जॉन्सन्सची लहान बाळांसाठी नवी जाहिरात, २४ तास मॉइश्चर लॉकचे फायदे दाखवून देणारी विशेष मिल्क + राईस लोशन बाजारपेठेत दाखल

 

मुंबई, १६ डिसेंबर २०२१ (GPN): जॉन्सन्स® बेबीने नवे मिल्क + राईस लोशन बाजारपेठेत दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. रांगू लागलेल्या बाळांचा रोज काहीतरी नवे करण्याचा, नवे शोधण्याचा उत्साह भारी दांडगा असतो, अशा वाढत्या वयात बाळाच्या त्वचेची विशेष काळजी घेण्यात आईला मदत व्हावी हा या लोशनचा उद्देश आहे. बाळाचे वय आणि हालचाली जसजशा वाढत जातात तसतशी आईला बाळाच्या त्वचेविषयी वाटणारी काळजी देखील वाढते. संपूर्ण दिवसभरात बाळाला असंख्य गोष्टी कराव्याशा वाटत असतात, या नैसर्गिक जिज्ञासेला बाळाच्या विकसित होत असलेल्या त्वचेची पुरेपूर साथ मिळत राहावी असे आईला वाटणे स्वाभाविकच आहे. अधिक जास्त दुग्धमय आणि अधिक जास्त क्रीमी असे जॉन्सन्स® बेबीचे नवीन मिल्क + राईस लोशन, शुद्ध दुग्ध प्रथिने आणि तांदुळाच्या सत्त्वांनी परिपूर्ण असून यामध्ये आहे २४ तास मॉइश्चर लॉक जे बाळाच्या त्वचेला पोषण पुरवते, त्वचा मॉइश्चराइज करून संपूर्ण दिवसभर ‘बेबी सॉफ्ट’ अर्थात अतिशय मुलायम व निरोगी राखण्यात मदत करते.

या जाहिरातीमधून सर्व मातांना असे सांगितले गेले आहे की, त्यांच्या बाळांच्या वाढत्या वयामध्ये जॉन्सन्स बेबीचे नवीन मिल्क + राईस लोशन बाळांच्या त्वचेला पोषण पुरवून बाळाला आणि आईला बाळाच्या वाढीचा पुरेपूर आनंद मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. शुद्ध दूध प्रथिने आणि तांदुळाच्या सत्वाचे गुण असल्यामुळे या लोशनचे फॉर्म्युलेशन अतिशय प्रभावी असल्याची माहिती देखील यामध्ये देण्यात आली आहे. या लोशनमध्ये ५ पट जास्त*i व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी५ आहे जे त्वचेला पोषित व मॉइश्चराइज ठेवण्यात मदत करते.

श्री.मनोज गाडगीळ, व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग, जॉन्सन अँड जॉन्सन कन्ज्युमर हेल्थ इंडिया यांनी सांगितले, “जॉन्सन्स® बेबीचे असे मत आहे की प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सुरुवात अतिशय भरभराटीची झाली पाहिजे. प्रत्येक आईला आपल्या बाळाच्या त्वचेची नीट काळजी घेता यावी यासाठी, विज्ञानावर आधारित, सर्वोत्तम उत्पादने उपलब्ध करवून देण्याच्या वचनबद्धतेचे पालन करणारे असे हे नवीन जॉन्सन्स बेबी मिल्क + राईस लोशन आहे.  वयाच्या आणि वाढीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये बाळांना सर्वोच्च प्रतीची देखभाल आमच्या उत्पादनांकडून पुरवली जावी यासाठी आम्ही बाळांचे आईवडील, आरोग्यसेवा तज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्या सहयोगाने काम करतो. नवीन मिल्क+राईस लोशनमध्ये काही विशिष्ट घटकांचा अतिशय विचारपूर्वक समावेश करण्यात आल्यामुळे बाळांच्या त्वचेला योग्य पोषण मिळत राहील आणि त्यांची त्वचा कायम पोषित व मुलायम राहील याची ग्वाही मातांना मिळते.”

श्री.गॉडविन डिमेलो, एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर, डीडीबी मुद्रा यांनी सांगितले, “वाढत्या वयातील बाळामध्ये भरभरून असलेला, प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा पाहण्याचा, अनुभवण्याचा उत्साह ही संकल्पना खूप प्रभावी असल्याचे आम्हाला जाणवले. म्हणूनच आम्ही या जाहिरातीमधून अशा बाळाची गोष्ट सांगत आहोत जी तिला मिळालेल्या हालचालींच्या आणि नवीन गोष्टी शोधण्याच्या स्वातंत्र्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. बाळाच्या हालचाली आणि त्या पाहताना आईच्या मनात येणाऱ्या भावना यामधून या उत्पादनाची उपयुक्तता आणि बाळाला त्यातून मिळणारे लाभ आईला किती निश्चिन्त करणारे आहेत हे दर्शवले जाते.” नवीन जाहिरात पाहण्यासाठी लिंक – https://youtu.be/rFtPKezpWsI

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "जॉन्सन्सची लहान बाळांसाठी नवी जाहिरात, २४ तास मॉइश्चर लॉकचे फायदे दाखवून देणारी विशेष मिल्क + राईस लोशन बाजारपेठेत दाखल"

Leave a comment

Your email address will not be published.


*