
L-R: Ankit Raaj, Faizal Khan, N P Singh, Neeraj Vyas, Abhimanyu Singh, Toral Rasputra, Parul Chauhan and Angad Hasija

L-R: Angad Hasija, Toral Rasputra, Faizal Khan, Parul Chauhan and Ankit Raaj

Faizal Khan
पहा हा व्हिज्युअल आविष्कार टेलिव्हिजन स्क्रीन्सवर १४ मार्चपासून दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता
मुंबई, ७ मार्च २०२२ (GPN): भारतीय पौराणिक कथेनुसार गरुडाचे पंख हे त्याचे सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक होते, जे विश्वाच्या भ्रमणावर परिणाम करू शकतात. गुलाम म्हणून जन्म घेतलेल्या आणि आपल्या राजवंशाबाबत अनभिज्ञ असलेल्या गरूडाने अतूट समर्पितता व अद्वितीय धैर्य दाखवले, जे भारतीय पुराणामध्ये कोरले गेले. आणि आता ती कथा जाणून घेण्याची वेळ आली आहे. सोनी सब प्रेमळ व एकनिष्ठ मुलगा धर्म योद्धा गरूडची न सांगण्यात आलेली गाथा सादर करत आहे. भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता फैझल खान प्रमुख भूमिकेत असलेली मालिका ‘धर्म योद्धा गरूड‘ नि:स्वार्थीपणा,प्रामाणिकपणा, आज्ञाधारकता व शौर्य यांच्याशी संलग्न असलेला भगवान विष्णूचा भक्त व वाहन गरूडला सादर करते. मालिका ‘धर्म योद्धा गरूड‘ सुरू होत आहे १४ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता फक्त सोनी सबवर.
मालिका ‘धर्म योद्धा गरूड‘ गरूडाच्या जन्मासह सुरू होते. तो महान ऋषी कश्यप व विन्ता यांचा पक्षी-मानव मुलगा म्हणून जन्म घेतो. त्याच्यामध्ये अविश्वसनीय सामर्थ्य व शक्ती असते. तरीदेखील त्याला त्याची दुष्ट काकी कद्रू व त्याच्या चुलत भावंडांसह कालिया व १००० सापांच्या आदेशांचे पालन करावे लागते. कथानक आई-मुलाच्या नात्यामधील अद्वितीय पैलू आणि प्रत्येक सरत्या दिवसासह ते कशाप्रकारे बहरत जाते,तसेच ते सामना करणा-या आव्हानांना दाखवते. गुलामगिरीमध्ये जन्म घेतल्यामुळे गरूड त्याच्या आईच्या दुर्दशेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. सर्व विषमतांवर मात करत तो लढण्याचे धाडस दाखवतो आणि त्याच्या आईला गुलामगिरीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येकवेळी ती त्याला थांबवते. विन्ता गरूड पासून कोणते रहस्यमय गुपित लपवत आहे? गरूडची आई विन्ताप्रती एकनिष्ठता आणि या विश्वामध्ये त्याच्या कर्तव्याप्रती समर्पितता त्याला ‘धर्म योद्धा गरूड‘ बनवतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञान व व्हीएफएक्सचा समावेश असलेली मालिका ‘धर्म योद्धा गरूड‘ रिअल-टाइम व्हर्च्युअल प्रॉडक्शन टेक्निक – अल्टिमेटचा वापर करत निर्माण करण्यात आली आहे. पहिल्यांदाच भारतीय टेलिव्हिजनवर अल्टिमेटचा वापर करण्यात आला आहे. इल्यूजन रिअॅलिटी स्टुडिओजने मालिकेसाठी अद्भुत व्हीएफएक्सवर काम केले आहे. ही मालिका सोनी सबचे अभूतपूर्व कथानक सादर करण्याचा भव्य प्रयत्न आहे. मालिका ‘धर्म योद्धा गरूड‘मध्ये प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत जसे अंकित राज, पारूल चौहान, तोरल रासपुत्र, ऋषिकेश पांडे, विशाल करवाल,अमित भानुशाली. ‘धर्म योद्धा गरूड‘ ही कौटुंबिक नाते, शौर्य व निर्धाराची प्रेरणादायी कथा आहे, जी निश्चितच सर्वांना अचंबित करण्यासोबत सोनी सबवर सर्वांचे लक्ष वेधून घेईल.
मते:
श्री. नीरज व्यास, व्यवसाय प्रमुख – सोनी सब
”सोनी सबवर ‘धर्म योद्धा गरूड‘ सारखी महान कलाकृती सादर करण्याचा झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. ही मालिका शौर्य, समर्पिता व आई-मुलाच्या नात्याच्या यापूर्वी न ऐकण्यात किंवा न दिसण्यात आलेल्या पौराणिक कथेला सादर करते. भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञान व व्हिज्युअल इफेक्ट्स सादर करत आम्ही व्हिज्युअल अनुभवाची निर्मिती केली आहे, जे प्रेक्षकांना अचंबित करतील. ‘धर्म योद्धा गरूड‘ आमच्या विस्तारित होणा-या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमधील विश्वसनीय मूल्यवर्धित भर आहे आणि आम्ही आशा करतो की, प्रेक्षक भारतीय पौराणिक कथेच्या या दिसण्यात न आलेल्या अध्यायाला सकारात्मक प्रतिसाद देतील.”
श्री. अभिमन्यू सिंग, निर्माता, ‘धर्म योद्धा गरूड‘
”आमच्यासाठी यापेक्षा मोठी बाब कोणतीच असू शकत नाही. ‘धर्म योद्धा गरूड‘ ही सर्व पैलूंमध्ये एपिक मालिका आहे. या असाधारण पात्राची न ऐकण्यात आलेली कथा दाखवण्यासोबत आम्ही भारतीय टेलिव्हिजनवर एक भव्य तंत्रज्ञान आविष्कार आणले आहे. वॉरियर गॉडची ही कथा स्क्रीनवर आणण्यासाठी झालेला आनंद व्यक्त करण्याकरिता आमच्याकडे शब्द नाहीत. गरूडची समर्पितता, शक्ती, शौर्य व सन्मानाची कथा स्क्रीनवर सादर करण्यात येत आहे. भारतीय प्रेक्षकांना पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर काही भव्य व्हर्च्युअल प्रॉडक्शन टेक्निक्स,व्हीएफएक्स व हाय-टेक ग्राफिक्सचे पुरस्कार-प्राप्त संयोजन पाहायला मिळेल.
पहा ‘धर्म योद्धा गरूड‘ १४ मार्चपासून दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त सोनी सबवर
Be the first to comment on "सोनी सब सादर करत आहे पक्ष्यांच्या राजाची न सांगण्यात आलेली कथा सांगणारी महान पौराणिक कलाकृती ‘धर्म योद्धा गरूड’"