मोंटेरिया व्हिलेज तुमच्या कुटुंबासाठी आणत आहे ‘द कबिला’ अनुभव, मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर, ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली, पारंपरिक जेवण-मनोरंजन लुटा ‘ग्लॅम्पिंग’ चा आनंद

मुंबई, २५ जून 2022 (GPN): रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोंतेरिया व्हिलेज हा मुंबई व पुणे शहरांपासून केवळ दोन तासांच्या अंतरावरील एक छोटा वीकेण्ड गेटवे, पर्यटकांना ‘द कबिला’ (कबिल्यात राहण्याचा) अनुभव देण्यास सज्ज आहे. वंजारी या भटक्या समाजापासून प्रेरित ‘द कबिला’ म्हणजे शहराच्या धकाधकीपासून दूर भटक्या आयुष्याचा अनुभव निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. यामध्ये साधेपणा व आधुनिक आयुष्यातील आरामदायी सुविधांचा परिपूर्ण तोल साधण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला अत्यंत आवश्यक अशी विश्रांती घेण्यासाठी व नव्याने ऊर्जा प्राप्त करण्यासाठी एक छान कारण मिळत आहे. मोंटेरिया खेड्यातील 36 एकर परिसरात पसरलेल्या ‘द कबिला’ मध्ये ५० सुसज्ज तंबू चमचमणाऱ्या ताऱ्यांच्या अस्सल ग्राम्य वातावरणात तयार केले आहेत. या कॅम्पसाइटवर पाहुण्यांसाठी २६ सुसज्ज टॉयलेट्स व बाथरूम्सही आहेत. मोंटेरिया गाव कॅम्पर्सना अनेक अनोखे अनुभव व आकर्षक उपक्रम उदा. कला, संस्कृती व पारंपरिक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाची एक झलक पर्यटकांना दाखवते.

The Kabila Glamping – By Monteria Village

राही वाघानी, व्यवस्थापकीय संचालक, मोंटेरिया रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले,“पाहुण्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देणाऱ्या आमच्या सुविधांमध्ये ‘द कबिला’ने मोठी भर घातली आहे. शहरी दिनक्रमात तुम्हाला अत्यंत आवश्यक असलेला विरंगुळा येथे मिळेल आणि बंजारा शैलीतील मुक्काम व्यवस्था तुमच्या मनात अनेक आठवणी जाग्या करेल. तंबूच्या आसपासच्या परिसरात निवांत भटकण्यापासून ते झाडांच्या सावलीत टांगलेल्या झोक्यांवर विश्रांती घेण्यापर्यंत, निसर्गाच्या सौंदर्यात बुडून जाण्याच्या व आयुष्यातील क्षण नव्याने जगून घेण्याच्या अनेक संधी ‘द कबिला’ तुम्हाला देत आहे. मोंतेरिया गावातील या ताज्यातवान्या गेटवेच्या माध्यमातून आपल्या मुळांकडे परत जाण्याचा अनुभव मिळणार आहे.” अनुभवलेच पाहिजेत असे पाच उपक्रम – १) खेड्यातून एक निवांत फेरफटका – कॅम्पसाइटवर स्थिरस्थावर झाल्यानंतर या प्रॉपर्टीतील ग्रामीण वातावरण अनुभवण्यासाठी खेड्यात फेरफटका मारण्याखेरीज पर्याय नाही. हिरव्यागार शेतांतून, कच्छी घरांतून हिंडून या. सरपंचांचे घर बघा. गौशाळेला भेट द्या. धबधबे, बोगदे बघा. बांबूच्या शेतात फिरून या आणि देवळात दर्शन घ्या. आता वापरात नसलेल्या कामचलाऊ रेल्वे स्थानकावरील रुळांवरून फिरून या आणि नक्षत्र गार्डनमध्ये उमललेल्या फुलांचा आनंद लुटा. २) तलावात बुडी मारा: या खेड्यामध्ये तलाव हा सर्वांत ताजेतवाने करणाऱ्या अनुभवांपैकी एक आहे. नैसर्गिक झऱ्यांचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्याचा काळ उत्तम आहे. एरवीही तलावात पोहण्याचा आनंद घ्या किंवा नुसतेच पाण्याचे तुषार उडवून घ्या. ३) जत्रा आणि खाऊची रेलचेल: दररोज संध्याकाळी गावात जत्रा भरते आणि ती बघण्यासारखी असते. लोककलेच्या व्यासपीठावर लोकनृत्य, संगीत व नौटंकी (मनोरंजक कला सादरीकरण) जत्रेत असते. ही कला विचारांना खाद्य देते, तर या ग्रामीण भागातील स्टॉल्सवर खाण्यापिण्याच्या पदार्थांचीही रेचलेच असते. गावातील विक्रेत्याचा कडक चहा अजिबात चुकवू नका. जवळपासच्या खेड्यांतील स्त्रिया चालवत असलेल्या कार्यशाळांत तयार केली जाणारी लोणची व पापड घरी घेऊन जा. सबरस या भारतीय रेस्टोरंटमधील पूर्ण थाळीचा आस्वाद घ्या. ४) हस्तकलेची खरेदी – बांबूचे विणकाम करणाऱ्यांनी तयार केलेली उत्पादने तसेच फर्निचर खरेदी करा. या गावात सुतारकाम, लोहारकाम, न्हावीकाम, शिवणकाम, कुंभारकाम व सायकल दुरुस्तीच्या कार्यशाळाही आहेत. ५) पारंपरिक खेळ खेळा – गोट्या, चकदो राइड, अडथळ्यांची शर्यत व झाडाभोवती झोके घेण्यासारख्या पारंपरिक खेळांची मजा घ्या. पाहुणे शेतीकामाचाही अनुभव घेऊ शकतात.ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "मोंटेरिया व्हिलेज तुमच्या कुटुंबासाठी आणत आहे ‘द कबिला’ अनुभव, मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर, ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली, पारंपरिक जेवण-मनोरंजन लुटा ‘ग्लॅम्पिंग’ चा आनंद"

Leave a comment

Your email address will not be published.


*