Hospital, Health & Pharma

No Picture

Retinopathy of Prematurity: How to Prevent Blindness? By Dr Tandava Krishnan, Vitreo retinal surgeon, Maxivision super specialty Eye Hospital

Dr Tandava Krishnan, Vitreo retinal surgeon, Maxivision super specialty Eye Hospital NATIONAL, 14 NOVEMBER, 2020 (GPN): Article By Dr Tandava Krishnan, Vitreo retinal surgeon, Maxivision super specialty Eye Hospital Definition: Retinopathy of prematurity or ROP…


TODAY’S TOP NEWS SATURDAY, 14th NOVEMBER, 2020: (NEWS, EDUCATION, JOKES, ENTERTAINMENT AND MORE)

TODAY’S TOP NEWS, 14 NOVEMBER, 2020 (GPN): HAPPY DIWALI🎉🌟🎊💥🔥✨ May the divine light of Diwali spread into your life and bring peace, prosperity, happiness, good health and grand success. NATIONAL NEWS: Ayodhya witnesses Deepotsav grandeur…








एअरटेल पेमेंट्स बँक भारती एक्सा जनरल इन्शुरन्सच्या संयुक्त विद्यमाने देणार कार विमा

मुंबई, 11 नोव्हेंबर, 2020: एअरटेल पेमेंट्स बँकेने आज जाहीर केले की ते भारती एक्सा जनरल विमा यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसमावेशक कार विमा देणार.  ही पॉलिसी स्मार्ट ड्राईव्ह खासगी कार विमा अपघात, चोरी आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे वाहनाचे नुकसान होण्यापासून आर्थिक संरक्षण देते. तसेच ही पॉलिसी कार अपघातामुळे झालेल्या दुसर्‍या व्यक्तीला किंवा मालमत्तेला झालेल्या इजा किंवा नुकसानीची भरपाई देखील देते. विमा पॉलिसीधारकासाठी वैयक्तिक अपघात कव्हरसह येतो. एखादा अपघात झाल्यास कायमचे अपंगत्व किंवा जीवितहानी झाल्यास  ही पॉलिसी त्याच्या कुटूंबाचे संरक्षण करते. एअरटेल पेमेंट्स बँकेचे ग्राहक कागदविरहित, सुरक्षित आणि द्रुत प्रक्रियेद्वारे एअरटेल थँक्स अॅपद्वारे पाच मिनिटांत ही पॉलिसी सहज खरेदी करू शकतात. पूर्व तपासणीची आवश्यकता नसल्यामुळे ग्राहकाला केवळ वाहनाची माहिती भरणे आवश्यक असते आणि त्वरित विमा त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर दिला जातो. रिनेवलच्या वेळी  ग्राहक विविध प्रकारच्या अ‍ॅड ऑन कव्हर्सवरुन पर्याय निवडू शकतात. यामध्ये अवमूल्यन कव्हर, लहान उपभोग्य वस्तू, कारची चावी हरविणे किंवा बदलणे, कार ब्रेकडाऊन झाल्यास रस्त्याच्या कडेला मदत करणे, इंजिन किंवा गिअरबॉक्सचे नुकसान, तसेच  पॉलिसीधारक जखमी झाल्यास वैद्यकीय खर्च, रूग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका खर्च आणि इतर बर्‍याच गोष्टींचा समावेश आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर  श्री. गणेश अनंतनारायणन म्हणाले,“आम्ही आमच्या ग्राहकांच्या विविध विमा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सुसज्ज उत्पादन देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या देशात लाखो लोक कारचा वापर करत असल्यामुळे त्याना कार विमा घेणे अनिवार्यच  आहे. हा सर्वसमावेशक कार विमा देण्यासाठी भारती अ‍ॅक्सए जनरल विमासह भागीदारी केल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.” ENDS