
Maharashtra Economic Development Council (MEDC)
मुंबई, 21 जानेवारी, 2025 (GPN): महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ (एमईडीसी), अध्यक्ष श्री. अतुल शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली, संमेलनाचे संयोजक श्री. नीलेश साठे, माजी सदस्य, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय), माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, (एलआयसी म्युच्युअल फंड) आणि श्री. आनंद कुलकर्णी, समिती सदस्य, बैंकिंग, वित, विमा, एमईडीसी, प्रशासकीय मंडळालाचे सदस्यांसह विमा आणि पुनर्विमा परिषद २०२५, शाश्वत भविष्य घडवणे आणि जोखीमांचे संधींमध्ये रूपांतर करणे” या विषयावर. २३ जानेवारी २०२५ रोजी रंगस्वर हॉल, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ येथे (सकाळी १०:०० ते दुपारी ४:००) या वेळेत आयोजन केले आहे.
या परिषदेत विमा क्षेत्रातील शाश्वत वाढीसाठी नाविन्यपूर्ण धोरणांवर प्रकाश टाकण्यात येईल. नवीन उदयोन्मुख धोके हाताळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि कमी करण्यासाठी प्रभावी उपाय सुचवणे यावर परिषदेचा भर राहील. या कार्यक्रमात उपस्थित लोक विमा क्षेत्रमध्ये करिअरच्या संधी देखील शोधतील, व्यावसायिकांना विमा उद्योगाच्या संभदित विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाची दिशा आणि शाश्वत, भविष्यासाठी तयार व्यवसाय आणि बाजारपेठेत योगदान देण्यासाठी सुसज्ज करण्यावर लक्ष केंद्रित करतील. या कार्यक्रमात बँका, वित्तीय संस्था, शैक्षणिक संस्था, दलाल, व्यापारी, खाजगी आणि सार्वजनिक संस्था, सरकारी संस्था आणि विमा कंपन्या अशा विविध भागधारकांच्या सहभागाचे स्वागत आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रामधिल प्रेक्षक विमा क्षेत्रातील सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नेटवर्किंग संधींना प्रोत्साहन, ज्यामुळे प्रभावी चर्चा आणि नाविन्यपूर्ण उपाय सुनिश्चित होतात यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर ही परिषद बौद्धिक चर्चा करेल.
परिषदेच्या प्रमुख पाहुण्या मिस. विभा पडळकर, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एचडीएफसी लाइफ), मुंबई, हे परिषदेचे उद्घाटन करतील आणि प्रमुख वक्ते, श्री वेंकटचलम अय्यर, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, (टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स) आणि श्री द्वैपायन दत्ता, प्रमुख (लाईफ अॅड हेल्थ रीइन्शुरन्स अॅड इन्शुरटेक सोल्युशन्स, जीएम. जे. बी. बोडा ग्रुप), त्यांचे विमा क्षेत्रातील विचार आणि अनुभव उपस्थितांसोबत शेअर करतील.
परिषदेचे प्रमुख वक्ते पुढीलप्रमाणे आहेतः
1) श्री. आर. दोराईस्वामी, प्रबंध निदेशक (एलआईसी)
2) श्रीमती, लता अय्यर, उप महाव्यवस्थापक (न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिनिटेड)
3) श्रीमती. कस्तुरी सेनगुप्ता, महाव्यवस्थापक (नॅशनल इन्शुरन्स कंपनी कोलकाता, ईडी (नियुक्त) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड) मुंबई
4) डॉ. जॉर्ज थॉमस, नियंत्रक (भारतीय बीमा संस्थान)
5) श्री. राजीव गुप्ता, अध्यक्ष (पॉलिसी बाजार फिनटेक)
6) श्री. अमित कदम, उपाध्यक्ष (एस यू डी लाईफ)
7) श्री. गणेश अय्यर, संस्थापक (अय्यर्स प्रोरिस्क बिझनेस सोल्युशन्स)
8) श्री. ए. व्ही. व्ही. गोपाळ राव, प्रमुख जोखीम आणि व्यावसायिक दावे (रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड), मुंबई
9) श्री. सुशील साळुंके, उपाध्यक्ष (टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स)
10) श्री. सुंदर नटराजन, मुख्य मानव संसाधन अधिकारी (इंडिया फर्स्ट)
11) डॉ. रमेश कुमार सतुलुरी, सहाय्यक प्राध्यापक (संशोधन), (कॉलेज ऑफ इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया)
12) श्री. बिजॉय डे, वरिष्ठ उपाध्यक्ष (बजाज लाइफ इन्शुरन्स)
एमईडीसीला जाहीर करताना गौरव वाटत आहे की इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे एक प्रतिष्ठित नॉलेज पार्टनर आहे आणि टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स पॉलिसी बाजार, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि वॉलनट- आप का बिमा द्वारे जे. बी. बोडा अँड कंपनी प्रा. लि. यांचे समर्थन आहे.
एमईडीसी बद्दलः
एमईडीसीची स्थापना १९५७ मध्ये प्रख्यात अर्थतज्ज (कै.) धनंजयराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली झाली. डॉ धनंजयराव गाडगीळ हे भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष होते. राज्यात जलद आणि संतुलित आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी एमईडीसी ची स्थापना केली गेली. सहा दशकांहून अधिक काळ पसरलेल्या समृद्ध वारशासह, एमईडीसी चे नेतृत्व प्रतिष्ठित व्यक्तींनी अध्यक्ष म्हणून केले आहे. मंडळ महाराष्ट्र सरकारसाठी व्यवसाय आणि उद्योगांसाठी एक आर्थिक थिंक टैंक म्हणून काम करते. एमईडीसी ने उद्योग केंद्रित उपक्रम राबविण्यासाठी आणि तिच्या सर्व सदस्यांना नेटवर्क संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत.
अधिक माहितीसाठी, कृपया श्री. शुभम जोगदंड यांच्याशी ९३२२३५७५६७ वर संपर्क साधा.
Be the first to comment on "महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ (एमईडीसी) तर्फे २३ जानेवारी २०२५ रोजी मुंबई येथे विमा आणि पुनर्विमा परिषद २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे"