विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार्टनेक्स्ट आयडियाथॉन’: फिक्की आणि ‘केन४२’ चा संयुक्त उपक्रम, विजेत्यांना मिळणार दोन कोटीचे बक्षीस

IMG-20200706-WA0006मुंबई,  जुलै, २०२०: भारतातील ‘सुपरअॅपड्टेक प्लॅटफॉर्म’ असलेल्या बेंगळुरू येथील ‘केन४२’ या स्टार्टअप कंपनीने देशभरातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार्टनेक्स्टआयडियाथॉन’ कार्यक्रम सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे. ‘टर्बोस्टार्ट’ या संस्थेच्या पाठिंब्याने ‘केन४२’ ने हा उपक्रम भारतात नाविन्यपूर्ण उद्योजकता सुलभ करण्यासाठी सुरू केला आहे. पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी मिळेल तसेच प्रमुख स्टार्टअप्स आणि कंपन्यांमध्ये ‘इंटर्नशिप’ च्या संधी मिळतील. ‘टर्बोस्टार्ट’ सारख्या अन्य उद्योगांतील प्रमुखांकडून उमेदवारांना व्यक्तिशः मार्गदर्शनही मिळेल. उदा: उल्हास कामत -ज्योती लॅबोरेटोरीज, जी एम कृष्णन -नोवोजाईम्स, निरंकर सक्सेना-फिक्की, नटराजन रंगनाथन-एलएलपी, अनिरुद्ध गांगुली – जीएमआर समूह, विवेक मानसिंग – युवरनेस्ट व्हीसी फंड, वेंकट राजू -एंजेल इन्व्हेस्टर, सुनील भुमरलकर – अर्न्स्ट अँड यंग हे दिग्गज मार्गदर्शन करतील.

आयडियाथॉन ही स्पर्धा ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (फिक्की) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येईल व यात कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांचे सहकार्यही घेतले जाईल. समस्यांची ओळख करून घेण्यातून या कार्यक्रमाची पहिली पायरी सुरू होते. मूल्य वाढविण्याच्या मार्गाने नवकल्पना आणि मूर्त परिणाम साध्य करण्यासाठी एकात्मिक व्यावसायिक योजना बनविण्यासाठी उमेदवारांना येथे सक्षम केले जाते. ६ महिने चालणाऱ्या ‘आयडियाथॉन’ मध्ये विद्यार्थी व्यवसाय योजना बनवतील आणि त्या शैक्षणिक, कॉर्पोरेट, गुंतवणूकदार आणि उद्योजक समुदायात मान्यवर असलेल्या ज्यूरींना सादर करतील.

Ganesh Raju, Founder and CEO, Ken42-File Photo GPN

Ganesh Raju, Founder and CEO, Ken42-File Photo GPN

या उपक्रमाबद्दल बोलताना ‘केन४२’ चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश राजू म्हणाले, ‘’कोविड साथीच्या आजारामुळे, गेल्या काही महिन्यांपासून आगामी प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया थांबली होती. या कालावधीत, अनेक स्टार्टअप्स तगून राहण्यासाठी धडपडत असल्याचे आम्ही पाहिले आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा उद्योजकजतेचा प्रवास सुरू करण्यासाठी अनिश्चित काळासाठी थांबावे लागले आहे ‘स्टार्टनेक्स्टआयडियाथॉन’ सुरू करण्यामागील आमचा हाच मुख्य हेतू होता. यात सहभागी होण्याकरीता देशातील सर्व विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांचे ‘केन४२’ स्वागत करीत आहे. आपल्या भवितव्यासाठी तयार राहण्याची आणि भारतात नवीन-युगातील स्टार्टअप्सची लाट आणण्याची प्रेरणा आम्ही त्यांना देत आहोत.”

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेस प्रोत्साहन देणे, त्यांच्या आवडीतून नवनिर्मितीची क्षमता, जागरूकता आणि जगाला अधिक चांगले काही देण्यासाठी जबाबदारीची भावना निर्माण करणे यातच त्यांचे भवितव्य आहे. ‘आयडियाथॉन प्रोग्राम’ च्या माध्यमातून, सर्व विद्यार्थ्यांना ठोस प्रेरणा देण्याचे ’केन४२’ चे उद्दीष्ट आहे. त्या दृष्टीने या स्पर्धेतील उपविजेत्यांनादेखील प्रत्येकी १० लाख रुपये पारितोषिक देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ‘आयडियाथॉन’ साठी ६ जुलै पासून ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत नोंदणी करता येईल.

आपला नवउद्योजकतेचा प्रवास सुरू करण्यासाठी लॉग ईन करा- https://www.ken42.com/

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार्टनेक्स्ट आयडियाथॉन’: फिक्की आणि ‘केन४२’ चा संयुक्त उपक्रम, विजेत्यांना मिळणार दोन कोटीचे बक्षीस"

Leave a comment

Your email address will not be published.


*