९१ टक्के भारतीय ग्राहकांचे प्राधान्य ऑनलाइन पेमेंट्सना; मोबाइल वॉलेटची पारंपरिक पैसे देण्याच्या पद्धतींवर मात: एक्सपीरियन रिपोर्ट

Experian India Logo

मुंबई१२ जुलै २०२२ (GPN): भारतात मोबाइल वॉलेट्ससारख्या डिजिटल पेमेंट्सचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. एक्सपीरियन ग्लोबलच्या नवीन इनसाइट्स रिपोर्टनुसारडिजिटल पेमेंट्सनी आता क्रेडिट कार्डांवर मात केली असून९१ टक्के भारतीयांची आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाइन पेमेंट पद्धतींना पसंती आहे.

ऑनलाइन व्यवहारांकडे होणारे स्थित्यंतर प्रोत्साहक असलेतरी यामुळे डिजिटल सुरक्षिततेसाठी काटेकोर उपाययोजना करण्याच्या आवश्यकतेवरही प्रकाश टाकला जातो. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४५ टक्के भारतीय ग्राहकांनी फसवणूक व ओळखचौर्याबद्दल चिंता व्यक्त केली. याशिवायआपल्या माहितीचे फसवणूक करणाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी व्यवसायांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा ८० टक्के ग्राहकांनी व्यक्त केली. 

एक्सपीरियनने भारतासह ग्रेट ब्रिटन व अमेरिका आणि अन्य APAC मार्केट अशा २० देशांमधील ६,००० ग्राहक व २,००० व्यवसाय यांच्या सहभागातून सर्वेक्षण केले. ग्राहक व व्यवसायांचे आर्थिक दृष्टकोनआर्थिक स्वास्थ्यऑनलाइन वर्तन आणि अशा काही मुद्दयांवर सर्वेक्षणात माहिती जमवण्यात आली. गेल्या सात वर्षांतील ग्राहकांच्या डिजिटल प्राधान्यांमधील स्थित्यंतरे व व्यवसायांच्या व्यूहरचना यांचा शोध घेण्याच्या मालिकेतील हा सर्वांत नवीन अभ्यास आहे. 

बाय नाउ पे लेटर’ किंवा बीएनपीएल सेवांचे आकर्षण भारतात वाढत आहे हेही या अभ्यासातून पुढे आले आहे. गेल्या सहा महिन्यांत बीएनपीएल सेवांचा वापर जगभरात सुमारे १८ टक्के वाढलातर भारतात ही वाढ २१ टक्के होती. बीएनपीएलला ग्राहकांची स्वीकृती उत्तम आहे आणि यामुळे आर्थिक समावेशनात मदत होते. व्यवसायांनी योग्य पद्धतींचे पालन करावे आणि नियामक निर्देशांची पूर्तता करणे यासाठी आवश्यक आहे. 

एक्सपीरियन इंडियाचे कंट्री मॅनेजर नीरज धवन सांगतात,“भारत एका मजबूत डिजिटल परिसंस्थेच्या उभारणीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या परिसंस्थेत ग्राहक डिजिटल सोल्युशन्स व सेवा वापरून त्यांच्या आर्थिक बाबींचे प्रभावी व्यवस्थापन करू शकतात. व्यवसायांनी तंत्रज्ञान व नवोन्मेषाचा मोठ्या प्रमाणावर अंगिकार करतानाग्राहकांच्या सातत्याने बदलणाऱ्या मागण्यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही संघर्षाशिवाय तसेच सुरक्षित डिजिटल अनुभवामुळे ग्राहकांचा विश्वास व निष्ठा प्राप्त करण्यात खूप मदत होईल. व्यवसायांना सुरक्षितनवीन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राबवता येतील अश व्यवसायांना स्वत:च्या ध्येयांसाठी वेगवान व कार्यक्षम निर्णय घेण्यात मदत करणारी सोल्युशन्स पुरवण्यास उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून एक्सपीरियन वचनबद्ध आहे.” 

एक्सपीरियनच्या ग्लोबल इनसाइट्स रिपोर्टमधील भारतासाठी महत्त्वाचे मुद्दे:– 

  • भारतात एआय-पॉवर्ड चॅटबॉट्स व व्हर्च्युअल असिस्टण्ट्स यांचा वापर वाढत आहे. ३४ टक्के ग्राहकांचा मानवी सहाय्यकांहून अधिक विश्वास एआयवर आहे. 
  • ६८ टक्के ग्राहक डिजिटल व्यवहारांसाठी आपली संपर्क माहिती, पत्ता, फोनक्रमांक आदी वैयक्तिक डेटा शेअर करण्यास तयार आहेत.
  • बँकखात्याचे तपशील, क्रेडिट कार्डाचे तपशील यांसारखा वित्तीय डेटा संरक्षित करण्यावर ५८ टक्के ग्राहकांनी प्राधान्याने प्रकाश टाकला.
  • बनावट/फसव्या ईमेल्स, मेसेजेस किंवा फोन घोटाळे यांबाबत ६० टक्के भारतीय ग्राहकांनी चिंता व्यक्त केली. अर्थात, आपण ऑनलाइन ओळखचौर्याला बळी पडलो आहे असे ३० टक्के ग्राहकांनी नमूद केले.
  • २९ टक्के भारतीय ग्राहकांचे क्रेडिट कार्ड/पेमेंट तपशील यांची चोरी झाली आहे.
  • ऑनलाइन व्यवहारांमध्ये सुरक्षितता (९२%) आणि खासगीत्व (९२%) हे मुद्दे कायमस्वरूपी महत्त्वाचे आहेत.

एक्सपीरियन ग्लोबल इनसाइट्स रिपोर्ट येथून डाउनलोड केला जाऊ शकतो:- : https://www.experian.in/global-insights-report-april-2022

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "९१ टक्के भारतीय ग्राहकांचे प्राधान्य ऑनलाइन पेमेंट्सना; मोबाइल वॉलेटची पारंपरिक पैसे देण्याच्या पद्धतींवर मात: एक्सपीरियन रिपोर्ट"

Leave a comment

Your email address will not be published.


*