मुंबईमध्ये ८० टक्के कोरोना रुग्णांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या असल्याचे निदर्शनास आले
मुंबई, १४ जुलै २०२०:- सध्या जगभरात पसरलेल्या कोविड-१९ मुळे सर्वत्र भीती, अनिश्चितेचे वातावरण आहे. त्यातच या रोगावर अद्याप लस निर्माण न झाल्यामुळे अनेकांचे मनोधैर्य खचले आहे. पण जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधकांनी या विषाणूचा संसर्ग व त्यातून बरे होण्यासाठी प्रतिकारशक्ती हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याला दुजोरा दिला आहे आणि म्हणूनच या आजारावरील उपचारांचा शोध लागेपर्यंत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपोलो हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे सल्लागार डॉ. भारत अगरवाल यांनी केले आहे.
कोविड -१९ विषाणू संपूर्ण मानवजातीसाठी नवा असल्यामुळे एकीकडे त्याच्याशी लढत असताना त्यावरील अभ्यास व संशोधनाचे कामही सर्वत्र सुरू आहे. यावर एकच आणि प्रभावी उपचार अजूनही टप्प्यात दिसत नसला, तरी लक्षणे, प्रतिबंध आणि कमॉर्बिटीज व कोव्हिड-१९चा संबंध यांवर आधारित अभ्यासात प्रगती झाली आहे. त्याचवेळी प्रतिकारशक्तीसंदर्भातील संशोधनात, कशाप्रकारे कोव्हिड-१९ चे प्रमाण इतर आजार असलेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून आले आणि मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या लक्षणांमुळे स्थूलत्व, मधुमेह, हायपरटेन्शन आणि हृद्यविकार व मेंदूतील रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे अस्तित्व लक्षात आले, हे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या रोगावर मात करण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे अत्यंत गरजेचे आहे.

Dr. Bharat Agarwal, Consultant, Internal Medicine at Apollo Hospitals, Navi Mumbai -Photo By GPN
दुसरीकडे वृद्ध व्यक्ती आणि त्यांना आधीपासून असलेल्या आजारांमुळे मानवी शरीरात विषाणूशी लढण्यासाठी मदत करणाऱ्या आरएनएचे प्रमाण कमी असते. त्यांच्यात असलेल्या कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे या वयोगटाला सर्वात जास्त जोखीम आहे. अशा केसेसमध्ये स्थूलत्व, अशक्तपणा, श्वसनाच्या समस्या, कमी उर्जा अशाप्रकारच्या अतिरिक्त समस्यांमुळे विषाणूची वाढ होण्यासाठी पूरक वातावरण तयार होते. मुंबईमध्ये ८०% कोव्हिड रुग्णांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या असल्याचे उपचाराअंती सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्याशिवाय वयाशी संबंधित कोमॉर्बिटीजमुळे मानवी शरीराचा वाढत्या वयानुसार प्रतिकारशक्तीत होणाऱ्या बदलांमुळेही परिणाम होत आहे. कमी प्रतिकारशक्तीमुळे बरं होण्याचा कालावधी वाढतो तसेच गुंतागुंत निर्माण होते. म्हणूनच आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी तसेच वैद्यकीय व्यावसायिकांनीही जास्त जोखीम असलेले रुग्ण प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करतील याची खात्री केली पाहिजे, असेही डॉ. अगरवाल, सल्लागार, इंटर्नल मेडिसीन, अपोलो हॉस्पिटल यांनी नमूद केले.
सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे, स्वतःची स्थिती समजून घ्या. आपली लक्षणे, प्रतिकारशक्ती जाणून घ्या आणि संपूर्ण तपासणी करून घ्या. कित्येक हॉस्पिटल्सद्वारे टेलि- कन्सल्टेशन दिले जात आहे. आजाराची योग्य माहिती प्रतिबंधात्मक धोरण आखण्यासाठी आणि प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. रक्तदाब, शर्करापातळी यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच स्थूलत्वाचा सामना करण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि जास्त जोखीम असलेल्या गटात समाविष्ट न होण्यासाठी समतोल आहार अतिशय आवश्यक आहे. या विषाणूची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्यांसाठी सुरक्षित अंतर राखून नियमित व्यायाम करणे सर्वात उत्तम आहे. आरोग्यावर नियमित देखरेख करणे व वेळेवर आवश्यक औषधे घेणेही महत्त्वाचे आहे.
वैयक्तिक पातळीवर घेतल्या जाणाऱ्या अशा काळजीबरोबरच वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रत्येकाला प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. भारताच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला असल्याचे लक्षात घेत प्रत्येक व्यक्तीने आपल्याला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतः जबाबदारीने वागायला हवे. प्रतिबंध हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र असून ज्यांना आधीपासून आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी कायम आहार, व्यायाम, देखरेख, औषधे आणि स्वच्छता हे पाच मूलभूत नियम पाळणे आवश्यक आहे. त्याशिवाय जास्त जोखीम असलेल्यांपैकी कोणाला लक्षणे जाणवत असल्याचे वाटल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अपोलो ऑनलाइन सल्लासेवा देत आहे, ज्यामुळे सुरक्षितपणे फोनवर माहिती मिळवता येते. अशा पर्यायांचा आवर्जून अवलंब केला गेला पाहिजे, कारण योग्य उपचार मिळण्यात उशीर झाल्यास रुग्णाची स्थिती ढासळू शकते. म्हणूनच प्रतिबंधात्मक उपाय करा, पण योग्य वेळेस कृती करा. तरच, वेळच्या वेळेस कोव्हिड-१९ विरोधात प्रभावी लढा देता येऊ शकेल असे यावेळी डॉ. भारत अगरवाल यांनी सांगितले.
Be the first to comment on "प्रतिकारशक्ती वाढवूनच होऊ शकते कोरोनावर मात – डॉ. भारत अगरवाल"