टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट १५ जुलै ‘जागतिक युवा कौशल दिनी’ ५००० युवकांना हरित नोकऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण देणार आणि ‘हरित उर्जेला’ चालना देणार

मुंबई, १५ जुलै २०२२ (GPN): ऊर्जा उद्योग क्षेत्रात आधुनिक कौशल्यांचा विकास घडवून आणण्यासाठी कार्यरत असलेले टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट देशातील युवकांना हरित ऊर्जा क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्यासाठी आपल्या प्रशिक्षण उपक्रमांमध्ये वाढ करत आहे.जागतिक युवा कौशल दिनाच्या निमित्ताने टीपीएसडीआय आपल्या सहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये स्मार्ट व कुशल ऊर्जाविषयक नैपुण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग, रुफटॉप सोलर फोटोवोल्टीकचे इंस्टॉलेशन आणि देखभाल, स्मार्ट मीटरचे इंस्टॉलेशन आणि होम ऑटोमेशनसाठी सौर फोटोवोल्टीकमधील कौशल विकास अभ्यासक्रम चालवत आहे. मुंबईमध्ये शहाड, ट्रॉम्बे आणि विद्याविहार, मैथन – धनबाद, मुंद्रा – कच्छ आणि जोजोबेरा – जमशेदपूर याठिकाणी ही प्रशिक्षण केंद्रे चालवली जातात. टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटने आर्थिक वर्ष २३ मध्ये जवळपास ३,००० युवकांना हरित ऊर्जा क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आखले असून २०२५ पर्यंत यामध्ये ५,००० पर्यंत वाढ केली जाईल.

कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरन्मेंट अँड वॉटर (सीईईडब्ल्यू), नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल आणि स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स यांनी नुकत्याच केलेल्या संशोधनांनुसार २०३० पर्यंत नोकऱ्यांच्या १० लाख संधी निर्माण करण्याची क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. हरित ऊर्जा क्षेत्रात सध्या असलेल्या मनुष्यबळापेक्षा हा आकडा जवळपास दहा पट जास्त आहे. या संशोधनांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, मोठी कंपनी किंवा मोठ्या प्रकल्पांपेक्षा छोट्या शुद्ध ऊर्जा प्रकल्पांमध्ये नोकऱ्यांच्या जास्त संधी उपलब्ध होतील. टीपीएसडीआयचे नवे अभ्यासक्रम त्यांच्या विद्यार्थ्यांना हरित नोकऱ्यांमध्ये या अपेक्षित वाढीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करून सक्षम बनवतात. या नव्या हरित ऊर्जा कौशल अभ्यासक्रमांमध्ये व्यावहारिक प्रशिक्षण आणि कामाच्या सुरक्षित प्रथांवर लक्ष केंद्रित केले जाईल आणि ते अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल फ्रेमवर्कशी (एनएसक्यूएफ) जोडलेले असतील.

टाटा पॉवर प्रवक्त्याने सांगितले, “आपल्या शुद्ध ऊर्जा उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी आणि २०३० पर्यंत ५०० गिगावॅट क्षमतेचा अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओ बनवण्याच्या दिशेने भारत महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. भारतीय ऊर्जा उद्योगक्षेत्रात मोठे हरित परिवर्तन घडून येणार आहे आणि शुद्ध ऊर्जा व तंत्रज्ञानाचे एक अग्रणी म्हणून टाटा पॉवर आपल्या टीपीएसडीआयमार्फत या परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुसज्ज आहे. यासाठी टाटा पॉवरचे टीपीएसडीआय अशी इकोसिस्टिम सक्षम करत आहे ज्यामध्ये युवकांना रूफ टॉप सोलर, ईव्ही चार्जिंग, होम ऑटोमेशन, बॅटरी स्टोरेज आणि स्मार्ट मीटरिंग यासारख्या हरित व स्मार्ट ऊर्जा तंत्रज्ञानांमध्ये प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.”

टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटने पारंपरिक आणि शुद्ध ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये आपल्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये आजवर १.४ लाख जणांना प्रशिक्षण दिले आहे. मागील आर्थिक वर्षात या संस्थेने ४५००० पेक्षा जास्त जणांना प्रशिक्षित केले असून त्यापैकी २५०० जणांना हरित ऊर्जा क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्यांमध्ये प्रमाणित करण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि एनर्जी कन्सल्टिंगचे अभ्यासक्रम भविष्यात सुरु करण्याची टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची योजना आहे.-Ends.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट १५ जुलै ‘जागतिक युवा कौशल दिनी’ ५००० युवकांना हरित नोकऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण देणार आणि ‘हरित उर्जेला’ चालना देणार"

Leave a comment

Your email address will not be published.


*