संजीव चढ्ढा, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, बँक ऑफ बडोदा म्हणाले की, “ही खरोखरंच एक महत्त्वाची इतिहासकारी घटना आहे. बँकेचा स्थापना दिन हा बँकेच्या कर्तृत्वाचा विचार करण्यासाठी आणि त्याकडे वळून पाहण्याची एक योग्य वेळ आहे, परंतु त्याहून जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्याकडे पाहण्याची एक उत्तम संधी आहे. आमच्या ग्राहकांच्या विश्वासावर आधारित असा आमच्याकडे एक समृद्ध वारसा आहे. त्यात भर म्हणून, वर्षानुवर्षे, बँकेने आपल्या ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा आणि आकांक्षांशी जुळवून घेत अनेक धोरणात्मक बदल केले आहेत. बॉब वर्ल्ड केंद्रस्थानी असताना, आम्ही त्यांना सहजगत्या उपलब्ध असा जागतिक दर्जाचा बँकिंगचा अनुभव प्रदान करीत आहोत.”
श्री. चढ्ढा पुढे म्हणाले की, “आज बडोदा सन अचिव्हमेंट अवॉर्ड्सच्या विजेत्यांचा सत्कार करताना आम्ही खूप खुश आहोत. या नागरिकांनी बदल घडवून आणण्याचा निर्धार केला असून स्थानिक समाज आणि आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी ते प्रयत्नशील आहेत. बँक ऑफ बडोदा येथे, आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि आमच्या 115 व्या स्थापना दिनानिमित्त, पुन्हा एकदा देशाच्या विकासात भागीदार होण्यासाठी बांधील आहोत.”
‘बडोदा सन अचिव्हमेंट अवॉर्ड्स 2022’ हे स्टार्ट अप, एम.एस.एम.ई टेक, अॅग्री टेक, समाजसेवा (सोशल सर्व्हिस) आणि निसर्ग/वन्यजीव संरक्षण (नेचर/वाइल्डलाइफ कन्झर्वेशन) या पाच विभागांत प्रदान करण्यात आले आहेत. नामांकित विचारवंत नेत्यांचा समावेश असलेल्या बाह्य ज्युरीद्वारे नामांकनांचे मूल्यांकन केले गेले आहे. ‘बडोदा सन अचिव्हमेंट अवॉर्ड्स 2022’ चे विजेते पुढीलप्रमाणे आहेत:
स्टार्ट अप : कु. सुहानी मोहन आणि श्री. कार्तिक मेहता, सरल डिझाइन्स (महाराष्ट्र) – मासिक पाळी सर्वांसाठी सुरक्षित करण्याच्या त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि पथदर्शी कार्यासाठी.
एम.एस.एम.ई टेक: श्री. वाय. के. बेहानी आणि श्री. एन. के. बेहानी, टेक्नो व्हॉल्व्ह्ज (पश्चिम बंगाल) – भारतीय आणि जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादन करणाऱ्या उच्च-दाब गॅस सिलिंडर व्हॉल्व्हच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी.
अॅग्री टेक: कु. माला कुमारी, नंदिनी अॅग्रो ग्रुप (बिहार) – संपूर्ण गावाची उन्नती करण्यास मदत करणाऱ्या मशरूम शेतीत त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी. समाजसेवा (सोशल सर्व्हिस) : कु. आशा सावर्डेकर (गोवा) – नि:स्वार्थीपणे वृद्धांची काळजी घेण्यासाठी आणि इतक्या जणांच्या आयुष्यात आशेचे द्योतक बनल्याकरिता.
निसर्ग/वन्यजीव संवर्धन (नेचर/वाइल्डलाइफ कन्झर्वेशन) : श्री. हिमात्माराम भांभू (राजस्थान) – आपले आयुष्य पर्यावरण संवर्धन व वन्यजीवांच्या रक्षणासाठी समर्पित केल्याकरिता.
बँकेने आपल्या ब्रॅंडचे पृष्ठांकक (ब्रँड एंडोर्सर्स) आणि भारताचे क्रीडापटू पी.व्ही.सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचा 115व्या स्थापना दिन सोहळ्यात सत्कार केला आहे.
================
Be the first to comment on "नागरिक पथ दर्शींचा (सिटीझन पाथ ब्रेकर्सचा) सत्कार करून बँक ऑफ बडोदा आपला 115वा स्थापना दिवस साजरा करत आहे"