हिरो मोटोकॉर्पकडून डिजिटल-फर्स्‍टला प्राधान्य

IMG_20200608_180958एकीकृत ऑनलाइन विक्री व्‍यासपीठ ‘ईशॉप’ सादर

विक्रीपश्‍चात्त कार्यसंचालनांमध्‍ये विविध डिजिटल उपक्रमांचा समावेश

नवी दिल्‍ली, ५ जून २०२० (GPN): ग्राहकांना वर्धित अनुभव देण्‍यासाठी उद्योग अग्रणी डिजिटल उपक्रमांना अधिक प्रबळ करत हिरो मोटोकॉर्प या जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या उत्‍पादक कंपनीने एकीकृत ऑनलाइन विक्री व्‍यासपीठ ‘ईशॉप’ सादर केले आहे.

ईशॉप ग्राहकांना पूर्णत: डिजिटल खरेदीचा अनुभव देते. खरेदीसंबंधित माहिती व प्रक्रिया यंत्रणेमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आल्‍या आहेत. ज्‍यामुळे ग्राहकांना सुलभपणे व पारदर्शकरित्‍या थेट कंपनीच्‍या वेबसाइटवरून त्‍यांच्‍या आवडीची मोटरसायकल किंवा स्‍कूटर खरेदी करता येते.

IMG_20200608_180735IMG_20200608_180958ग्राहक कंपनीच्‍या अधिकृत वेबसाइटला (www.heromotocorp.com) भेट देऊन होमपेजवर टॅब करण्‍याच्‍या माध्‍यमातून ईशॉपची सुविधा प्राप्‍त करू शकतात. हे होमपेज त्‍यांना ऑनलाइन खरेदी/बुंकिंग माध्‍यमाकडे घेऊन जाते. 

अंतर्भूत यंत्रणा ग्राहकांना निर्णय घेणे, वाहन खरेदी करणे, डिलिव्‍हरी घेणे अशा संबंधित प्रक्रियांदरम्‍यान मार्गदर्शन करते. तसेच ही यंत्रणा त्‍यांना नवीन ऑन-रोड किंमत, लाइव्‍ह स्‍टॉक स्‍टेटस्, ऑनलाइन डॉक्‍युमेंट सबमिशन, इन्‍स्‍टण्‍ट डिलर इन्टिमेशन, फायनान्‍स पर्याय, सेल्‍ड ऑर्डर प्रीव्‍ह्यू व कन्‍फर्मेशन, व्‍हीआयएन अलोकेशन व डिलिव्‍हरी यासंदर्भात देखील माहिती देते.

पेजवर ग्राहकाने उत्‍पादन, व्‍हेरिएण्‍ट, रंग व शहराची निवड केल्‍यानंतर यंत्रणा डिलरशिपची यादी व एसकेयू उपलब्‍धता दाखवते. ग्राहक त्‍यांच्‍या सोयीनुसार डिलरशिपची निवड करून पेमेण्‍ट करू शकतात. एक्‍स-शोरूम व ऑन-रोड अशा दोन्‍ही किंमती होणा-या खर्चांसह सादर केल्‍या जातात. 

पेमेण्‍ट केल्‍यानंतर ग्राहकाला सत्‍यापनासाठी युनिक ओटीपी क्रमांकासह ई-रिसीट देण्‍यात येते. यंत्रणेमध्‍ये सत्‍यापन पूर्ण केल्‍यानंतर निवडण्‍यात आलेला डिलर सेल्‍स असिस्‍टण्‍ट नियुक्‍त करतो. ग्राहकाला पाहिजे असल्‍यास पेमेण्‍ट प्रक्रियेदरम्‍यान रिटेल फायनान्‍स सुविधा देखील देण्‍यात येते. सेल्‍स असिस्‍टण्‍ट ग्राहकांच्‍या सर्व चौकशीचे निराकरण करतो आणि त्‍यांना कागदपत्रे व्‍यवहार, फायनान्‍स, इनवॉईसिंग, विमा, नोंदणी आणि डिलिव्‍हरी (पर्यायी होम डिलिव्‍हरी) अशा उर्वरित पाय-यांदरम्‍यान मार्गदर्शन करतो. 

ऑर्डर तयार झाल्‍यानंतर ग्राहकाला एसएमएसच्‍या माध्‍यमातून एक लिंक पाठवण्‍यात येते. ही लिंक त्‍याला/तिला थेट डॉक्‍युमेंट अपलोडिंग विभागाकडे घेऊन जाते. सत्‍यापन झाल्‍यानंतर विक्री ऑर्डरची माहिती ग्राहकाला पाठवली जाते आणि ग्राहकाकडून मंजूरी मिळाल्‍यानंतर इनवॉईस तयार केले जाते, डीलरकडून नोंदणीसाठी अर्ज केला जातो आणि ग्राहकाने निवडलेल्‍या ठिकाणी वाहन डिलिव्‍हर केले जाते. डिलिव्‍हरीदरम्‍यान आरटीओकडे देणे आवश्‍यक असलेली स्‍वाक्षरीकृत कागदपत्रे ग्राहकाकडून गोळा केली जातात. 

प्रत्‍येकाची सुरक्षा व आरोग्‍याला अधिक प्राधान्‍य देत कंपनीने विविध डिजिटल विक्रीपश्‍चात्त सेवा देखील सुरू केल्‍या आहेत. यामध्‍ये डिजिटल सर्विस जॉब कार्ड व पोचपावतीसंदर्भातील उद्योगामधील पहिला उपक्रम,  अॅप-आधारित सर्विस बुकिंग आणि वर्कशॉप कार्यसंचालनांचे वाढीव तास यांचा समावेश आहे. 

हिरो अॅपचा उपयोग करत ग्राहक त्‍यांच्‍या जवळच्‍या वर्कशॉपमध्‍ये त्‍यांची सर्विस अपॉइण्‍टमेंट प्री-बुक करू शकतात. ते त्‍यांचे स्‍वत:चे सर्विस जॉब-कार्ड वापरत वर्कशॉप्‍समधील कोणत्‍याही पेपरवर्कसंदर्भात शारीरिक संपर्क देखील टाळू शकतात आणि यासंदर्भात त्‍यांना डिजिटल पोचपावती मिळते. यामुळे वेईकल पिक-अप व ड्रॉपदरम्‍यान ग्राहकांचा वर्कशॉपमध्‍ये जाणारा कालावधी देखील कमी होतो. 

ग्राहकांना अपॉइण्‍टमेंट्स प्री-बुक करण्‍यसाठी प्रोत्‍साहित करण्‍याव्‍यतिरिक्‍त डीलर्स/ सर्विस सेंटर्स त्‍यांच्‍या टेलि-कॉलर्सचा उपयोग करत ग्राहकांना डिजिटल अपॉइण्‍टमेंट बुकिंग प्रक्रियेची माहिती देण्‍यासोबत त्‍यासंदर्भात मदत देखील करत आहेत.

अधिक गर्दी टाळण्‍यासाठी आणि सोशल डिस्‍टन्सिंग नियमांचे पालन करण्‍यासाठी अनेक वर्कशॉप्‍सनी त्‍यांच्‍या कार्यसंचालनांची वेळ वाढवली आहे.  

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "हिरो मोटोकॉर्पकडून डिजिटल-फर्स्‍टला प्राधान्य"

Leave a comment

Your email address will not be published.


*