डाउन सिंड्रोम असलेल्या मुलांचा स्वीकार करा, योग्य नोकर्या निर्माण करा आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्यास सक्षम करा : न्युबर्ग डायग्नोस्टिक्समधील पॅनेलिस्टचे मत
मुंबई, 23 मार्च 2022 (GPN): भारतातील सर्वात मोठ्या पॅथलॅब पैकी एक असलेल्या न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सतर्फे विशेष गरजा असलेल्या मुलांचे पालक आणि काळजी घेणार्यांसाठी जनजागृतीपर सत्र आयोजित केले होते. पॅथलॅबने राष्ट्रीय स्तरावरील विशेषज्ञ आणि तज्ज्ञांना एका व्यासपीठावर आणून बौद्धिक विकासास विलंब करणाऱ्या अनुवंशिक आजारांबद्दलची माहिती दिली. पालकांपैकी एका पालकाने त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आपल्या पाल्याला वाढवताना आलेला अनुभव उपस्थितांना सांगितला. तसेच इतर पालकांनाही एकमेकांना मदत करण्यास, पाठींबा देण्याचे आवाहन केले. प्रायमरी केअर फिजिशियन डॉक्टरांनी अनुवांशिक आजार, त्यातील गुंतागुंत, नियमित तपासणीची आवश्यकता, तातडीने केले जाणारे वैद्यकीय उपचार आणि आरोग्य सेवा पुरवठादारांच्या भूमिकेबद्दल चर्चा केली. त्यांनी या विशेष मुलांना दैनंदिन जीवनात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांबाबत सांगतानाच जागरूकता आणि सामूहिक प्रयत्न या मुलांना मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी कसे सक्षम बनवू शकतात हे देखील सांगितले. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लखनौच्या एमडी (बालरोग)आणि मेडिकल जेनेटिक्स विभाग प्रमुख डॉ. प्रा. शुभा फडके यांनी माहिती दिली की, भारतात दरवर्षी डाउन सिंड्रोम असलेली सुमारे…