फिक्‍की आणि वेस्टियन अहवालाच्‍या मते, २०१९च्‍या पहिल्‍या सहामाहीमधील २.७ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्‍या गुंतवणूकीसह भारतीय रिअल इस्‍टेट क्षेत्राची प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल

IMG_20190726_160704

  • अहवालामध्‍ये वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीदरम्‍यान रिअल इस्‍टेट क्षेत्रातील गुंतवणूकीच्‍या स्थितीचा उल्‍लेख
  • देशातील संस्‍थात्‍मक गुंतवणूकीमध्‍ये पीई गुंतवणूकदारांचे ८० टक्‍के योगदान
  • २०१८ मध्‍ये दशकातील सर्वाधिक ७.२ बिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक
  • परदेशी निधीसह १६.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूकीचे एकूण रिअल इस्‍टेट गुंतवणूकीमध्‍ये ५९ टक्‍क्‍यांचे योगदान
  • एकूण गुंतवणूकीच्‍या ५० टक्‍के योगदानासह कमर्शियल अॅसेट्समध्‍ये सर्वाधिक गुंतवणूक
  • गेल्‍या २ वर्षांमध्‍ये वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक्‍स क्षेत्र बनले अधिक लोकप्रिय
  • आकारमानाच्‍या संदर्भात मुंबईतील कंपन्‍यांनी सर्वाधिक गुंतवणूका प्राप्‍त केल्‍या, त्‍यानंतर बेंगळुरू दुस-या स्‍थानावर आणि गुरगाव तिस-या स्‍थानावर

मुंबई, २६ जुलै २०१९: फिक्‍की आणि वेस्टियनने भारतातील रिअल इस्‍टेट गुंतवणूक: सविस्‍तर विश्‍लेषण  अहवाल सादर केला. हा अहवाल रिअल इस्‍टेट क्षेत्रातील गुंतवणूक स्थितीची माहिती देतो. आज मुंबईत रिअल इस्‍टेट फायनान्सिंगसंदर्भात आयोजित करण्‍यात आलेल्‍या फिक्‍की परिषदेमध्‍ये हा अहवाल सादर करण्‍यात आला. हा अहवाल रिअल इस्‍टेट क्षेत्रातील क्रांती आणि त्‍यानंतरची गुंतवणूक स्थिती यासंदर्भात माहिती देतो. अहवालामधील अंतरंग रिअल इस्‍टेट क्षेत्राच्‍या गुंतवणूक स्थितीमधील आमूलाग्र बदल आणि आर्थिक गरजांसाठी बँक कर्जांवरील अत्‍याधिक अवलंबून राहण्‍यामधील त्‍याचा प्रवास याबाबत माहिती देतो. खासगी इक्विटी गुंतवणूकदारांनी संस्‍थात्‍मक गुंतवणूकीमध्‍ये जवळपास ८० टक्‍क्‍यांचे योगदान दिले आहे.

वर्ष २०१५ ते २०१८ या कालावधीदरम्‍यान देशातील रिअल इस्‍टेट गुंतवणूकीमध्‍ये सर्वाधिक प्रमाण आढळून आले आणि २०१९ मध्‍ये हीच स्थिती कायम आहे. वर्ष २०१५ ते २०१८ या कालावधीदरम्‍यान २५.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूकीची नोंद करण्‍यात आली. वर्ष २०१८  हे सर्वात यशस्‍वी वर्ष ठरले आणि या वर्षात दशकातील सर्वाधिक ७.२ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्‍या गुंतवणूका करण्‍यात आल्‍या. हाच ट्रेण्‍ड वर्ष २०१९ मध्‍ये देखील कायम आहे. यंदाच्‍या वर्षात जून महिन्‍यापर्यंत २.७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक झाल्‍याचे दिसून आले आहे.

संस्‍थात्‍मक गुंतवणूकांसाठी गुंतवणूक वातावरण अत्‍यंत हितकारक व अनुकूल बनले आहे. रिअल इस्‍टेट (नियमन व विकास) कायदा, बेनामी व्‍यवहार (प्रतिबंध) दुरूस्‍ती कायदा, सर्वांसाठी घरे मिशनचे सादरीकरण आणि एफडीआय नियमांमधील सुलभता अशा अनेक सुधारित उपायांमुळे गुंतवणूक वातावरण अनुकूल बनण्‍यामध्‍ये मदत झाली आहे. यामुळे सर्वोत्‍तम व पारदर्शक पद्धतींचा अवलंब करण्‍याचे प्रमाण वाढले आहे.

वेस्टियनच्‍या एपीएसीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीनिवास राव म्‍हणाले, रिअल इस्‍टेट हे सर्वात मुलभूत व प्रभावी क्षेत्र आहे. या क्षेत्राचा देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेच्‍या एकूण विकासावर परिणाम होतो. प्रबळ आणि सुसज्‍ज रिअल इस्‍टेट क्षेत्र इतर अनेक पूरक क्षेत्रांच्‍या सक्षमीकरणामध्‍ये मदत करते आणि आमच्‍यासारख्‍या अर्थव्‍यवस्‍थेमधील वाढीसाठी लक्षणीय आहे. आमचा विश्‍वास आहे की, हा अहवाल नियमन आव्‍हानांचे निराकरण करण्‍यामध्‍ये दीर्घकाळापर्यंत मदत करण्‍यासह क्षेत्रासाठी प्रगतीची दिशा दाखवण्‍यामध्‍ये देखील सहाय्यक ठरेल.  

ते पुढे म्‍हणाले, गेल्‍या दशकामध्‍ये आढळून आलेले प्रमुख ट्रेण्‍ड म्‍हणजे रिअल इस्‍टेटमध्‍ये संस्‍थात्‍मक गुंतवणूकीमध्‍ये वाढ झाली आहे. विशेषत: पीई गुंतवणूक बाजारपेठेमधील विकासाला प्रमुख घटक ठरली आहे. को-वर्किंग स्‍पेसेस, भाड्याच्‍या घरामध्‍ये को-लिव्हिंग, परवडणारी घरे आणि वेअरहाऊसिंग व लॉजिस्टिक्‍स अशा सुविधांसह संस्‍थात्‍मक विभागातील गुंतवणूकीप्रती रूची वाढण्‍याची अपेक्षा आहे.

फिक्‍की रिअल इस्‍टेट कमिटीचे अध्‍यक्ष आणि टाटा रिअॅल्‍टी अॅण्‍ड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. संजय दत्‍त म्‍हणाले, भारतीय रिअल इस्‍टेट क्षेत्र क्रांतिकारी परिवर्तनांसह प्रगतीपथावर आहे. या क्षेत्रामध्‍ये गुंतवणूका वाढण्‍यासह क्षेत्रावरील विश्‍वास देखील वाढत आहे.  अहवालामध्‍ये स्‍पष्‍ट करण्‍यात आलेल्‍या रिअल इस्‍टेट क्षेत्राच्‍या क्षमतेमधून प्रेरित होत ते पुढे म्‍हणाले, वर्ष २०१९ची सुरूवात सकारात्‍मकतेसह झाली आहे. देशभरातील विविध अॅसेट विभागांमधून वर्षाच्‍या पहिल्‍या सहामाहीमध्‍ये जवळपास २.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स रिअल इस्‍टेट गुंतवणूकांची नोंद झाली आहे. पायाभूत सुविधा, रस्‍ते आणि शहरांमधील सुधारणांसह तंत्रज्ञान (उदा. ५जी) अवलंबतेला मिळालेली वाढती गती क्षेत्रासाठी प्रभावी गेम चेंजर्स ठरतील. यामुळे क्षेत्रातील गुंतवणूकदारांची रूची वाढेल. भारताच्‍या पहिल्‍या रिअल इस्‍टेट इन्‍व्‍हेस्‍टमेंट ट्रस्‍टचे (आरईआयटी) सादरीकरण हे क्षेत्रासाठी आणखी एक सकारात्‍मक पाऊल आहे. यामुळे भारतात गुंतवणूक करण्‍यासाठी जागतिक रिअल इस्‍टेट गुंतवणूकदारांमध्‍ये विश्‍वास निर्माण होईल.

व्‍यावसायिक विभाग: एक विजेता

व्‍यावसायिक विभाग हा गुंतवणूकदारांना आकर्षून घेणारा सर्वात पसंतीचा विभाग म्‍हणून उदयास आला आहे. या विभागाने २०१६ पासून देशातील रिअल इस्‍टेट गुंतवणूकीमध्‍ये सर्वाधिक योगदान दिले आहे. वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीदरम्‍यान रिअल इस्‍टेट गुंतवणूकांमध्‍ये व्‍यावसायिक मालमत्‍तेचे अधिक योगदान राहिले आहे. एकूण गुंतवणूक मूल्‍याच्‍या ५० टक्‍के योगदान या विभागाचे आहे. व्‍यावसायिक विभागामध्‍ये व्‍यवहार करण्‍यात आलेली सर्वात लक्षणीय डील म्‍हणजे ब्‍लॅकस्‍टोनने मध्‍य मुंबईतील इंडियाबुल्‍सच्‍या प्रमुख कार्यालय प्रॉपर्टीज वन इंडियाबुल्‍स सेंटर आणि इंडियाबुल्‍स फायनान्‍स सेंटरमध्‍ये ७३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्ससाठी ५० टक्‍के हिस्‍सा घेतला. याविरूद्ध निवासी विभागामध्‍ये घट दिसून आली आहे. नियामक बदल, रोख रक्‍कमेचा अभाव, प्रकल्‍पांमधील विलंब आणि खरेदीदारांचा कमी उत्‍साह अशा घटकांमुळे निवासी बाजारपेठेमध्‍ये मंदीचे वातावरण आहे.  

परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता उत्‍साह

परदेशी निधींमुळे भारतातील विकासगाथेला वाढती चालना मिळाली आहे आणि भारतीय रिअॅल्‍टी क्षेत्रामध्‍ये त्‍यांच्‍या लक्षणीय गुंतवणूका दिसण्‍यात आल्‍या आहेत. यामधून दिसून येते की, सरकारने हाती घेतलेल्‍या नियामक उपायांमुळे गुंतवणूकारांमधील विश्‍वास वाढला आहे आणि क्षेत्राप्रती आकर्षकता देखील वाढली आहे. वर्ष २०१५ ते २०१९ दरम्‍यान भारतीय रिअल इस्‍टेटमध्‍ये परदेशी निधींचे योगदान लक्षणीयरित्‍या वाढले. वर्ष २०१५ मध्‍ये १.३ बिलियन अमेरिकन डॉलर्सची नोंद करण्‍यात आलेल्‍या गुंतवणूका वर्ष २०१७ मध्‍ये ३.३ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचल्‍या. परदेशी गुंतवणूकदारांपैकी सिंगापूरमधील पीई कंपन्‍या जसे जीआयसी, एस्केंडास-सिंगब्रिज आणि झेंडर या भारतीय रिअॅल्‍टी क्षेत्रामध्‍ये, खासकरून दक्षिण भागांमध्‍ये सक्रिय आहेत. ज्‍यामुळे वर्ष २०१५ ते २०१९ दरम्‍यान पीई गुंतवणूकांचे सर्वाधिक प्रमाण राहिले आहे. क्षेत्रामध्‍ये प्रबळ रूची दाखवलेल्‍या इतर कंपन्‍या यूएसए, कॅनडा व अबु धाबी या देशांमधील आहेत.

मुंबईचे वर्चस्‍व

भारताच्‍या दक्षिण व पश्चिम भागांमधील प्रबळ स्‍पर्धा होत आहे. हे भाग संस्‍थात्‍मक गुंतवणूकदारांकडून गुंतवणूकीसंदर्भात सर्वाधिक हिस्‍सा असल्‍याचा दावा करू इच्छितात. तसेच रिअल इस्‍टेट गुंतवणूकीला चालना देणा-या शहरांमध्‍ये मुंबईमधील कंपन्‍यांनी आकार व आकड्याच्‍या संदर्भात सर्वाधिक गुंतवणूका प्राप्‍त केल्‍या. वर्ष २०१५ ते २०१९ दरम्‍यान मुंबईमध्‍ये १० बिलियन अमेरिकन डॉलर्सच्‍या गुंतवणूकांची नोंद झाली. एकूण गुंतवणूकांमध्‍ये ३६ टक्‍के हिस्‍स्‍याचे योगदान असल्‍याचे दिसून आले. त्‍यानंतर बेंगळुरूमध्‍ये २१ टक्‍क्‍यांच्‍या हिस्‍स्‍यासह ६ बिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूकींची नोंद झाली आणि गुरगावमध्‍ये जवळपास १३ टक्‍क्‍यांच्‍या हिस्‍स्‍यासह ३.६ बिलियन अमेरिकन डॉर्ल्‍स गुंतवणूकींची नोंद झाली. वर्ष २०१९ मध्‍ये जून महिन्‍यापर्यंत मुंबईने देशातील एकूण गुंतवणूकांमध्‍ये ५२ टक्‍क्‍यांचे योगदान दिले आहे.  

परवडणा-या घरांमुळे निवासी विभागाला चालना

वर्ष २०१८ मध्‍ये परवडणा-या गृहनिर्माण क्षेत्रामधील नवीन सादरीकरणे आणि विक्रीमुळे निवासी बाजारपेठेमध्‍ये सुधारणा दिसण्‍यात आली. वर्ष २०१९ मध्‍ये देखील बाजारपेठ विकासाला चालना मिळेल असा आम्‍हाला विश्‍वास आहे. तसेच विभागामधील पारदर्शकता आणि पायाभूत सुविधांचे वाटप, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ, क्रेडिट लिंक बचत योजना आणि घरावरील जीएसटी दरामध्‍ये लक्षणीय घट अशा विविध नियमांमुळे या विभागाला चालना मिळण्‍यामध्‍ये मदत झाली आहे.

भारतातील रिअल इस्‍टेटचा बदलता चेहरा: नवीन अॅसेट विभागांचा उदय

को-वर्किंग विभागामध्‍ये लक्षणीय वाढ झाली आहे. हा नवीन ट्रेण्‍ड व्‍यावसायिक रिअल इस्‍टेट बाजारपेठेला सामायिक कार्यक्षेत्रांच्‍या नवीन युगाची सुविधा देण्‍यामध्‍ये मदत करत आहे. सध्‍याला अव्‍वल आठ शहरांमध्‍ये १८० हून अधिक को-वर्किंग ऑपरेटर्स आहेत. बेंगळुरू, एनसीआर आणि मुंबईमधील कार्यालय बाजारपेठा या ट्रेण्‍डसाठी सर्वोत्‍तम संधी देतात. यानंतर हैद्राबाद व चेन्‍नई यांचा क्रमांक लागतो. वर्ष २०१९ मध्‍ये तंत्रज्ञान, नाविन्‍यपूर्ण स्‍पेस डिझाइन आणि आधुनिक व्‍यवसायांवर परिणाम करणा-या लवचिकतेसह कार्यक्षेत्रामधील आमूलाग्र बदलामुळे को-वर्किंग विभागाचे बाजारपेठेमध्‍ये मोठे योगदान असण्‍याची अपेक्षा आहे.

त्रासमुक्‍त, सोईस्‍कर प्‍लग अॅण्‍ड प्‍ले मॉडेलचा अंतरिक लाभ देणारे को-लिव्हिंग क्षेत्रे अधिकाधिक भाडेकरूंना आकर्षून घेण्‍याची अपेक्षा आहे. आगामी काळामध्‍ये हा विभाग कितीतरी पटीने विकसित होण्‍याची अपेक्षा आहे. गेल्‍या २ ते ३ वर्षांमध्‍ये देशभरात ४० हून अधिक को-लिव्हिंग स्‍टार्ट-अप्‍स सुरू झाल्‍या आहेत आणि हा विभाग उद्यम भांडवल निधीमधील रूची देखील लक्षणीयरित्‍या वाढवत आहे. नेस्‍टावेने ९४.२ मिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी उभारल्‍याचे, तर सुसज्‍ज भाड्याच्‍या घरांची सुविधा देणा-या कोलिव्‍हने ९.२ मिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी उभारल्‍याचे निदर्शनास आले आहे. आणखी एका मोठ्या निधी उभारणीमध्‍ये विद्यार्थ्‍यांना भाड्याने घराची सुविधा देणारी स्‍टार्ट-अप स्‍टान्‍झा लिव्हिंगने वर्ष २०१८ मध्‍ये १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी उभारला.

वेअरहाऊसिंग व लॉजिस्टिक्‍स विभाग प्रबळ आर्थिक तत्‍त्‍वे, सक्रिय सरकारी धोरणे जसे जीएसटी अंमलबजावणी व मेक इन इंडिया धोरण आणि संघटित रिटेल व ई-कॉमर्समध्‍ये स्थिर वाढ यांमुळे गुंतवणूकदारांचा उत्‍साह वाढवण्‍याला चालना देत आहेत. अलिकडील वर्षांमध्‍ये बेंगळुरू, चेन्‍नई आणि हैद्राबाद या दक्षिणी शहरांमधील गुंतवणूकदारांचा गुंतवणूकांसंदर्भात उत्‍साह वाढलेला आहे. प्रमुख डील्‍समध्‍ये वॉरबर्ग पिन्‍कसने बेंगळुरूमधील प्रकल्‍पासाठी एम्‍बेसी ग्रुपमध्‍ये १८० मिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली, तर प्रोप्रियम कॅपिटल पार्टनर्सने हैद्राबादमधील मुसद्दीलाल प्रोजेक्‍ट्समध्‍ये १०० मिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली.

पूर्ण अहवाल पाहण्‍यासाठी https://www.vestian.com/pdf/report/vestian-ficci-report.pdf येथे क्लिक करा.

वेस्टियन बाबत:

वेस्टियन ही कार्यस्‍थळांसदर्भात सोल्‍यूशन्‍स देणारी समकालीन कंपनी आहे. ही कंपनी व्‍यावसायिक, औद्योगिक, रिटेल आणि आदरातिथ्‍य क्षेत्रांसाठी ऑक्‍युपायर-केंद्रित सोल्‍यूशन्‍स देण्‍यामध्‍ये विशेषीकृत आहे. आमच्‍या सेवा पोर्टफोलिओमध्‍ये इंटीग्रेटेड सर्विस डिलिव्‍हरी, प्रोजेक्‍ट सर्विसेस, इन्‍व्‍हेस्‍टमेंट अॅण्‍ड कन्‍सल्‍टण्‍सी सर्विसेस, ट्रॅन्‍झक्‍शन अॅडवायजरी सर्विसेस, रिटेल बिझनेस सोल्‍यूशन्‍स आणि इंटीग्रेटेड फॅसिलिटीज मॅनेजमेंट सर्विसेस यांचा समावेश आहे. वेस्टियन दर्जात्‍मक व्‍यवस्‍थापन यंत्रणा, लाचलुचपत-विरोधी व्‍यवस्‍थापन यंत्रणा आणि पर्यावरणीय आरोग्‍य व सुरक्षा दर्जांमध्‍ये आयएसओ 9001, आयएसओ 37001,  आयएसओ 14001 आणि ओएचएसएएस 18001 प्रमाणित कंपनी आहे. वेस्टियन ही इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलची सदस्‍य आहे. इन्‍व्‍हेस्‍टमेंट अॅण्‍ड कन्‍सल्‍टण्‍सी सर्विसेस (आयसीएस) ही वेस्टियनची संशोधन, सल्‍लागार व गुंतवणूक सोल्‍यूशन्‍स शाखा आहे.

फिक्‍की बाबत:

१९२७ मध्ये स्थापन झालेली फिक्‍की ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी व्यावसायिक शिखर संस्था आहे. तिचा इतिहास हा भारताच्‍या स्वातंत्र्यलढ्याशी, भारताच्या औद्योगिकीकरणाशी आणि जलद गतीने वाढणारी जागतिक अर्थव्यस्था म्हणून भारताच्या उदयाशी जोडला गेलेला आहे. ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था असलेली फिक्‍की ही भारतातील व्यवसाय व उद्योगांचा आवाज आहे. धोरणाला चालना देण्‍यापासून चर्चेला प्रोत्‍साहन देणे, धोरणकर्ते व नागरी समाजाला सामावून घेणे यांसह फिक्‍की उद्योगाची मते व समस्‍यांना स्‍पष्‍टपणे समोर आणते. कंपनीच्‍या सदस्‍यांमध्‍ये भारतीय खासगी व सार्वजनिक कॉर्पोरेट क्षेत्र आणि बहुराष्‍ट्रीय कंपन्‍यांचा समावेश आहे. ज्‍यामुळे राज्‍यातील कंपनीची व्‍यापार व उद्योगाची वैविध्‍यपूर्ण प्रादेशिक उपस्थिती अधिक प्रबळ होण्‍यासह कंपन्‍यांचा आकडा २५०,००० हून अधिक सदस्‍यांपर्यंत पोहोचला आहे. फिक्‍की क्षेत्रांमध्‍ये नेट‍वर्किंग आणि एकमतासाठी व्‍यासपीठ देते आणि ही कंपनी भारतीय उद्योग, धोरणकर्ते व आंतरराष्‍ट्रीय व्‍यवसाय समुदायासाठी प्राधान्‍य क्षेत्र आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.