Para Share Entertainments Kicks off its operations in India with three power-packed shows-IndiaMART InterMESH Limited Announces 12M FY24 (Full Year) and Q4FY24 (Fourth Quarter) Ending March 31, 2024 - Results-GJEPC innovNXT I Forty Under 40 - Next Gen Leadership Summit Witnesses Young Leaders Transforming The Business Landscape and Driving Growth-TBO TEK LIMITED IPO OPENS ON 8 May, 2024 PRICE BAND SET AT Rs. 875 TO 920 PER EQUITY SHARE-आधार हाउसिंग फाइनैंस लिमिटेड का आईपीओ 8-10 मई तक, 3,000 करोड़ जुटाएगी-Airbnb introduces Icons— Bollywood Star Jahnvi Kapoor opens the door to her legendary, never-before-seen family home in Chennai-AADHAR HOUSING FINANCE LIMITED IPO OPENS ON MAY 8, 2024 PRICE BAND SET AT Rs. 300 TO 315 PER EQUITY SHARE-महाराष्ट्र दिवस पर कालबादेवी में ओशो समारोह 'ओशो के अनुज डॉक्टर स्वामी शैलेंद्र सरस्वती' और 'मां अमृत प्रियाजी' की उपस्थिति में ओशो का ध्यान प्रयोग और प्रवचन होगा-Dr L H Hiranandani Hospital Launches Advanced Robotic System for Knee Replacement Surgeries-OSHO Meditation and Discourse to be hosted on 1st May at Sojat Swarna Bhawan, Kalbadevi, Mumbai In the gracious presence of Dr. Swami Shailendra Saraswati (OSHO’S Anuj) and Maa Amrut Priya

अ‍ॅॅॅॅबॉटकडून सीई मार्कसह भारतामध्‍ये कोविड-१९ प्रयोगशाळा-आधारित अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी टेस्‍टच्‍या उपलब्‍धतेची घोषणा

  • नवीन युरोपियन बनावटीची अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी रक्‍त तपासणी अ‍ॅॅॅॅबॉटच्‍या आर्किटेक्‍ट®i1000SR व i2000SRप्रयोगशाळा साधनांचा उपयोग करून करण्‍यात येईल आणि कंपनीच्‍या अ‍ॅॅॅॅलिनिटी™ आय सिस्टिमचे विस्‍तारीकरण करण्‍यात येईल
  • अ‍ॅॅॅॅबॉट मे अखरेपर्यंत भारताला शिपिंगची सुरूवात करेल आणि त्‍यानंतर मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी पुरवठ्यामध्‍ये वाढ करेल
  • चाचणीने लक्षणे सुरू झाल्‍यानंतर १४ दिवस किंवा अधिक दिवसांपर्यंत लक्षणे टिकून राहण्‍याची ९९ टक्‍क्‍यांहून अधिक विशेषता व संवेदनशीलता दाखवली

”अ‍ॅॅॅॅबॉट या महामारीचे निराकरण करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी लवकरात लवकर बाजारपेठेमध्‍ये कोविड-१९  चाचण्‍या उपलब्‍ध करून देण्‍यावर लक्षणीयरित्‍या भर देत आली आहे,” असे भारतातील अ‍ॅॅॅॅबॉटच्‍या डायग्‍नोस्टिक्‍स व्‍यवसायाचे महाव्‍यवस्‍थापक व देशातील प्रमुख नरेंद्र वर्दे म्‍हणाले. ”आम्‍हाला आगामी आठवड्यांमध्‍ये आमच्‍या अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी चाचण्‍या उपलब्‍ध करून देण्‍याचा अभिमान वाटत आहे. या चाचण्‍यांमुळे कोणाला विषाणूची लागण झाली आहे हे समजण्‍यामध्‍ये मदत होईल. ज्‍यामुळे आपल्‍याला आत्‍मविश्‍वासाने जीवन जगता येईल.”

मुंबई, भारत, ४ मे २०२० –

अ‍ॅॅॅॅबॉटने आज घोषणा केली की, त्‍यांना व्‍यक्‍तीला नोव्‍हेल कोरोनाव्‍हायरसची (कोविड-१९) लागण झाली आहे की नाही हे ओळखणा-या अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी IgG चे निदान करण्‍याकरिता त्‍यांची प्रयोगशाळा-आधारित सेरोलॉजी रक्‍त तपासणी आयव्‍हीडी डिरेक्टिव्‍हसाठी (९८/७९/ईसी) सीई मार्क मिळाले. अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी तपासणी ही पूर्वी एखाद्या व्‍यक्‍तीला संसर्ग झाला आहे की नाही हे सांगणारे एक महत्त्वपूर्ण भावी पाऊल आहे. ही चाचणी विषाणूबाबत अधिक माहिती देण्‍यासोबत अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडीज शरीरामध्‍ये किती काळ राहू शकतात आणि ते रोगप्रतिकारशक्‍ती वाढवू शकतात की नाही याबाबत देखील माहिती देईल. या प्रकारच्‍या माहितीमुळे उपचार व लसींच्‍या विकासाला पाठिंबा देण्‍यामध्‍ये मदत होईल.

अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी चाचण्‍या तपासणीचे प्रमाण वाढवणार

आण्विक चाचणी एखाद्याला विषाणूची लागण झाली आहे की नाही याचे निदान करते, तर अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी चाचण्‍या एखादी व्‍यक्‍ती संसर्गित आहे की नाही याचे निदान करते. अ‍ॅॅॅॅबॉटची SARS-CoV-2 IgG चाचणी IgG अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडीची तपासणी करते, जे एक प्रथिन आहे. शरीरामध्‍ये संसर्गाच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यांमध्‍ये या प्रथिनाची निर्मिती होते आणि व्‍यक्‍ती आजारातून बरी झाली तरी अनेक महिन्‍यांपर्यंत आणि शक्‍यतो वर्षांपर्यंत हे प्रथिन शरीरामध्‍ये राहू शकते. या चाचणीने लक्षणे सुरू झाल्‍यानंतर १४ दिवस किंवा अधिक दिवसांपर्यंत लक्षणे टिकून राहण्‍याची ९९ टक्‍क्‍यांहून अधिक IgG अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडीजचे निदान करण्‍याची विशेषता व संवेदनशीलता दाखवली.

अ‍ॅॅॅॅबॉटची IgG अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी चाचणी सुरूवातीला त्‍यांच्‍या आर्किटेक्‍ट®i1000SR व i2000SRप्रयोगशाळा साधनांवर उपलब्‍ध असेल.* आर्किटेक्‍ट ही जगामध्‍ये सर्वाधिक प्रमाणात वापरण्‍यात येणारी प्रयोगशाळा यंत्रणा आहे. ही यंत्रणा दशकांहून अधिक काळापासून वापरली जात आहे. ही साधने भारतभरातील प्रयोगशाळांमध्‍ये वापरली जातात आणि ही साधने एका तासामध्‍ये १०० ते २०० चाचण्‍या करू शकतात.

अ‍ॅॅॅॅबॉट अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी चाचणीसाठी त्‍यांच्‍या युरोपियन उत्‍पादनामध्‍ये लक्षणीयरित्‍या वाढ करत आहे. कंपनी चाचणीसाठी त्‍यांची अ‍ॅॅॅॅलिनिटी™ आय सिस्टिम विस्‍तारित करणार आहे. अ‍ॅॅॅॅबॉट भविष्‍यात अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी   IgMच्‍या या निदानासाठी देखील त्‍यांची प्रयोगशाळा अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी चाचणी विस्‍तारित करणार आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अ‍ॅॅॅॅबॉटकडून सीई मार्कसह भारतामध्‍ये कोविड-१९ प्रयोगशाळा-आधारित अ‍ॅॅॅॅण्‍टीबॉडी टेस्‍टच्‍या उपलब्‍धतेची घोषणा"

Leave a comment

Your email address will not be published.


*