
KALYAN JEWELLERS BRINGS TOP JEWELLERY PICKS TO GIFT YOUR SIBLINGS THIS RAKSHA BANDHAN
मुंबई, ३० जुलै २०२०:- रक्षा बंधन हा असा दिवस आहे, जेव्हा लुटूपुटुची भांडणं, एकमेकांवरची चढाओढ यांची जागा भावंडासाठी केली जाणारी प्रार्थना आणि त्यांच्या प्रेमाबद्दलचे आभार घेतात. कोव्हिड- 19 मुळे कुटुंबांना तसेच भावा- बहिणींना एकत्र येणं अवघड झालेलं असलं, तरी हा सण तितक्याच उत्साहाने सादरा केला जाईल यात शंका नाही. जगभरातील भारतीयांमध्ये या सणाची असलेली लोकप्रियता लक्षात घेत, भावंडांना भेट देता येईल अशा स्टायलिश व ट्रेंडी दागिन्यांची छोटी यादी कल्याण ज्वेलर्सने तयार केली आहे. हे दागिने आपल्या भावंडाना भेट देत ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे व्यक्त करता येईल. नव्याने लाँच करण्यात आलेली लाइव्ह खरेदी सुविधा वापरून किंवा दालनाला भेट देऊन तुम्हाला खरेदी करता येईल.
या रक्षा बंधनाला आपल्या भावंडांना आमच्या वजनाने हलक्या दागिन्यांपैकी एखादा खास दागिना भेट देत ते तुमच्यासाठी किती खास आहेत याची परत एकदा जाणीव करून द्या, कारण खास नात्यांसाठी भेटसुद्धा खास असावी लागते.

KALYAN JEWELLERS BRINGS TOP JEWELLERY PICKS TO GIFT YOUR SIBLINGS THIS RAKSHA BANDHAN
तुम्ही तुमच्या भावाला – बहिणीला कोणता फॅशनेबल दागिना भेट द्याल
1. सोन्यामध्ये पुरुषांसाठीच्या दागिन्यांसाठी आदर्श गुण असतात. कल्याण ज्वेलर्सच्या पुरुषांसाठीच्या सुवर्ण अंगठ्या आकर्षक चमक आणि कालातीत डिझाइन वापरून बनवण्यात आल्या असून हे गुण अंगठीच्या अभिजात सौंदर्याला आणि पर्यायाने आधुनिक पुरुषाची स्टाइल व संवेदनांना झळाळी देणारे आहेत. अनोखे आणि व्यापक डिझाइन असलेली ही ट्रेंडी सोन्याची अंगठी मध्यभागी हिरा/पोल्की वापरून बनवण्यात आलेली असल्यामुळे लक्षवेधी झाली आहे. डार्क एनॅमलसह बनवण्यात आलेला हा दागिना रक्षा बंधनाच्या दिवशी परिधान केल्या जाणाऱ्या खास पारंपरिक पोशाखावर उठून दिसेल.
2. कोणत्याही शुभ प्रसंगी भगवान गणेशाची पूजा केली जाते. ज्ञान, समृद्धी, रिद्धी आणि सिद्धीची देवता असलेला गणपती हा आयुष्यातील सर्व अडथळ्यांना दूर करणारा देव मानला जातो. गणपती देवतेला मध्यभागी ठेवणाऱ्या या पेडंट- चेनइतकी दुसरी चांगली भेट कोणती असेल ! याची नाजूर कलाकुसर या सुंदर पेंडंटला खऱ्या अर्थाने आकर्षित बनविते.
3. पुरुषांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या अंगठीमध्ये एनॅमल वर्कमध्ये फुलांचे डिझाइन देण्यात आले असून ती पारंपरिक तसेच इंडो- वेस्टर्न पोशाखावर उठून दिसेल. ही स्टेटमेंट अंगठी तुमच्या भावासाठी खास भेट ठरेल, कारण ती त्याच्या स्टाइलला आणखी उठाव देणारी असेल.
4. सोन्याचा नेकलेस हा प्रत्येक स्त्रीच्या दागिन्यांच्या संग्रहातला सगळ्यात आवश्यक दागिना असतो आणि तो कधीच कालबाह्य होत नाही. या दागिन्याचा अर्धा भाग प्रेशियस स्टोन्सनी फुलांच्या डिझाइनमध्ये बनवणय्त आला असून दुसऱ्या बाजूला हिरे जडवण्यात आले आहे. हा दगिना सर्वार्थानं परिपूर्ण आहे. ENDS
Be the first to comment on "कल्याण ज्वेलर्सतर्फे ‘रक्षाबंधन’ स्पेशल कलेक्शन आता रक्षा बंधनाला आपल्या भावंडांना एखादा खास दागिना भेट द्या !"