ज्येष्ठ संगीतकार पं. अशोक पत्की यांची गिरगावात संगीत प्रशिक्षण कार्यशाळा!

Ashok Patki

SANJAY PATKI

मुंबई (GPN): ‘सुरताल करावके क्लब’ विलेपार्लेच्या वतीने येत्या १५ व १६ जानेवारी २०२२ या कालावधीत गिरगांव येथील चित्तपावन ब्राह्मण संघ, निकदवारी लेन, सिटी को ऑप बँकेची गल्ली, गिरगांव, मुंबई ४०० ००४ येथे १० वर्षांवरील मुलांपासून ७० वर्षांपर्यंतच्या संगीतप्रेमींना या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे.

SANJAY PATKI

मूळ गिरगावकर असलेल्या ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांची ही संगीत कार्यशाळा प्रथमच गिरगावात होणार आहे. गायनाची आवड असणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा एक सुवर्णसंधी असून त्यामित्ताने जेष्ठ संगीतकार पंडित अशोक पत्की आणि शास्त्रीय संगीतातील दिग्गज पंडित संजय पत्की यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना लाभणार आहे.

या कार्यशाळेत अभ्यासपूर्ण गाणे कसे असावे, गाण्याचा सराव कसा करावा, गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, गाण्याचे तंत्र, गाण्यामागची भावना, सूर, ताल यांचे गाण्यातील बारकावे, स्पष्ट शब्दोच्चार या आणि अश्या अनेक विषयांचे मार्गदर्शन अशोक पत्की स्वतः करणार आहेत. मध्य मुंबईतील गिरगावात शनिवार व रविवार दिनांक १५ व १६ जानेवारी २०२२ रोजी ही कार्यशाळा सकाळी ११:३० ते दुपारी ३:३०वा. या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

या कार्यशाळेविषयी अधिक माहिती देताना अशोक पत्की म्हणाले की, माझ्याकडे जी कला आहे ती कला पुढच्या पिढी पर्यंत पोहोचावी अशी माझी इच्छा आहे. गण्यातले बारकावे दोन दिवसांत या कार्यशाळेत शिकवले जाणार आहेत. गाण्यातील फक्त चाल नाही तर त्यातील बारकावे देखील शिकावे असे पत्की यांनी नवोदितांना सांगितले. ही कार्यशाळा सशुल्क असून प्रवेश नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी महेश कालेकर यांच्याशी या क्रमांकावर 9769348413 संपर्क साधावा

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "ज्येष्ठ संगीतकार पं. अशोक पत्की यांची गिरगावात संगीत प्रशिक्षण कार्यशाळा!"

Leave a comment

Your email address will not be published.


*