अ‍ॅॅॅॅमेझॉन प्राइम व्हिडिओकडून बहुप्रतिक्षित ओरिजिनल सिरीज ‘पाताल लोक’चा ट्रेलर सादर

‘पाताल लोक’ ही ९ भागांची अ‍ॅॅॅॅमेझॉन ओरिजिनल सिरीज जागतिक स्‍तरावर १५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या सिरीजची कथा एक प्रामाणिक पोलिस सुप्रसिद्ध पत्रकारावर करण्‍यात आलेल्‍या हत्‍येच्‍या प्रयत्‍नाची चौकशी करण्‍याबाबत आहे. हा रोमांचक पाठलाग त्‍याला नरकाचे गडद विश्‍व ‘पाताल लोक’मध्‍ये घेऊन जातो.

सुदीप शर्माची निर्मिती असलेली सिरीज ‘पाताल लोक’मध्‍ये जयदीप अहलवट, नीरज काबी, गुल पनाग व अभिषेक बॅनर्जी असे स्‍टार कलाकार आहेत. १५ मे २०२० पासून २०० देश व प्रदेशांमधील प्राइम सदस्‍य अविनाश अरूण व प्रोसित रॉय यांचे दिग्‍दर्शन आणि क्‍लीन स्‍लेट फिल्‍म्‍झ निर्मित ९ भागांची अ‍ॅॅॅॅमेझॉन ओरिजिनल सिरीज पाहण्‍याचा मनसोक्‍त आनंद घेऊ शकतात

प्राइम केवळ १२९ रुपयांच्या अविश्वसनीय मासिक शुल्कामध्ये देऊ करते नवे, एक्स्क्लुझिव्ह चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, स्टॅण्ड अप कॉमेडी, अ‍ॅॅॅॅमेझॉन ओरिजिनल मालिकांच्या अमर्याद स्ट्रीमिंगची सुविधा, अ‍ॅॅॅॅमेझॉन प्राइम म्युझिकवर जाहिरातींच्या अडथळ्याविना अखंड संगीत ऐकण्याची पर्वणी, उत्पादनांच्या भारतातील सर्वात मोठ्या साठ्यातील कोणतेही उत्पादन मोफत आणि झटपट घरपोच मिळविण्याची सोय, सर्वोत्तम सवलती सर्वात आधी पाहण्याची संधी, प्राइम रीडिंगच्या साथीने अमर्याद वाचनानंद मिळविण्याची संधी असा किंमतीचे पुरेपूर मोल देणारा भरगच्च ऐवज.

मुंबई, भारत मे २०२०: अ‍ॅॅॅॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज २०२० मधील त्‍यांची तिसरी भारतीय ओरिजिनल, बहुप्रतिक्षित अ‍ॅॅॅॅमेझॉन ओरिजिनल सिरीजपाताल लोकच्‍या ट्रेलर सादरीकरणाची घोषणा केली. क्‍लीन स्‍लेट फिल्‍म्‍झद्वारे (Clean Slate Filmz) निर्मित हा रोमांचक क्राइम-ड्रामा हाय-प्रोफाइल केस देण्‍यात आलेला दिल्‍ली पोलिस निरीक्षक हाथी राम चौधरीच्‍या अवतीभोवती फिरतो. सुप्रसिद्ध पत्रकारावर हत्‍येचा प्रयत्‍न करण्‍याच्‍या आरोपाखाली चार संशयितांना अटक केली जाते. ही केस एक कपटी चक्रव्‍यूह ठरते, जेथे या केसचे निराकरण भूतलावर होणे अशक्‍य आहे. यामुळे चौधरीला विश्‍वासघातकी मार्ग अवलंबवा लागतो,ज्‍यामुळे तो नरकाचे धोकादायक विश्‍व पाताल लोकमध्‍ये जातो. पाताल लोक सिरीज २०० हून अधिक देश व प्रदेशांमध्‍ये उपलब्‍ध असेल आणि प्राइम सदस्‍य १५ मेपासून या सिरीजचे सर्व ९ एपिसोड्सचा पाहण्‍याचा आनंद घेऊ शकतील.

अ‍ॅॅॅॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडियाच्‍या इंडिया ओरिजिनल्‍सच्‍या प्रमुख अपर्णा पुरोहित म्‍हणाल्‍या, ”हार्टलँडमधील रोमांचक व वास्‍तविक कथांचे जगभरातील प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. आम्‍हाला क्‍लीन स्‍लेट फिल्‍म्‍झसोबत सहयोगाने आमच्‍या प्रेक्षकांसाठी थरारक व लक्षवेधक कथा सादर करण्‍याचा आनंद होत आहे. पाताल लोक ही भारताला, विशेषत: भारतीय कथांना जागतिक दर्जा प्राप्‍त करून देण्‍यासाठी सर्वसमावेशक स्‍थानिक कन्‍टेन्‍ट सादर करण्‍याच्‍या आमच्‍या ध्‍येयामधील आणखी एक पाऊल आहे. प्राइम सदस्‍य उच्‍चस्‍तरीय पाठलाग, प्रखर भावनिक ड्रामा आणि अद्वितीय परफॉर्मन्‍सेस पाहण्‍याचा लवकरच मनसोक्‍त आनंद घेऊ शकतात.

अ‍ॅॅॅॅमेझॉन ओरिजिनल पाताल लोकसाठी क्‍लीन स्‍लेट फिल्‍म्‍झचे निर्माता कर्नेश एस. शर्मा म्‍हणाले, ”उल्‍लेखनीय कन्‍टेन्‍टसह भारतीय मनोरंजन क्षेत्रामध्‍ये धुमाकूळ निर्माण करण्‍याचा आमचा सातत्‍याने प्रयत्‍न राहिला आहे. यंदा क्‍लीन स्‍लेट फिल्‍म्‍झ ५ वर्षे पूर्ण करत आहे. आम्‍हाला अ‍ॅॅॅॅमेझॉन प्राइम व्हिडिओसोबत सहयोगाने आमची आगामी अ‍ॅॅॅॅमेझॉन ओरिजिनल सिरीज पाताल लोकची घोषणा करताना आनंद होत आहे. हा शो प्रेमाचे फळ आहे आणि मी आशा करतो की, जगभरातील प्रेक्षक आम्‍ही ही सिरीज निर्माण करताना केलेल्‍या मौजमजेप्रमाणेच सिरीज पाहण्‍याचा आनंददायी अनुभव घेतील.

पाताल लोकचे निर्माता सुदीप शर्मा म्‍हणाले, ”पाताल लोक सिरीज प्रत्‍येक निर्मात्‍याचे स्‍वप्‍न आहे. ही मनाने भारतीय कथा आहे, पण त्‍यामधील थीम्‍स व पात्रे या सिरीजला जागतिक स्‍वरूप प्राप्‍त करून देतात. मला आनंद होत आहे की, क्‍लीन स्‍लेट फिल्‍म्‍झसोबत सहयोगाने मला आमच्‍या काळातील पुरस्‍कारप्राप्‍त कन्‍टेन्‍टची निर्मिती करणा-या काही सर्वोत्तम निर्मात्‍यांसाठी गंतव्‍य असलेली जागतिक स्ट्रिमिंग सेवा अ‍ॅॅॅॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर माझे डिजिटल पदार्पण करण्‍याची संधी मिळाली आहे. मला विश्‍वास आहे कीपाताल लोक सिरीज शेवटपर्यंत जगभरातील प्रेक्षकांना रोमांचक क्षणांचा अनुभव देईल.

ट्रेलर येथे पाहा: https://www.youtube.com/watch?v=cNwWMW4mxO8&feature=youtu.be

सारांश:

एका हताश पोलिसाला जीवनामध्‍ये मोठ्या केसचे निराकरण करण्‍याची जबाबदारी सोपवली जाते. या केसमध्‍ये एका सुप्रसिद्ध पत्रकाराचा हत्‍येचा प्रयत्‍न करण्‍यासाठी चार संशयितांना अटक करण्‍यात आलेली असते. ही केस एक कपटी चक्रव्‍यूह ठरते, ज्‍यामध्‍ये जसे दिसते तसे नसते. या केसचे निराकरण करत असताना तो पोलिस नरकाचे गडद विश्‍व पाताल लोकमध्‍ये जातो आणि त्‍याला या चार संशियतांच्‍या गतकाळातील धक्‍कादायक गोष्‍टींचा उलगडा होतो.

 प्राइम व्हिडिओ विभागामधील हजारो टीव्‍ही कार्यक्रम आणि हॉलिवुड व बॉलिवुडमधील चित्रपटांमध्‍ये ‘पाताल लोक’ या सिरीजची भर होईल. या विभागामध्‍ये भारतीय निर्मित अ‍ॅॅॅॅमेझॉन ओरिजिनल सिरीज जसे ‘दि फॅमिली मॅन’, ‘मिर्झापूर’, ‘फोर मोअर शॉट्स प्‍लीज! (सीझन १ व २)’, ‘इनसाइड एज’ व ‘मेड इन हेव्‍हन’ आणि पुरस्‍कारप्राप्‍त व समीक्षकांद्वारे प्रशंसित जागति‍क अ‍ॅॅॅॅमेझॉन सिरीज जसे ‘टॉम क्‍लेन्‍सीज जॅक रायन’, ‘दि बॉईज’, ‘हंटर्स’, ‘फ्लीबॅग’ आणि ‘दि मार्वलस मिसेस मैसेल’ यांचा समावेश आहे. या सर्व सिरीज प्राइम सदस्‍यत्‍वाचा भाग म्‍हणून अनलिमिटेड स्ट्रिमिंगसाठी उपलब्‍ध आहेत.  यासेवेमध्ये हिंदी, मराठी, गुजराती,तमिळ, तेलुगु, कन्‍नड, मल्याळम, पंजाबी व बंगाली या भाषांतील चित्रपट व कार्यक्रमांचा समावेश आहे.

प्राइम सदस्‍य स्‍मार्ट टीव्‍ही, मोबाइल डिवाईसेस, फायर टीव्‍ही, फायर टीव्‍ही स्टिक, फायर टॅब्‍लेट्स, अ‍ॅॅॅॅप्‍पल टीव्‍ही, एअरटेल, वोडाफोन इत्‍यादींमधील प्राइम व्हिडिओ अॅपमध्‍ये कुठेही व कधीही ‘पाताल लोक’चे सर्व एपिसोड्स पाहू शकतील. प्राइम सदस्‍य त्‍यांचे मोबाइल डिवाईसेस व टॅब्‍लेट्समध्‍ये प्राइम व्हिडिओ अ‍ॅॅॅॅपमधून एपिसोड्स डाऊनलोड करू शकतात आणि विनामूल्‍य ऑफलाइन कुठेही पाहू शकतात. प्राइम व्हिडिओ भारतामध्‍ये प्राइम सदस्‍यांसाठी वार्षिक ९९९ रूपये किंवा मासिक १२९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध आहे. नवीन ग्राहक www.amazon.in/prime येथे अधिक माहिती प्राप्‍त करू शकतात आणि मोफत ३०-दिवस ट्रायल सबस्‍क्राईब करू शकतात.

अ‍ॅॅॅॅमेझॉन प्राइम व्हिडिओ बा‍बत

प्राइम व्हिडिओ ही प्रिमिअम स्ट्रिमिंग सेवा आहे. ही सेवा प्राइम सदस्‍यांना पुरस्‍कारप्राप्‍त अ‍ॅॅॅॅमेझॉन ओरिजिनल सिरीज, हजारो चित्रपट व टीव्‍ही कार्यक्रम पाहण्‍याचा आनंद देते. ज्‍यामुळे सदस्‍यांना त्‍यांच्‍या आवडीचे कार्यक्रम एकाच ठिकाणी मिळतात. अधिक माहितीसाठी PrimeVideo.com येथे भेट द्या.

  • प्राइम व्हिडिओमधील समाविष्‍ट घटक:प्राइम व्हिडिओ विभागामधील हजारो टीव्‍ही कार्यक्रम आणि हॉलिवुड व बॉलिवुडमधील चित्रपटांमध्‍ये ‘पाताल लोक’ या चित्रपटाची भर होईल. या विभागामध्‍ये भारतीय निर्मित अ‍ॅॅॅॅमेझॉन ओरिजिनल सिरीज जसे ‘दि फॅमिली मॅन’, ‘मिर्झापूर’, ‘इनसाइड एज’ व ‘मेड इन हेवन’आणि पुरस्‍कारप्राप्‍त व समीक्षकांद्वारे प्रशंसित जागति‍क अ‍ॅॅॅॅमेझॉन सिरीज जसे ‘टॉम क्‍लेन्‍सीज जॅक रायन’, ‘दि बॉईज’, ‘हंटर्स’, ‘फ्लीबॅग’ आणि’दि मार्वलस मिसेस मैसेल’ यांचा समावेश आहे. या सर्व सिरीज प्राइम सदस्‍यत्‍वाचा भाग म्‍हणून अनलिमिटेड स्ट्रिमिंगसाठी उपलब्‍ध आहेत. या सेवेमध्ये हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगु,कन्‍नड, मल्याळम, पंजाबी व बंगाली या भाषांतील चित्रपट व कार्यक्रमांचा समावेश आहे.
  • त्‍वरित उपलब्‍धता: सदस्‍य स्‍मार्ट टीव्‍ही,मोबाइल डिवाईसेस, फायर टीव्‍ही, फायर टीव्‍ही स्टिक, फायर टॅब्‍लेट्स, अ‍ॅॅॅॅप्‍पल टीव्‍ही आणि विविध गेमिंग डिवाईसेसमधून प्राइम व्हिडिओ अ‍ॅॅॅॅपमध्‍ये कुठेही व कधीही सिरीज पाहू शकतात. प्राइम व्हिडिओ एअरटेल व वोडाफोन प्री-पेड व पोस्‍ट-पेड सबस्क्रिप्‍शन प्‍लान्‍सच्‍या माध्‍यमातून देखील ग्राहकांसाठी उपलब्‍ध आहे. प्राइम व्हिडिओ अ‍ॅॅॅॅपमधून प्राइम सदस्‍य त्‍यांचे मोबाइल डिवाईसेस व टॅब्‍लेट्समध्‍ये एपिसोड्स डाऊनलोड करू शकतात आणि विनामूल्‍य ऑफलाइन कुठेही पाहू शकतात.
  • वर्धित अनुभव: ४के अल्‍ट्रा एचडी व हाय डायनॅमिक रेंज (एचडीआर) सुसंगत कन्‍टेन्‍टसह प्रत्‍येक व्‍युइंगचा मनसोक्‍त आनंद घ्‍या. आयएमडीबीद्वारे समर्थित विशेष एक्‍स-रे अॅक्‍सेससह तुमचे आवडते चित्रपट व टीव्‍ही कार्यक्रम पाहण्‍याचा आनंद घ्‍या. ऑफलाइन व्‍युइंगसाठी निवडक मोबाइल डाऊनलोड्ससह सेव्‍ह करून ठेवा.
  • प्राइमसह उत्तम सुविधा: प्राइम व्हिडिओ भारतामध्‍ये प्राइम सदस्‍यांसाठी वार्षिक ९९९ रूपये किंवा मासिक १२९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध आहे. नवीन ग्राहक www.amazon.in/primeयेथे अधिक माहिती प्राप्‍त करू शकतात आणि मोफत ३०-दिवस ट्रायल सबस्‍क्राईब करू शकतात.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अ‍ॅॅॅॅमेझॉन प्राइम व्हिडिओकडून बहुप्रतिक्षित ओरिजिनल सिरीज ‘पाताल लोक’चा ट्रेलर सादर"

Leave a comment

Your email address will not be published.


*