मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सुप्रिमो दसरा मेळाव्यात, वाघाची पुन्हा गर्जना!
CM Eknath Shinde Addresses Shiv Sena Dusshera Rally at Azad Maidan, The Tiger Roars Again!

CM Eknath Shinde Shiv Sena Supremo Dusshera Rally – The Tiger Roars Again!
MUMBAI, 12 OCTOBER, 2024 (GPN): The Election Commission is expected to announce Maharashtra and Jharkhand Assembly elections after Dussehra and the political parties believe that polls can be held in November. In such a case, the Vijayadashami and Dussehra Occasion which indicates the Victory of Good over the Evil is the right moment to blow the gaff and the horn.The Dussehra rallies serve as the perfect platform for mainstream political parties to show their strength and blow the poll bugle in Maharashtra.
CM Eknath Shinde, Shiv Sena Supremo addressed his factions Dussehra Rally at the Azad Maidan, Taking a dig at Uddhav Thackeray the CM said, “You tried to change Shiv Sena’s saffron colour, we changed yours, Our mentor Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray would never have lived with such people. If anyone could fulfill all the dreams of Balasaheb and my mentor Dharmaveer Anand Dighe, It is our Prime Minister Narendra Modi. Balasaheb Thackeray had said he will give the Chief Minister seat to his Shiv Sainik, forget me he could have made any body the CM from his Shiv Sainiks but this Uddhav forgot the ideals of Sena Supremo and sat as the chief minister himself. But following footsteps of Balasaheb, Modi did it and made me Chief Minister.
Uddhav (UBT) was saying that our government will fall in six months, but Chief Minister Eknath Shinde strongly criticized Uddhav Thackeray that he has completed two years, not by polishing, cleaning and begging but by Confronting and Standing firmly with conviction and determination. Shinde also took a Jibe at UBT saying that Uddhav disliked his Beard (Dadi) but It was this Dadi (Beard) that has destroyed your Maha Vikas Aghadi. CM Eknat Shinde told his party people like him as the face of CM with the Dadi, unlike the MVA whose party people don’t like UBT as the face for CM.
Criticizing Uddhav Thackeray CM Eknath Shinde said, “There is now no difference between your Shiv Sena (UBT) and Asaduddin Owaisi-led AIMIM.” We liberated this Shiv Sena, this is Azad Shiv Sena of Azad Shiv Sainiks standing today in this massive rally at Azad Maidan, We freed Shiv Sena from those who betrayed Balasaheb’s ideals. I welcome everyone. Today, saffron has spread. They were saying that this government will fall in fifteen days, one month, six months, but Eknath Shinde was buried. Eknath Shinde said that I have completed 2 years by rubbing and wiping.
This Mahayuti government had taken an oath at the previous Dussehra gathering to give reservation to the Maratha community. We immediately made a reservation. But who went to court? The opposition went there, However, the court still upheld the Maratha reservation.
The Chief Minister targeted Uddhav Thackeray as selfish and said that we go to Delhi to get projects, we don’t go to ask to become the Chief Minister like you. The Prime Minister gave the status of classical language to Marathi language. On that day, Ashatai also praised our government. The scheme of the government is to help the poor.
Shinde accused and alleged Uddhav of corruption in the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) and alleged that the Maha Vikas Aghadi (MVA) government impeded infrastructure projects in Mumbai and Maharashtra. “We are not the ones who do Facebook Live but work face to face,” he asserted, suggesting that Uddhav’s inaction could not be justified by the COVID-19 pandemic.
CM Eknath Shinde also alleged Uddhav Thackeray failed to prioritise the welfare of Dharavi’s residents during his tenure. Your moto was Surrender To Tender. When looting the contractors, You should have felt ashamed of you own self, You have no shame in public but feel ashamed when you look in the mirror.You built bungalow after bungalow while Dharavi’s residents remained in slums,” he claimed, defending his government’s decision to rehabilitate all 2.10 lakh residents of Dharavi.

CM Eknath Shinde Shiv Sena Supremo Dusshera Rally – The Tiger Roars Again!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला होता, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आज दसरा आहे, असत्याचा रावण आपल्याला गाडून टाकायचा आहे. विधानसभेचा विजय भव्य दिव्य असला पाहिजे. निर्धार करा विरोधकांना चारही मुंड्या चीत करण्याचा. राज्यात आज जे वातावरण आहे ते समृद्ध आहे. हे आपण केलं ते येणाऱ्या काळात महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही.या सरकारने आधीच्या दसरा मेळाव्याला शपथ घेतली होती, मराठा समाजाला आरक्षण देणार. आम्ही ताबडतोब आरक्षण दिलं. पण कोर्टात कोण गेले? विरोधक कोर्टात गेले, तरीही कोर्टाने मराठा आरक्षण अजून कायम ठेवले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, “जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने घासून, बसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, मी आनंद दिघे यांचा चेला आहे, असा स्वस्तात परत जाणार नाही. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळून जाणारा नाही, तर लोकांना पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक कधीच मैदान सोडत नाहीत. शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडत नाहीत. म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे निघालो आहोत”
आता निवडणूक येणार असून राज्यातील जनता महायुतीला मोठं करणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, माझ्या लाडक्या बहिणी या सरकारच्या ब्रँड ॲम्बेसेडर झाल्या आहेत. लाडके भाऊ ब्रँड ॲम्बेसेडर झालेत.
आम्ही दिल्लीला जातो प्रकल्प आणण्यासाठी, मला मुख्यमंत्री करा सांगायला जात नाही. पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यादिवशी आशाताई यांनी देखील आमच्या सरकारचे कौतुक केलं. सरकारची योजना गोरगरिबांना मदत करणारी आहे.
तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला, आम्ही तुमचाच रंग बदलला. अशा लोकांसोबत बाळासाहेब कधीही राहिले नसते.बाळासाहेबांची सगळी स्वप्नं कुणी पूर्ण केली तर प्रधानमंत्री मोदी यांनी केली. ठाकरे म्हणत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार. मला सोडा दुसऱ्याला बनवायचे होते, पण हे स्वतःच मुख्यमंत्रिपदी बसले. मोदींनी ते केलं आणि मला मुख्यमंत्री बनवलं.
सहा महिन्यात आमचं सरकार पडणार असं ठाकरे म्हणत होते, पण घासून-पुसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असा टोलाही शिंदे यांनी लगावला. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.
तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला तुमचाच रंग बदलला. अश्या लोकांसमोर बाळासाहेब कधीही राहिले नसते. बाळासाहेबांची सगळी स्वप्न कोणी पूर्ण केली तर प्रधानमंत्री मोदी यांनी केली. हे म्हणत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारे मला सोडा दुसऱ्याला बनवायचे होते पण हे स्वतःच बसले, मोदींनी हे केलं आणि मला मुख्यमंत्री बनवला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
जिथे टेंडर तिथे सरेंडर. कंत्राटदारांची लूट करताना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी होती. धारावी मुंबईचा विकास होईल हे सगळं मी पाहतोय. धारावी इथे देखील प्रकल्पात काड्या घालण्याचे काम सुरू आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, पण धाराविकरांना रस्त्यावर ठेवा. धारावीत आम्ही 2 लाख 10 जणांना घरे देणार, पात्र अपात्र बघणार नाही. 2 लाख कोटी रुपयांची घरे देणार. प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण आम्ही करणार.
रामदास कदम: हिंदू म्हणायला आपल्याला स्वाभिमान आणि अभिमान वाटतो. पण काही गार गोट्यांना लाज वाटते. आपण ही शिवसेना मुक्त केली, आझाद शिवसैनिकांची ही आझाद शिवसेना आहे. मी सगळ्यांचे स्वागत करतो. आज भगवा संचारला आहे. हे सरकार पंधरा दिवस, एक महिना, सहा महिन्यात पडेल, असे म्हणत होते पण एकनाथ शिंदे पुरून उरला. मी घासून पुसून नाही ठासून 2 वर्ष पूर्ण केले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
गुलाबराव पाटील: बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. लाडके भाऊ सीएम आहेत. पंतप्रधान याचे आभार मानतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. उद्धव ठाकरे आणि राऊत यांना दिलेले चोख उत्तर म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा पीएम साहेबांनी दिला आहे. राज्यातील अनेक योजना सीएम लोकांपर्यंत पोहोचत आहेत,लोक भगवा झेंडा फडकवला शिवाय राहणार नाहीत, असं रामदास कदम म्हणाले.
ज्योती वाघमारे: स्वाभिमानी शिवसैनिकांना मानाचा मुजरा. शिवसैनिक कोणासमोर वाकत नाही. जो धनुष्यबाण काँग्रेसकडे गहाण ठेवला होता तो स्वाभिमानी मुख्यमंत्री यांनी सोडवून आणला. जे नेहमी बोलतात आमचा बाप चोराला, 2019 निवडणुकीत भगवा असलेला रंग बदलला कसा?
शंभुराज देसाई: दादरच्या मेळाव्यातून टीका शिवीगाळच ऐकायला मिळेल, त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही. हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आम्ही पुढे नेत आहोत. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलेले आहे. जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सकारात्मक चर्चा सुरू आहे. विधानसभेला आमच्या जागांचे निर्णय आम्हीच घेणार.
उद्धव ठाकरे मातोश्री नाव बदलून आमिजान ठेवणार आहेत असं कळतय, आम्हाला सांगा कुठे कुठे जाऊन भिक मागता? मला मुख्यमंत्रीपद जाहीर करा असं म्हणता. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री स्वाभिमानाने काम करत आहेत. आज माविआ मध्ये कौन बनेगा मुख्यमंत्री असा खेळ सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांना कार्टं म्हणता मग तुमच्या मुलाला कार्टून म्हणायचं का?
एका कार्टून काय काय करतात, दुसरं कार्टून अंबानी यांच्या लग्नात नाचतो. शिंदे बाळासाहेब याचे विचार पुत्र ठरले आहेत.
40 वर्षापासून होत असलेल्या मेळाव्याची आठवण होते,आज शिवसैनिकांना बाळासाहेब याची आठवण नक्की होत असेल. आम्ही साहेब कधी बोलणार याची वाट पाहत होतो. लोकसभा निवडणूक झाल्यावर वेगळ चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला,आता सरकार येणार नाही अस सांगण्यात आल,पण शिंदे साहेब यांनी जादू केली. माझ्या जिल्ह्यात सी एम साहेब दोन वर्षात 14 वेळा आलेले पहिले मुख्यमंत्री आहेत. कव्वा कितनी भी उंचाई छुले कुबतर नही बन सकता,हे मी संजय राऊताला सांगतोय.
Be the first to comment on "CM Eknath Shinde, Shiv Sena Supremo Dusshera Rally, The Tiger Roars Again!"