व्हिएटजेटने व्हिएटनामसाठी चार नवीन मार्ग उघडले जेणेकरून आपल्या प्रवाशांना भारत आणि व्हिएटनाम या मार्गावर सर्वात जास्त उड्डाण क्षमता उपलब्ध करून देत आहे

Mr. Nguyen Anh Tuan, Member of the Board of Directors of Vietjet presents a souvenir gift to Mr. Hoang Tung, Chief of Mission, Consulate General of Vietnam in Mumbai

Ms Phan Thi Thang, Vice Chairwoman of People’s Committee of Ho Chi Minh City, Mr. Hoang Tung, Chief of Mission, Consulate General of Vietnam in Mumbai, Mr. Nguyen Anh Tuan, Member of the Board of Directors of Vietjet and other high-ranking dignitaries joined the ceremonial ritual for the new routes’ announcement.

Mr. Nguyen Anh Tuan, Member of the Board of Directors of Vietjet announces the airline’s new routes

मुंबई, 22 जून 2022 (GPN)व्हिएटजेटने अधिकृतरित्या अजून चार सेवा सुरू केल्या आहेत जेणेकरून भारत आणि व्हिएटनामच्या उत्तम गंतव्यस्थानांना जोडले जात असून त्यात मुंबई – हो ची मिन्ह सिटी/हनोई मार्ग आणि नवी दिल्ली/मुंबई – फ्यू क्वॉक सेवांचा समावेश आहे. 

भारत आणि व्हिएटनाम यांच्या राजनैतिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण होत असून हो ची मिन्ह सिटीचे नेते मुंबईत दौऱ्यावर असताना नव्या मार्गांचा लोकार्पण सोहळा मुंबईत पार पडला. हो ची मिन्ह सिटीच्या पीपल्स कमिटीच्या व्हाइस चेअरवुमन फान थी थांग, मुंबई येथील व्हिएटनामच्या वाणिज्य दूतावासाचे प्रतिनिधी आणि व्हिएटजेटच्या नेत्यांसह या सोहळ्याला उपस्थित होते. 

9 सप्टेंबर 2022 पासून मुंबई – फ्यू क्वॉक मार्गावर दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार चार साप्ताहिक उड्डाणे चालविली जाणार आहेत. नवी दिल्ली ते फ्यू क्वॉक दरम्यानची सेवा सुद्धा 9 सप्टेंबर 2022 रोजी सुरू करण्यात येणार आहे आणि सप्ताहातून तीन दिवस म्हणजेच बुधवार, शुक्रवार आणि रविवार, अशी तीन उड्डाणे होतील. जून, 2022 च्या सुरूवातीस हो ची मिन्ह सिटी/हनोई – मुंबई मार्ग सुरू करण्यात आले होते. 

दोन्ही देशांच्या दोन पहिल्या थेट सेवा, ज्या नवी दिल्लीला हो ची मिन्ह सिटी/हनोईशी जोडतात, या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल महिन्यात पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक मार्गासाठी दर आठवड्याला तीन ते चार विमानांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. प्रवाश्यांना आता या मार्गांचे विमान तिकीट बुक करता येईल आणि एका दिशेने जाण्यासाठीचे भाडे 18 अमेरिकन डॉलर्सपेक्षा कमीने सुरू होत आहे. (*)

गुयेन थान सोन, व्हिएटजेटचे उपाध्यक्ष म्हणाले की: “व्हिएटजेटच्या व्हिएटनाम-भारताच्या उड्डाण नेटवर्कच्या विस्तारामुळे दोन्ही देशांमधील प्रवासी संधानता आणि व्यापारी संबंधांना प्रोत्साहन  मिळेल आणि ते अधिक मजबूत होतील. आम्ही असे पहिले वाहक आहोत ज्यांनी व्हिएटनामचे सर्वांत मोठे शहर हो ची मिन्ह आणि त्याची राजधानी हनोई व भारताची राजधानी नवी दिल्ली यांच्यात थेट सेवा चालविली आहे.”

श्री. सोन पुढे असेही म्हणाले की, “व्हिएटनाम आणि भारत यांच्यातील सहा थेट मार्गांचा समावेश असलेल्या व्हिएटजेटच्या उड्डाणाचे नेटवर्क, हे 1972 पासून दोन्ही देशांच्या 50 वर्षांच्या राजनैतिक संबंधांमध्ये एक महत्वपूर्ण टप्पा बनला आहे. आमच्या प्रवाश्यांना सर्वोत्तम उड्डाणाचा अनुभव प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबरोबरच सेवेची गुणवत्ता सातत्याने वाढवत असताना येत्या काळात आम्ही दोन्ही देशांमधील उड्डाण संबंधांचा उत्तरोत्तर विस्तार करणार आहोत.”

प्रत्येक लेगमागे केवळ पाच तासांएवढी उड्डाणाची वेळ आणि आठवडाभरात नानाविध उड्डाणांचे वेळापत्रक यामुळे व्हिएटजेटच्या थेट उड्डाणांमुळे भारतातून हनोई, हो चि मिन्ह सिटी आणि फु-क्वॉकसह अशा व्हिएटनामच्या ‘स्मरणीय भूमीत’ प्रवास करणे सोयीस्कर झाले आहे. प्रवासी आता व्हिएटनामच्या  इतर आकर्षक गंतव्यस्थानांशी, जसे की, हा लाँग बे, दा नांग आणि मध्य भूमीतील प्रसिद्ध वारसा स्थळे, इत्यादींना सहजपणे भेट देऊ शकतात किंवा व्हिएटजेटच्या विस्तृत आंतरराष्ट्रीय नेटवर्कमुळे साऊथईस्ट आणि नॉर्थईस्ट आशियामध्ये जलदरीत्या स्थानांतरीत होऊ  शकतात. व्हिएटनाम आणि भारत दरम्यान व्हिएटजेटच्या थेट  उड्डाणांमुळे  पर्यटकांना भारतातील विविध संस्कृती, धर्म, पाककला आणि पर्यटन आकर्षणांचा शोध घेता आला आहे. 
व्हिएटनामने कोव्हिड -19 शी संबंधित आगमन नियम काढून टाकले आहेत आणि प्रवासी व्हिएटनाममध्ये पूर्णतः महामारी-आधीच्या फॅशनचा आनंद लुटू शकतात. भव्य दृश्यांना भेट देणाऱ्या आणि त्याचा शोध घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या स्वागतासाठी हा एस-आकाराचा देश सगळ्या परीने आता तयार आहे. 
(*) कर आणि शुल्क वगळता 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "व्हिएटजेटने व्हिएटनामसाठी चार नवीन मार्ग उघडले जेणेकरून आपल्या प्रवाशांना भारत आणि व्हिएटनाम या मार्गावर सर्वात जास्त उड्डाण क्षमता उपलब्ध करून देत आहे"

Leave a comment

Your email address will not be published.


*