- मेड इन इंडिया एअर कंडीशनर्सची मोठी मालिका सादर
- कोव्हिड-पूर्व पातळीवर जात गेल्या उन्हाळ्यापेक्षा दुपटीहून जास्त वाढ असलेले प्रकल्प

Mr. Santosh Salian, Head of Production Group, Godrej Appliances
मुंबई, २४ फेब्रुवारी २०२२ (GPN): गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसची व्यवसाय शाखा गोदरेज अॅप्लायन्सेसतर्फे अॅडव्हान्स्ड कुलिंग, हवा शुद्धीकरण तंत्रज्ञान, आयओटी कंट्रोल्स, इतर अनेकविध वैशिष्ट्ये यांसह एअर कंडीशनर्सची मोठी मालिका सादर करत असल्याची घोषणा केली आहे. वेगाने तंत्रज्ञान कुशल होत असलेल्या ग्राहकांसाठी हे एअर कंडीशनर्स स्मार्ट कंट्रोल्स पुरवितात. जोडीला आयओटीच्या द्वारे आराम आणि सुरक्षितता, युव्ही कुल तंत्रज्ञान, नॅनो कोटेड विषाणू प्रतिबंधक गाळणी, कमी ऊर्जा रेटिंग आणि इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.
मोठ्या प्रमाणावर झालेली इंटरनेट जोडणी आणि स्मार्ट फोन्सचा वाढता वापर यातून ग्राहक वर्तणुकीत क्रांतिकारी बदल झाला आहे. महामारीमुळे सर्वांचीच डिजिटल ओळख खूप जास्त वाढली आहे. साहजिकच तंत्रज्ञानक्षम उपकरणांसाठीची मागणीही वाढली आहे. स्मार्ट एसीसाठी असलेली ग्राहकांची वाढती मागणी पुरविताना गोदरेज अॅप्लायन्सेसने एअर कंडीशनर्सची आपली नवी गोदरेज इऑनडी मालिका सादर केली आहे आणि आधीपासूनच्या काही उत्पादनांमध्येही हे नवे तंत्रज्ञान समाविष्ट केले आहे. हे स्मार्ट एअर कंडीशनर्स वायफाय सक्षम आहेत. अॅलेक्सा आणि गुगल होम कम्पॅटिबिलीटीच्या मदतीने हे एसी ध्वनी सक्षमही आहेत. तापमान नियंत्रण, पंख्याचा वेग, मोड सेटिंग, शेड्युल टायमिंग तसेच एकूणच एसीची देखभाल या गोष्टी लांबूनच अँड्रॉईड स्मार्टफोनच्या द्वारे करता येऊ शकतात. दुरूनच करता येणारे नियंत्रण आणि देखभाल याद्वारे ग्राहकांना आराम मिळावा आणि त्यांची सोय व्हावी हा उद्देश आहे.
महामारीमुळे ग्राहक खरेदी करत असलेल्या प्रत्येक उत्पादनामध्ये आरोग्य आणि स्वच्छता या गोष्टींवर मोठा भर दिला जात आहे. गोदरेज एसी मध्ये समाविष्ट करण्यात आलेले एकदम नवीन युव्ही कुल तंत्रज्ञान हवा निर्जंतुक करण्याबरोबरच ज्या खोलीत एसी कार्यान्वित आहे तेथील कापडी, लाकडी, धातूच्या वस्तूंवरील पृष्ठभागही निर्जंतुक करते. एसीच्या आत बाष्पीभवन होत असलेल्या ठिकाणी युव्ही मोड्युल ठेवलेले असते. त्यातून २६०-२७५ एनएम रेंज मध्ये युव्हीसी किरण उत्सर्जित होतात. युव्ही मोड्युल मधून बाहेर पडणारी ही सर्वात मोठी वेव्हलेंग्थ आह. ९९.९९% विषाणू कण, जीवाणू, बुरशी आणि बाष्पीभवकाच्या पृष्ठभागावरील इतर हवेचे दुषित कण निर्जंतुक करायला ती पुरेशी आहे. त्याही पुढे जाऊन ग्राहकांना सुरक्षितता पुरविताना नॅनो कोटेड विषाणू प्रतिबंधक गाळणी हवेतून ९९.९% हून अधिक विषाणू कण दूर करते.
जोडीला, इलेक्ट्रॉनिक विस्तारित व्हॉल सोबत हेवी ड्युटी रोटरी इन्व्हर्टर कॉम्प्रेसर आणि सर्वोत्तम रचना कमी ऊर्जा रेटिंगसह वेगवान आणि प्रभावी कुलिंग पुरविते. अगदी ५२ अंश सेल्सिअस सारख्या उच्च तापमानालाही खूप चांगला थंडावा मिळतो. हे एसी आर२९० आणि आर ३२ रेफ्रीजेरंट यांच्यासह उपलब्ध आहेत. शून्य ओझोन ऱ्हास आणि कमी प्रमाणात होणारे ग्लोबल वॉर्मिंग पोटेंशीयल असलेले हे पर्यावरण-पूरक उत्पादन आहे.
या उत्पादन सादरीकरणाबाबत बोलताना गोदरेज अँड बॉयसचा भाग असलेल्या गोदरेज अॅप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “’विचारपूर्वक गोष्टी बनवणे’ या आमच्या तत्वज्ञानाला अनुसरून आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहोत. आमचा एकजिनसी उत्पादन विस्तार आमच्या ग्राहकांना अधिक डिझाईन शक्यतांसह अधिक विस्तृत एसी पोर्टफ़ोलिओ सादर करण्यासाठी मदत करत आहे. २०२१ मध्ये एसीसाठीची उन्हाळ्यातील विक्री २०२० उन्हाळ्यापेक्षा जास्त असली तरी व्यवसाय अजूनही कोव्हीडपूर्व पातळीला पोहोचलेला नाही. तिसरी लाट व्यावहारिकदृष्ट्या संपलेली असताना आणि लसीकरण मोहीमेने मोठी लोकसंख्या सामावून घेतलेली असताना वाढत्या तापमानाबरोबर मागील वर्षाच्या तुलनेत आमच्या एसीच्या विक्रीतही दुपटीने वाढ होईल अशी आम्हांला आशा आहे.”
गोदरेज अॅप्लायन्सेसचे उत्पादन समूह प्रमुख संतोष सालियन पुढे म्हणाले, “स्मार्ट एअर कंडीशनर्स आणि आरोग्य आणि स्वच्छता विभागातील आमचा प्रवेश म्हणजे आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त भविष्यासाठी तयार उत्पादने पुरवून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही जपलेल्या बांधिलकीची पावती आहे. यंदाच्या उन्हाळ्यात आम्ही २१ नवीन इन्व्हर्टर स्प्लीट एसी सादर करण्यासाठी तयार आहोत. या सर्वांमध्ये सामर्थ्यशाली कुलिंग सुविधा आहे. जोडीला नॅनो कोटेड विषाणू प्रतिबंधक गाळणी आणि युव्ही कुल तंत्रज्ञान, आयओटी नियंत्रित स्मार्ट कंट्रोल्स, उच्च ISEER सह शक्तिशाली एसी, टिकावूपणा आणि उत्तम डिझाईन आहे.”
गोदरेज इऑनडी मालिका एअर कंडीशनर्स पांढरा, कॉपर आणि रोझ गोल्ड रंगांत उपलब्ध असून इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर आणि भारतभरातील दालनांमध्ये उपलब्ध आहेत.End
Be the first to comment on "गोदरेज अॅप्लायन्सेसतर्फे स्मार्ट आयओटी कंट्रोल्स, ९९.९% युव्ही विषाणू निर्जंतुकीकरण, अॅडव्हान्स्ड कुलिंग आणि इतर अनेक वैशिष्ट्यांसह मेड इन इंडिया एअर कंडीशनर्सची मोठी मालिका सादर"