बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱयांच्या बँकेला प्रथम क्रमांकाचे दोन पुरस्कार

The Municipal Co-operative Bank Limited (Mumbai) the bank of BMC Employees bags two 1st Category Awards –

1st in the category of “Best Bank” Award Conferred By The Maharashtra Urban Co-operative Banks Federation Ltd. 

Another 1st prize in the category of Salaried Cooperative Bank Award Conferred By Brihanmumbai Urban Co-operative Bank Association Ltd. 

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२४ (GPN): दि म्युनिसिपल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (मुंबई) ही महानगरपालिका कर्मचाऱयांची बँक आहे. या बँकेला नुकतेच दोन मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून हे दोन्ही पुरस्कार प्रथम क्रमांकाचे आहेत. यामध्ये, दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड यांचेवतीने पगारदार नोकरांच्या गटात सर्वोत्कृष्ट बँक म्हणून प्रथम पुरस्कार तर, दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. मुंबई यांच्याद्वारे ‘पगारदार सहकारी बँक‘ गटात दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

दि महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. यांच्याद्वारे दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे येथे पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी “दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई” या बँकेस पगारदार नोकरांच्या गटात सर्वोत्कृष्ट बँक म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ तसेच सहकार आयुक्त श्री. दीपक तावरे यांच्या हस्ते बँकेचे संचालक श्री. राजेंद्र कराडे, श्री. मुकेश घुमरे, श्री. किरण आव्हाड, श्री. महावीर बनगर, श्री. विष्णू घुमरे, सर्वसाधारण कामकाज समिती उपाध्यक्ष श्री. अभिषेक मोहिते, कर्जव्यवहार समिती अध्यक्षा श्रीमती वर्षा माळी, कर्जव्यवहार समिती उपाध्यक्ष श्री. अभिजीत बागुल, श्री. महेश ठाकरे, श्री. भानुदास भोईर, कर्मचारी प्रतिनिधी श्री. संदीप साळवी, श्री. अनंत धनावडे, उप-महाव्यवस्थापक श्री. प्रशांत रेवडेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

याचबरोबर, दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. मुंबई यांच्याद्वारे ‘पगारदार सहकारी बँक‘ गटात दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य श्री. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार बँकेच्या वतीने संचालक श्री. महावीर बनगर, श्री. विष्णू घुमरे व सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. शशिकांत गाडगे यांनी स्वीकारला. कुर्ला येथे बंटारा भवनात दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी तसेच पदसिद्ध उपाध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने आपल्या कामाकाजाचा मोठ्या प्रमाणात विस्तार वाढविलेला आहे. बँकेचे कार्याध्यक्ष तथा सह-आयुक्त (परिमंडळ ४) श्री. विश्वास शंकरवार, उप-कार्याध्यक्ष तथा उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागर व बँकेचे संचालक मंडळ यांनी बँकेचे उत्तमरित्या व्यवस्थापन आणि नियोजन केल्यामुळे बँकेच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीतही चांगली वाढ झालेली आहे. दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

दि म्युनिसिपल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (मुंबई) ही महानगरपालिका कर्मचाऱयांची बँक आहे. दिनांक ३१ मार्च २०२४ अखेरीस ७१,०१३ महानगरपालिका कर्मचारी बँकेचे सभासद आहेत. ही बँक महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांच्या सर्वांगीण आर्थिक गरजा भागवण्यासाठी कार्यरत आहे. महानगरपालिका कर्मचाऱयास बँक कर्ज सुविधा देत असते, तर इतर नागरिकांसाठी उत्तम बँकिंग सुविधा देत असते. कोअर बँकिंग, आर. टी. जी. एस, एन. ई. एफ. टी, इ-कॉम, पॉस इत्यादी सुविधा बँक देते. बँक रुपे कार्डसची थेट सभासद आहे. बँकेची मुंबई व उपनगरात विविध ठिकाणी स्वतःची १० एटीएम केंद्रं आहेत. तसेच रुपे कार्डच्या मेंबर बँकांमधील कोणत्याही बँकेच्या एटीएमवर कार्डधारक पैसे काढू शकतात. बँकेने मोबाईल बँकिंग सेवा सुरू केली आहे. तसेच या बँकेने एखाद्या खासगी बँकेसारखीच अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

उत्कृष्ट नियोजन तसेच कर्ज वसुलीसाठी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे एकूण एन. पी. ए. च्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. बँकेने गत दहा वर्षात चौफेर प्रगती केली आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी बँकेस सहकार क्षेत्रातील नामांकित असे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रतिवर्षी बँकेस सातत्याने नफा झालेला आहे, या नफ्याचा विनियोग सभासदांकरीताच्या विविध योजनांकरिता करण्यात येत असल्याचेही महाव्यवस्थापक श्री. विनोद रावदका यांनी सांगितले.
***
(जसंवि/४०२)

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱयांच्या बँकेला प्रथम क्रमांकाचे दोन पुरस्कार"

Leave a comment

Your email address will not be published.


*