अपोलो एज्युकेशन तर्फे ‘इंटरनॅशल क्लिनिकल फेलोशीप प्रोग्रॅम’ लाँच ‘कमवा आणि शिका’ पद्धतीने एमएस/एमडी/डीएनबी डॉक्टर्सना आरोग्यव्यवस्थेचे मूल्य उंचावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते

मुंबई, २९ जून २०२२ (GPN)– अपोलो एज्युकेशन युकेने (एईयुके) आपल्या ग्लोबल वर्कफोर्स डेव्हलपमेंट (जीडब्ल्यूडी) उपक्रमाचा एक भाग म्हणून अपोलो इंटरनॅशनल क्लिनिकल फेलोशीप प्रोग्रॅम (आयसीएफपी) २०२२ लाँच केला आहे. या तीन वर्षांच्या आयसीएफपी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून डॉक्टर्सना (एमएस/एमडी/डीएनबी) ‘कमवा आणि शिका’ पद्धतीचा अवलंब करता येईल, पहिल्या वर्षात भारतातील अपोलो हॉस्पिटल्समधील वरिष्ठ डॉक्टर्सकडून मार्गदर्शन मिळवता येईल आणि त्याच्या जोरावर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी युके हॉस्पिटलमध्ये रूजू होऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याआधी एनएचएस वैद्यकीय प्रॅक्टिसचा अनुभव घेता येईल. त्याचबरोबर स्पेशॅलिटीच्या काळात आंतरराष्ट्रीय कामाचा अनुभव घेताना डॉक्टर्सना एज हिल विद्यापीठात मास्टर ऑफ सर्जरी किंवा मास्टर ऑफ मेडिसिन पदवीसाठी अभ्यास करता येईल.

अपोलो आयसीएफपीची रचना डॉक्टर्सना मार्गदर्शन (मेंटॉरशीप), जागतिक दर्जाच्या स्पेशॅलिस्ट क्लिनिकचा तसेच उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या दृष्टीने करण्यात आली आहे. या प्रोग्रॅमसाठी एईयुके, ग्लोबल ट्रेनिंग अँड एज्युकेशन सेंटर (जीटीईसी) राइटिंग्टन, विगन आणि लीह टीचिंग हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट आणि एज हिल युनिव्हर्सिटी, युके यांनी सहकार्य केले आहे.

अपोलो आयसीएफपी हा ‘अपोलो नॉलेज’ या अपोलो समूहाच्या कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण आणि स्त्रोत विभागाअंतर्गत तयार करण्यात आलेला अद्यावत उपक्रम आहे. हा एईयुकेच्या ग्लोबल वर्कफोर्स डेव्हलपमेंट (जीडब्ल्यूडी) उपक्रम या आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठीच्या कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण आणि स्त्रोत प्रोग्रॅमचा एक भाग असून त्याद्वारे त्यांचे क्षितिज विस्तारण्यासाठी, प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांत कामाचा अनुभव देण्यासाठी मदत केली जाते.

श्री.सिवारामाकृष्णन वेंकटेश्वरन, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोलो नॉलेज म्हणाले,‘‘हा आमच्या ग्लोबल वर्कफोर्स डेव्हलपमेंट (जीडब्ल्यूडी) उपक्रमाचा एक भाग असून त्याद्वारे आरोग्यसेवा व्यावसायिकांना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण, प्रशिक्षण आणि भरती व नोकरीच्या संधी दिल्या जातात. या संधींच्या मदतीने त्यांना प्रशिक्षण देऊन तसेच कौशल्य उंचावून स्वतःचे तसेच आपल्या आरोग्य यंत्रणेचे मूल्य वाढवण्यास मदत केली जाते.’’

डॉक्टर्सना भारतीय आरोग्यव्यवस्थेचे मूल्य उंचावण्यासाठी आयसीएफपी प्रोग्रॅम.

१) अपोलो एज्युकेशन युकेतर्फे (एईयुके) ग्लोबल ट्रेनिंग अँड एज्युकेशन सेंटर (जीटीईसी), राइटिंग्टन, विगन आणि लीह एनएचएस टीचिंग हॉस्पिटल (WWL) आणि एज हिल विद्यापीठ (EHU) या आपल्या युके भागिदारांच्या मदतीने अपोलो आयसीएफपी प्रोग्रॅम लाँच २) या ३ वर्षांच्या अपोलो आयसीएफपी प्रोग्रॅमअंतर्गत भारतात एमएस/एमडी/डीएनबी पूर्ण केलेल्या डॉक्टर्ससाठी खास मार्ग उपलब्ध करून दिला जातो ३) निवडक डॉक्टर्सना भारतातील अपोलो हॉस्पिटल्समध्ये एक वर्ष घालवता येईल आणि दुसरे व तिसरे वर्ष युकेमधील एनएचएस हॉस्पिटलमध्ये शिकता येईल. ४) सर्जिकल किंवा वैद्यकीय स्पेशॅलिटी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर्सना युकेतील एज हिल विद्यापीठाद्वारे एमसीएच/एममेड पदवी दिली जाईल. ५) या कमवा, शिका, परत या आणि गुणवत्ता दाखवा उपक्रमाअंतर्गत डॉक्टर्सना एनएचएसमध्ये कामाचा अनुभव घेऊन भारतात परतण्यासाठी व भारतीय आरोग्यव्यवस्थेचे मूल्य उंचावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.-Ends-

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अपोलो एज्युकेशन तर्फे ‘इंटरनॅशल क्लिनिकल फेलोशीप प्रोग्रॅम’ लाँच ‘कमवा आणि शिका’ पद्धतीने एमएस/एमडी/डीएनबी डॉक्टर्सना आरोग्यव्यवस्थेचे मूल्य उंचावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते"

Leave a comment

Your email address will not be published.


*