15-Year-Long Struggle Ends! Elderly Hyderabad-Based Couple Successfully Undergoes Total Knee Replacement Surgery At Medicover Hospitals, Navi Mumbai-श्रीरंग बारणेंनासाठी राष्ट्रवादीची जंगी सभा : सुधाकर घारेंच्या नेतृत्वात रॉयल गार्डनचे सभागृह झाले हाऊसफुल-Para Share Entertainments Kicks off its operations in India with three power-packed shows-IndiaMART InterMESH Limited Announces 12M FY24 (Full Year) and Q4FY24 (Fourth Quarter) Ending March 31, 2024 - Results-GJEPC innovNXT I Forty Under 40 - Next Gen Leadership Summit Witnesses Young Leaders Transforming The Business Landscape and Driving Growth-TBO TEK LIMITED IPO OPENS ON 8 May, 2024 PRICE BAND SET AT Rs. 875 TO 920 PER EQUITY SHARE-आधार हाउसिंग फाइनैंस लिमिटेड का आईपीओ 8-10 मई तक, 3,000 करोड़ जुटाएगी-Airbnb introduces Icons— Bollywood Star Jahnvi Kapoor opens the door to her legendary, never-before-seen family home in Chennai-AADHAR HOUSING FINANCE LIMITED IPO OPENS ON MAY 8, 2024 PRICE BAND SET AT Rs. 300 TO 315 PER EQUITY SHARE-महाराष्ट्र दिवस पर कालबादेवी में ओशो समारोह 'ओशो के अनुज डॉक्टर स्वामी शैलेंद्र सरस्वती' और 'मां अमृत प्रियाजी' की उपस्थिति में ओशो का ध्यान प्रयोग और प्रवचन होगा

भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम, शेमारू मराठीबाणा वाहिनीचा अनोखा उपक्रम! आभासी वास्तव तंत्रज्ञानाने घेता येणार पंढरपूरच्या विठूमाऊलीचे दर्शन

Shemaru Marathibana Vahini

भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम, शेमारू मराठीबाणा वाहिनीचा अनोखा उपक्रम!

मुंबई, ६ जुलै २०२२ (GPN): महाराष्ट्राची भक्ती परंपरा असलेली आषाढवारी तब्बल २ वर्षांनी नव्या जोमाने आणि उत्साहाने विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. आपल्या लाडक्या विठुरायाचे सावळे रूप डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांचे डोळे आसुसले आहेत. या वारीचे औचित्य साधून शेमारू मराठीबाणा वाहिनी एक आगळा उपक्रम राबवत आहे. व्हर्च्युअल रिऍलिटी अर्थात आभासी वास्तव या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून थेट पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन ‘याची देहा, याची डोळा’ भाविकांना घडवणार आहे

अनेक विठ्ठलभक्तांना काही अपरिहार्य कारणांमुळे, अडचणींमुळे इच्छा असूनही वारीत सहभागी होता येत नाही. अशा सर्व भाविकांसाठी शेमारू मराठीबाणा या चित्रपट वाहिनीतर्फे विठ्ठल दर्शनाची अनोखी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्हर्चुअल रिऍलिटी अर्थात आभासी वास्तव या तंत्रज्ञानाचा वापर करून विठ्ठलभक्तांसाठी आपल्या लाडक्या पंढरपूरच्या विठूमाऊलीचे दर्शन घेता येणार आहे. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरातील गाभाऱ्याचा आभास निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यासारखी अनुभूती भाविकांना घेता येईल.

हा प्रयोग करणारी शेमारू मराठीबाणा ही पहिलीच मराठी चित्रपट वाहिनी आहे. ५ जुलै ते ८ जुलै या कालावधीत वारीच्या मार्गावर असलेल्या विविध गावांमध्ये ही विठ्ठल दर्शनाची सोय उपलब्ध असणार आहे. तर ९ जुलै ते ११ जुलै या कालावधीत विठूरायाच्या पंढरीतच ही दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

शेमारू मराठीबाणा वाहिनीच्या या अभिनव संकल्पनेमुळे महाराष्ट्रातील लाखो भाविकांना आभासी वास्तवातून विठ्ठल दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. याचा फायदा हा प्रामुख्याने आजारी भाविक किंवा वृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने जनसागर लोटतो. पण त्यातल्या अनेकांना विठूरायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. त्यांनाही या तंत्रज्ञानाचा वापर करून विठ्ठल दर्शन घेता येणार आहे. 

महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरांचा पुरस्कार करत शेमारू मराठीबाणा वाहिनी सातत्याने आपल्या प्रेक्षकांसाठी अभिनव उपक्रम राबवत आली आहे. यंदाची वारी देखील प्रेक्षकांसाठी अधिक खास करण्यासाठी वाहिनी प्रयत्नशील आहे. या अनोख्या वारीत सहभागी होण्यासाठी, वारी कधी कोणत्या गावी असणारे हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा शेमारू मराठीबाणा वाहिनी. तसेच या उपक्रमाची अधिक माहिती वाहिनीच्या सोशल मीडिया वर देखील उपलब्ध होणार आहे.-Ends.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "भक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम, शेमारू मराठीबाणा वाहिनीचा अनोखा उपक्रम! आभासी वास्तव तंत्रज्ञानाने घेता येणार पंढरपूरच्या विठूमाऊलीचे दर्शन"

Leave a comment

Your email address will not be published.


*