Annual Diwali Gifts distributed to 3500 needy blind women and men in Ghatkopar
घाटकोपर मध्ये ओंकार अंध केईव्हीके सोसायटी तर्फे ३६ वा दिपावली भेट वस्तू वाटप कार्यक्रम संपन्न
३५०० गरजू अंध महिला पुरुषांना दीपावलीची वार्षिक भेट
मुंबई :- ओंकार अंध केईव्हीके सोसायटी घाटकोपर मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने अंध महिला पुरुषांना ३६ वा दीपावली सप्रेम भेट कार्यक्रम घाटकोपर पूर्व पंतनगर येथील अरुणकुमार वैद्य मैदान येथे रविवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता. सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेचे सक्रिय सदस्य देवरे पाटील, धर्मेश गिरी यांच्या पुढाकारातून दीपावली निमित्त जे वंचित आणि गरजू आहेत असे ३५०० अंध महिला पुरुष व्यक्तींना ओंकार अंध केईव्हीके सोसायटी तर्फे फराळी किराणा, मिठाई इत्यादींसह खाद्यपदार्थांच्या भेटवस्तू वितरण करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे नम्रमुनी महाराज,
माजी खासदार मनोज कोटक, आमदार पराग शाह, विकासक सुंदर भाई शाह, चंद्रकांत घोघरी, यांच्यासह संस्थेचे प्रमुख पदाधिकारी देवरे पाटील, धर्मेश गिरी, नितीन शाह, विपुल मेहता आदीसह कार्यकर्त्यांच्या हस्ते भेट वस्तू वाटप करण्यात आले. दरम्यान सर्व सहभागी झालेल्या गर्जुना सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या दिपावली भेट वस्तूंचा राज्य भरातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई येथील ३५०० अंध बंधू बघिणी आणि विधवा बहिणींना लाभ मिळाला आहे. अशा प्रकारे राज्य भरात ठीक ठिकाणी दिपावली भेट वस्तू वाटप करण्यात येत असून गुजरातमध्ये ही ओमकार अंध केईव्हीके सोसायटी तर्फे दिपावली भेट वस्तूंचे वाटप करत असल्याचे आयोजक देवरे पाटील व धर्मेश गिरी यांनी सांगितले. या वाटप कार्यक्रमात संस्थेच्या कार्यकर्ते सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार अंध केईव्हीके सोसायटी चे सदस्य अशोक टी. देवरेपाटील, धर्मेश गिरी, प्रविणभाऊ तन्ना, विपुलभाई मेहता (छायाचित्रकार), कमलेशभाई ठोसानी (केटरर), डॉ. अनिल सेमवाल, निरुपा नितीन शहा,सचिन रूपारेल, विपुल के. पारेख, भावेश गिरी आदिसह सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन हा दीपावली भेट कार्यक्रम यशस्वी केला.
Be the first to comment on "36th Diwali Gift Distribution Program concluded by Omkar Andh KEVK Society for Blind People"