अभिमन्यू की संभाजी ? मंत्रीपदासाठी फडणवीस कोणाची निवड करतील

मुंबई, ३० जून, २०२२ (GPN): महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींनी वेग धरला आहे. विधानपरिषदेची निवडणूक संपली आणि राजकीय नेत्यांचे रस्ते रातोरात बदलले. शिवसेनेत मोठी फूट पडली असून उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि बंडखोर आमदारांच्या साथीने सरकार स्थापण्याचा चंग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधला. (Latur) भाजपा सत्तेत येईल असेच चित्र असतांना देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू व निकटवर्तीय समजले जाणारे औशाचे (Abhimanyu Pawar) आमदार अभिमन्यू पवार यांची फडणवीस यांच्या मंत्री मंडळात वर्णी लागणार का? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे २०१४ मध्ये मंत्री असलेले संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) हे देखील रेसमध्ये आहेत. उद्या, एक जुलै रोजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा शपथविधी पार पडणार आहे, त्यात फडणवीस अभिमन्यू की संभाजी यापैकी कोणाची निवड करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एक जुलै रोजी योगायोगाने आमदार अभिमन्यू पवारांचा वाढदिवस असून गुरु आपल्या शिष्याला मंत्रीपदाची भेट देणार का? हे पहावे लागेल. विरोधी पक्षातील आमदार असुनही आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतरस्त्याचा औसा पॅटर्ण संबंध राज्याला दिशा देणारा उपक्रम राबविला. शेकडो किलोमिटर रस्ते मोकळे करीत बांध तेथे रस्ता देण्याच्या त्यांच्या या कार्याची भुरळ देशातील आनेक राज्यांना पडली.एक जुलै रोजी योगायोगाने आमदार अभिमन्यू पवारांचा वाढदिवस असून गुरु आपल्या शिष्याला मंत्रीपदाची भेट देणार का? हे पहावे लागेल.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिमन्यू पवार हे स्वीय सहायक म्हणून काम करत होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना औसा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली व ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांचा पराभव करत निवडून आले.

कांही दिवसांपुर्वीच अंगात एकशे दोन ताप असतांना देवेंद्र फडणवीस यांनी औशातील भव्य शेतकरी मेळाव्याला व पवारांनी केलेल्या कामांच्या लोकापर्ण व उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत “जो एखादा मंत्रीही असे काम करु शकत नाही असे काम अभिमन्यू यांनी केल्याची स्तुती खुद्द फडणवीस यांनी संभाजी पाटील निलंगेकरांसमोरच केली. याच कार्यक्रमात संभाजी पाटील यांनी देखील जे आम्हाला जमले नाही ते तुम्ही करुन दाखविले अशी पुष्टी जोडली होती.

अजारी असतांनाही अभिमन्यूसाठी फडणवीसांनी थांबणे, त्यांच्या बाबत गौरोद्गार काढणे, त्यांची पाठ थोपटणे हे आगामी काळासाठी सुचक असल्याचे मानले जाते. आता एक जुलै रोजी फडणवीसांचा शपथविधी आणि त्याच दिवशी अभिमन्यू पवारांचा वाढदिवस असल्याने मंत्रीपदाची माळ पवारांच्या गळ्यात घालणार का?

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अभिमन्यू की संभाजी ? मंत्रीपदासाठी फडणवीस कोणाची निवड करतील"

Leave a comment

Your email address will not be published.

*