
Cast of Sony SAB’s Pushpa Impossible
मुंबई, २५ मे २०२२ (GPN):”लाइफने फुल टाइम मुझसे फिल्डिंग ही करायी है, इसलिए अब मैं सिर्फ बॅटिंग करती हूँ” – पुष्पा तिच्या या वाक्यामधून तिचे अतूट धैर्य व चिकाटी दिसून येते. ती तिच्या मुलांमध्ये गुंतून राहणारी विशिष्ट ‘मॉं‘ नाही आणि ती तिच्या खडतर जीवनामुळे हार देखील मानत नाही. तिच्या विनम्र व मेहनती बाह्यगुणांमध्ये एक महिला आहे, जी जीवनातील लहान-लहान आनंदामध्ये स्वत्वाचा शोध घेते. तिला क्लासिक हिंदी चित्रपट गाणी आवडतात आणि ती क्रिकेटची चाहती आहे. आणि आता तिला व तिच्या जीवनगाथेला जाणून घेण्याची वेळ आली आहे. सोनी सब जीवनाचे सार दाखवणारी कथा ‘पुष्पा इम्पॉसिबल‘ घेऊन येत आहे. ही मालिका एका महिलेच्या जीवनगाथेला आणि तिचे कुटुंब व समाजामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून सन्मान मिळवण्याच्या तिच्या प्रयत्नामधील अपवादात्मक परिवर्तनाला दाखवते. करूणा पांडे दिग्दर्शित ही मालिका महिलेच्या नशीबाला बळी न पडता स्वत:च्या नशीबामध्ये चॅम्पियन ठरण्याच्या कथेला सादर करते. ‘पुष्पा इम्पॉसिबल‘ सुरू होत आहे ६ जूनपासून रात्री ९.३० वाजता फक्त सोनी सबवर.

Karuna Pandey as Pushpa in Sony SAB’s Pushpa Impossible

Karuna Pandey as Pushpa in Sony SAB’s Pushpa Impossible
‘पुष्पा इम्पॉसिबल पाटण, गुजरातमधील अशिक्षित, पण स्वावलंबी महिलेच्या कथेला सादर करते, जी अनेक नोक-या केल्यानंतर आता उदरनिर्वाहासाठी आणि तिच्या तीन मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तिच्या मुंबईतील चाळीच्या खोलीतून टिफिन सेवा चालवते. कुटुंबाला आनंदित ठेवण्यासाठी आणि नकारात्मक गोष्टींमुळे खचून न जाण्यासाठी तिच्या सातत्यपूर्ण संघर्षाने तिला बिनधास्त व धाडसी बनवले आहे. ती स्वत:बाबत, तसेच स्वत:च्या महत्त्वाकांक्षांबाबत फारसा विचार करत नाही. पण पुष्पाला एका गोष्टीचा जास्त पश्चात्ताप होतो, ते म्हणजे ती तिचे शिक्षण पूर्ण करू शकली नाही.’
घर चालवण्याच्या आणि अस्तित्वाच्या दबावाखाली अडकलेल्या पुष्पाचे अपुरेपणाचे क्षण तिला समाजाच्या रूढींमध्ये खचून न जाता अधिक उत्तम कामगिरी करण्यास प्रेरणा देतात. जीवनाला सामोरे जात असताना एकेदिवशी ती प्रखर वास्तविकतेमध्ये अडकून जाते, जेथे तिच्या मुलांना तिची लाज वाटते. पुष्पाला वाटते की अशिक्षित असल्यामुळे तिच्या मुलांना तिची लाज वाटते आणि समाज तिला पात्र असलेला सन्मान देत नाही. त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याचा आणि भाग्य बदलण्याचा तिचा विलक्षण प्रवास सुरू होतो आणि ती जीवनात सन्मान व आदर मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करते.
हॅट्स ऑफ प्रॉडक्शन निर्मित मालिका ‘पुष्पा इम्पॉसिबल‘मध्ये प्रतिभावान कलाकार आहेत जसे नवीन पंडित, दर्शन गुर्जर, देष्ना दुगद, गरिमा परिहर आणि भक्ती राठोड. फक्त सोनी सबवर ‘पुष्पा इम्पॉसिबल‘मध्ये अनेक भावनांसह प्रेरणेचा प्रबळ डोस घेण्यास सज्ज राहा.
मते:
श्री. नीरज व्यास, व्यवसाय प्रमुख – सोनी सब
”’पुष्पा इम्पॉसिबल‘ ही एका महिलेची कथा आहे, जी तिच्या जीवनातील निवडींमध्ये अनोखी आहे, तिच्या आत्मविश्वासाबाबत अस्पष्ट आहे आणि भारतीय टेलिव्हिजनवरील पारंपारिक मातांपेक्षा वेगळी आहे. स्वत:चे कुटुंब व समाजामध्ये सन्मान मिळवण्याचा तिचा प्रयत्न तिला व्यक्तीच्या जीवनात शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून देतो. तिच्यासाठी आदर व शिक्षण दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि तिची दोन्ही प्राप्त करण्याची आकांक्षा आहे. आम्हाला करूणा पांडेच्या रूपात परिपूर्ण ‘पुष्पा‘ मिळाल्याचा आनंद होत आहे. ती प्रतिभावान व आत्मविश्वासू आहे. आम्ही आशा करतो की, प्रेक्षक खुल्या मनाने पुष्पाचे स्वागत करतील.”
जेडी मजेठिया, संस्थापक, हॅट्स ऑफ प्रॉडक्शन्स
”मालिका ‘पुष्पा इम्पॉसिबल‘मध्ये आम्हाला एका आईची कथा सादर करण्याचा आनंद होत आहे, जी कमकुवत असताना देखील जीवनाचा सामना करण्यास प्रबळ आहे. ती कोणाकडून पालनपोषण केले जाण्याची वाट पाहणारी महिला नाही. तिने स्वत: स्वावलंबी बनण्याचा निर्धार केला आहे आणि हा प्रवास इतरांपेक्षा वेगळा असेल. जीवनात सुलभ मंत्र असलेली उत्साही महिला ‘इम्पॉसिबल‘ला देखील ‘आय अॅम पॉसिबल‘ करू शकते. या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्रीचा शोध घेणे अवघड होते, आम्ही खूप शोध घेतला आणि पुष्पाची भूमिका साकारण्यासाठी कोमलता, प्रतिभा व कौशल्यांचे संयोजन असलेली अभिनेत्री करूणा सापडली. आम्हाला पुन्हा एकदा सोनी सबसोबत सहयोग करण्याचा आणि प्रेक्षकांना आणखी एक जीवनाचे सार दाखवणारी मालिका सादर करण्याचा आनंद होत आहे. ही मालिका निश्चितच देशभरातील महिलांशी संलग्न होईल.”
पहा ‘पुष्पा इम्पॉसिबल‘ ६ जूनपासून दर सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त सोनी सबवर
Be the first to comment on "सोनी सब सादर करत आहे ‘पुष्पा इम्पॉसिबल’! आदर आणि सन्मानाचे जीवन मिळवण्याचा प्रयत्न करणा-या एका महिलेच्या अपारंपरिक प्रवासाची कथा"