डिस्कव्हरी चॅनलच्या ‘इंडिया 2050’ मध्ये अनियंत्रित पर्यावरण -हास आणि वातावरण बदलातील संभाव्य धोक्यांवर प्रकाश टाकला जाईल

India 2050 India Gateडिस्कव्हरी चॅनल, डिस्कव्हरी चॅनल एचडी, डिस्कव्हरी‌ सायंस आणि डिस्कव्हरी टर्बोवर डिसेंबर 29 रोजी रात्री 9:00 वाजता प्रसारित केली जाईल

मुंबई, 23 डिसेंबर, 2019 :अलीकडील अहवालानुसार* भारत हा वातावरण बदलामधील पाचवा सर्वाधिक संवेदनशील देश आहे. जगातील सर्वाधिक 30 प्रदूषित शहरांपैकी 22 शहरे भारतामध्ये आहेत, त्यामुळे ही माहिती अजिबात धक्कादायक नाही आहे**.

पर्यावरणीय हानीच्या ह्याच मार्गावर जर भारताची वाटचाल सुरू राहिली, तर काय होईल? त्यानंतर भारतातील आघाडीची शहरे कशी असतील? त्याविषयी आत्ताच जर काही केले गेले नाही, तर काय होईल, ह्याची झलक दाखवण्यासाठी डिस्कव्हरी चॅनल ‘इंडिया 2050’ ही अतिशय विचार प्रवर्तक डॉक्युमेंटरी सादर करत आहे व ती 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 9:00 वाजता प्रसारित केली जाईल.

भारतातील गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणा-या जयपूरपासून ही डॉक्युमेंटरी सुरू होते, परंतु त्यामध्ये 2050 मधील जयपूर दाखवले गेले आहे व ते पूर्णत: वाळूमध्ये गाडले गेलेले आहे. त्यानंतर दिल्ली, चेन्नै, मुंबई व कोलकाता ह्या सध्या प्रगतीपथावर असलेल्या महानगरांचे भविष्य त्यामध्ये दाखवले आहे. ह्यापैकी प्रत्येक महानगराचे भविष्य बघताना दर्शकांच्या अंगावर भितीने काटा येईल. 

ह्या शोचे महत्त्व सांगताना, डिस्कव्हरी साउथ एशियाचे डायरेक्टर- कंटेंट, वस्तुनिष्ठ व जीवनशैली मनोरंजन साई अभिषेक ह्यांनी म्हंटले, “जर आपण बदललो नाही, तर काय होणार आहे, ह्यावर इंडिया 2050 मध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. हा एक धोक्याचा इशारा आहे आणि वेळ निघून जाण्याआधी आपला आळस झटकून आपण प्रत्येकाने आपला भ्रम दूर करावा, असे आवाहन त्यामध्ये केले गेले आहे.”

ह्या शोमध्ये पर्यावरणीय व्यवस्थेला औद्योगिक घटकांमुळे झालेल्या हानीच्या सादरीकरणासंदर्भात ग्रेट डिरंजमेंटचे लेखक अमितव घोष ह्यांनी म्हंटले, “आपण कोणत्याच प्रकारे ह्यामध्ये कंपन्या व कॉरपोरेशन्सची भुमिका नाही, असे म्हणूच शकत नाही, कारण आता आपल्याला माहिती‌ आहे की, एक ही एक पद्धतशीर, योग्य निधी असलेली वातावरणाला विचारात न घेणारी यंत्रणा आहे! वस्तुत: ह्या पैशांमुळेच आता इतका दीर्घ काळ वातावरण बदलासंदर्भातील कृती अडकून पडलेली आहे.” पर्यावरणतज्ज्ञ आणि वातावरण बदल विशेषज्ञ चंद्र भूषण ह्यांनी इशारा दिला की, “आपण आपल्या मुलांना आपल्याला मिळाली होती, त्याहून खूप वाईट असलेली पृथ्वी ठेवून जाणार आहोत.”

भविष्याविषयी हे इशारे देत असताना ह्या फिल्ममध्ये मानवजातीसमोर येऊ घातलेले अधिक मोठे संकटही दाखवले आहे- पर्यावरणीय स्थलांतर आणि वातावरणामुळे होणारे शरणार्थी. सुंदरबन आणि भारताचा पूर्व किनारा अशा जागी काही विशिष्ट ठिकाणी त्याचे परिणाम आपण 2019 मध्ये आत्ताच बघत आहोत. आगामी काळासंदर्भात तज्ज्ञांचे भाकीत आहे की, जगातील प्रत्येक देशासमोर असलेले सर्वांत तातडीचे संकट हे असणार आहे, कारण समुद्राची पातळी वाढत राहील आणि हिमनद वितळत राहणार आहेत व त्यामुळे आपल्याला माहिती असलेल्या मानवी जीवनामध्ये अतिशय अनपेक्षित आणि अपरिवर्तनीय बदल घडून येत आहेत. 

“आपल्याकडे आता अजिबात वेळ नाही आहे. ऑगस्ट 2019 मध्ये 12 दिवसांमध्ये भारतामध्ये एक हजारपेक्षा जास्त तीव्र व अतितीव्र पावसाच्या घटना घडल्या! आपल्याला वातावरण बदलाचे अतिशय भयावह परिणाम बघायला मिळत आहेत आणि ते आत्ताच होत आहेत!”, असे सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरनमेंटच्या महासंचालिक सुनिता नरेन ह्यांनी म्हंटले आहे. “आपल्यासारखे लोक सुरक्षित आहेत, असे आपल्याला वाटते. परंतु आपल्या अशा उद्धटपणामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. कारण आपल्याला वाटते की, कशाचाच आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही! आपण काहीही करू, आणखी एक एअर कंडीशनर लावू, उष्णता बाहेर जात राहील. जर पाणी मिळत नसेल, तर आपण बाटलीचे पाणी विकत घेऊ. परंतु आपल्याला मृत्युपंथावरील नदीची काळजी वाटत नाही- कारण आपल्याला अजूनही नळाला स्वच्छ पाणी येते,” कोणत्याही प्रकारे वातावरण बदलाला रोखण्यासाठी संपूर्ण मानवजात म्हणून  आपण एकत्र का येऊ शकलो नाहीत, ह्याचे कारण आपली असंवेदनशीलता आहे, असे त्यांनी सांगितले.

29 डिसेंबर रोजी सायंकाळी 9 वाजता प्रदर्शित होणारी ‘इंडिया 2050’ ही फक्त डिस्कव्हरी चॅनल, डिस्कव्हरी चॅनल एचडी, डिस्कव्हरी सायंस आणि डिस्कव्हरी टर्बोवर पाहा.

*पर्यावरणीय विचार मंथन करणारी संस्था जर्मनवॉचने जारी केलेल्या अहवालामधील ‘जागतिक पर्यावरण जोखीम निर्देशांकानुसार’

** आयक्यु एअरव्हिज्युअल आणि ग्रीनपीसने जारी केलेल्या अहवालानुसार.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "डिस्कव्हरी चॅनलच्या ‘इंडिया 2050’ मध्ये अनियंत्रित पर्यावरण -हास आणि वातावरण बदलातील संभाव्य धोक्यांवर प्रकाश टाकला जाईल"

Leave a comment

Your email address will not be published.


*