
Neonatal Ambulance By Pinnacle Industries Ltd.

Neonatal Ambulance By Pinnacle Industries Ltd.

Pinnacle Industries Limited – Pinnacle Social & Charitable Foundation
पिनॅकल इंडस्ट्रीजने डिझाइन व विकासित केलेल्या पाच नवजातशिशू रुग्णवाहिकांना मंजुरी मिळाली आहे आणि नवजात शिशूंना सर्वोत्तम वैद्यकीय तसेच आपत्कालीन सेवा पुरवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारला त्या पुरवण्यात आल्या आहेत.
मुंबई, 26 मे, 2022 (GPN): पिनॅकल इंडस्ट्रीज या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव आसनव्यवस्था, अंतर्गत रचना व स्पेशॅलिटी वाहन कंपनीने, खास महाराष्ट्र सरकारसाठी विकसित केलेल्या मंजुरीप्राप्त नवजातशिशू रुग्णवाहिकांची (निओनेटल अँब्युलन्स) नवीनतम श्रेणी सर्वांपुढे आणली आहे. या रुग्णवाहिका नवजात अर्भकांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीने आवश्यक वैद्यकीय सुविधांनी व प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. नवजात अर्भकांना प्रगत जीवनरक्षक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 5 नवजातशिशू रुग्णवाहिका महाराष्ट्र सरकारच्या सुपूर्त केल्याची घोषणा कंपनीने आज केली.
पिनॅकल इंडस्ट्रीजकडे अँब्युलन्स व नॉन-अँब्युलन्स प्रवर्गातील अनेक प्रकारची आरोग्यसेवा उत्पादने विकसित करण्याचे विशेष कौशल्य आहे. नवजातशिशू रुग्णवाहिका या विशेषत्वाने बालक/नवजात अर्भकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आल्या आहेत. यांत जीवाणूरोधक एबीएस इंटर्नल पॅनल्सच्या फॅब्रिकेशनवर भर देण्यात आला आहे. या रुग्णवाहिकांच्या आंतरिक भागाच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेले एबीएस मटेरिअल हे पाणी न झिरपणारे आहे आणि त्यावर जंतूनाशकांचा परिणाम होत नाही. नवजातशिशू रुग्णवाहिका तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य संबंधित एफआर अँड ऑटोमोटिव ग्रेड नियमांची पूर्तता करणारे आहे. रुग्णवाहिकांची रचना एर्गोनॉमिक पद्धतीने करण्यात आली असून यात डॉक्टर, परिचर्या कर्मचारी व 4 अटेण्डंट्ससाठी आरामदायी आसनव्यवस्था आहे. आपत्कालीन परिस्थितीत हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल अशा पद्धतीने या रुग्णवाहिका सुसज्ज करण्यात आल्या आहेत तसेच ऑटोमोटिव्ह नियमांनुसार सर्व सोयीसुविधा यांत आहेत. पिनॅकल इंडस्ट्रीजद्वारे तयार करण्यात आलेल्या सर्व नवजातशिशू रुग्णवाहिकांमध्ये बाहेरून वीजपुरवठ्याची तरतूद आहे, जेणेकरून, वाहन उभे करून ठेवले असतानाही (स्टेशनरी अवस्थेत) पॉवर ग्रिड स्रोतामार्फत सर्व वैद्यकीय उपकरणे चालू अखंडितपणे चालू ठेवता येतील.

Mr. Arihant Mehta, Director, Pinnacle Industries Limited and Founder
Pinnacle Social & Charitable Foundation
पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष श्री. अरिहंत मेहता या सहयोगाबद्दल म्हणाले, “भारतात आरोग्यसेवा संरचना वेगाने विकसित केली जात आहे आणि आम्ही पिनॅकल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून भारतात जागतिक दर्जाच्या आरोग्यविषयक वाहतूक सुविधा पुरवण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. ज्या नवजात अर्भकांना स्पेशालिस्ट उपचार व क्रिटिकल केअर आवश्यक आहे त्यांना तातडीने इकडून तिकडे हलवण्याच्या दृष्टीने आमच्या नवजातशिशू रुग्णवाहिकांच्या नवीन श्रेणीची रचना व बांधणी करण्यात आली आहे. आम्ही आज महाराष्ट्र सरकारला 5 नवजातशिशू रुग्णवाहिकांचा ताफा सुपूर्त केला आहे आणि अशा पद्धतीच्या 50हून अधिक वाहनांसाठी अनेकविध एजन्सींशी आमची बोलणी सुरू आहेत. अशा उपक्रमांमुळे आदिवासी-शहरी-महानगर भागांत नवजात शिशूंवरील उपचारांमधील आव्हाने कमी करण्यात मदत होईल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”
या खास तयार करण्यात आलेल्या रुग्णवाहिका भारताच्या सर्व कोपऱ्यांत चालवण्यासाठी आदर्श आहेत आणि अधिक स्पेशालिस्ट आपत्कालीन सेवा व क्रिटिकल केअर आवश्यक असलेल्या
नवजातशिशूंना तातडीने व सुरक्षितपणे हलवण्यासाठी या रुग्णवाहिका उपयुक्त आहेत. ईएन 1789 मानकाची पूर्तता करून अनन्यसाधारण शैलीत विकसित करण्यात आलेल्या या रुग्णवाहिका म्हणजे बालकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यकतांची पूर्तता करणारे संपूर्ण पॅकेज आहे आणि स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या उत्कृष्ट आहेत. पिनॅकल इंडस्ट्रीजने तयार केलेल्या या नवजातशिशू रुग्णवाहिकांमध्ये आधीपासून बसवण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांमध्ये इनक्युबेटर, स्ट्रेचर, अर्भकांसाठी ऑक्सिजन कॉम्प्रेसर, डिफायब्रिलेटर, मल्टि पॅरा मॉनिटर, सक्शन पम्प, इन्फ्युजन पंप व नियमांनुसार रुग्णवाहिकांमध्ये आवश्यक असलेल्या सर्व वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.
पिनॅकल इंडस्ट्रीज ही भारतातील आघाडीची ऑटोमोटिव आसनव्यवस्था, अंतर्गतरचना, ईव्ही घटक व स्पेशालिटी वाहन कंपनी आहे. एका बाय पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स ही त्यांची उपकंपनी, भारत सरकारच्या ऑटो पीएलआय धोरणाखालील चॅम्पियन ओईएम स्कीम आणि ईव्ही घटक उत्पादन योजनेखाली मान्यता प्राप्त झालेल्या एकमेव व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक आहे.
Be the first to comment on "पिनॅकल इंडस्ट्रीजने महाराष्ट्र सरकारला पुरवल्या नवजातशिशू रुग्णवाहिका"