BMC – HBT ‘mobile health check-up center’ to reach relatively remote areas and slums say’s Mangal Prabhat Lodha

Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Aapla Dawakhana – Mobile HBT Centres (Mobile Clinics)

Mumbai suburban guardian minister and MLA, Mangal Prabhat Lodha Inaugurates ‘Hinduhrdayasmarat Balasaheb Thackeray Aapla Dawakhana’ Mobile Health Screening Centers (HBT Mobile Clinics) Launched by BMC in Chembur, Mumbai

MUMBAI, 3 OCTOBER, 2024 (GPN): Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Aapla Dawakhana, also known as HBT clinics, are aimed at providing better healthcare access and free medical treatment options close to a patient’s home. Some of the clinics also offer free blood tests.

BMC’s health system provides health services to Mumbaikars and citizens from other places as well. Through ‘Hinduhrdayasmarat Balasaheb Thackeray Aapla Dawakhana’ the municipal corporation’s health services have expanded to every corner of Mumbai.

As a plan for the expansion of Mobile HBT Centres (Mobile Clinics), Brihanmumbai Municipal Corporation Commissioner and Administrator Bhushan Gagrani gave instructions to provide regular health facilities to padas and slums in relatively remote areas like Sanjay Gandhi National Park, Aarey Colony, Gorai Village etc.

Mumbai suburban guardian minister and local MLA, Mangal Prabhat Lodha inaugurated the HBT Mobile Inspection Centers at JBCN International School in Chembur today. On this occasion, Executive Health Officer of the Municipal Corporation Dr. (Mrs.) Daksha Shah, and Officials of M/s Americaers India Foundation were present.

One mobile vehicle out of these two mobile centers will serve the Aarey Colony division of P South Division. Meanwhile, through the second vehicle, medical services will be provided in Anna Bhau Sathe Nagar, Lotus Vasahat, Rafi Nagar, Chita Camp areas in M ​​East Division.

The service hours of this mobile health screening center will be from 9 am to 4 pm.

Both these Mobile Health Screening Centers (mobile vehicles) have been made available under the corporate social responsibility (CSR) principle through M/s Americaers India Foundation. 1 Medical Officer, 1 Nurse, 1 Pharmacist and 1 Multipurpose Worker have been appointed in this center through Brihanmumbai Municipal Corporation (BMC).

Through this center, citizens of remote areas can avail free check-up, free consultation, free medication. Executive Health Officer Dr. (Mrs.) Daksha Shah gave instructions and information on this occasion.

दुर्गम भागात पोहोचणार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत ‘फिरते आरोग्य तपासणी केंद्र’
-मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सेवेचा प्रारंभ
-पी दक्षिण, एम पूर्व विभागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार, आरोग्य सल्ला मिळणार

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२४ (जीपीएन प्रतिनिधी)

मुंबईकर नागरिकांना आपल्या घरानजीक वैद्यकीय तपासणी, उपचार व आरोग्य सल्ला देणारी लोकप्रिय अशी आरोग्य सेवा अर्थात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना आता अधिक गतीशिल होत दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. पी दक्षिण व एम पूर्व विभागात दुर्गम परिसरांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत दोन फिरत्या तपासणी केंद्रांचे लोकार्पण मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज (दिनांक ३ ऑक्टोबर २०२४) सायंकाळी करण्यात आले.

 बृहन्मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा मुंबईकरांना आणि इतर ठिकाणांहून येणाऱया नागरिकांना देखील आरोग्य सेवा पुरवते. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ च्या माध्यमातून मुंबईतील कानाकोपऱयात महानगरपालिकेची आरोग्य सेवा विस्तारली आहे. त्यासोबतच, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, गोराई गांव यासारख्या तुलनेने दुर्गम भागांतील पाडे आणि वस्तीपर्यंत नियमित आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. गरजू नागरिकांना आरोग्याच्या सेवा सहज उपलब्ध होताना विशेषतः विनामूल्य वैद्यकीय तपासणी, उपचार व सल्ला उपलब्ध व्हावेत, यादृष्टिने आपला दवाखाना योजनेतून विस्तार करावा, अशी सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी केली होती.
 हे निर्देश अंमलात आणून फिरत्या आरोग्य सेवा तपासणी केंद्राच्या माध्यमातून दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्याची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केली आहे. कारण, दुर्गम भागातील वस्तीमध्ये मोकळ्या जागेचा अभाव असल्या कारणाने पोर्टा केबिन बांधून आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मर्यादा येतात. त्यामुळे, फिरत्या आरोग्य तपासणी केंद्राच्या रुपाने तेथे वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे.
 मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते, चेंबूर मधील जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल येथे या फिरत्या तपासणी केंद्रांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शाह, मे. अमेरिकेयर्स इंडिया फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
या दोन फिरत्या केंद्रापैकी एक मोबाईल वाहन पी दक्षिण विभागातील आरे वसाहत विभागासाठी सेवा देईल. तर दुसऱया वाहनाच्या माध्यमातून एम पूर्व विभागात अण्णा भाऊ साठे नगर, लोटस वसाहत, रफी नगर, चिता कॅम्प भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यात येईल. या फिरत्या आरोग्य तपासणी केंद्राची सेवा देण्याची वेळ ही सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अशी असेल.
मे. अमेरिकेयर्स इंडिया फाऊंडेशन यांच्यामार्फत कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी तत्व अंतर्गत हे दोन्ही फिरते आरोग्य तपासणी केंद्र (मोबाईल वाहन) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत १ वैद्यकीय अधिकारी, १ परिचारिका, १ औषधनिर्माता आणि १ बहुद्देशीय कामगार यांची नेमणूक करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत दुर्गम परिसरातील नागरिकांना मोफत तपासणी, मोफत सल्ला, मोफत औषधोपचार याचा लाभ घेता येईल. तसेच आवश्यकतेनुसार नजीकच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात संदर्भित केले जाईल, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा यांनी दिली.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "BMC – HBT ‘mobile health check-up center’ to reach relatively remote areas and slums say’s Mangal Prabhat Lodha"

Leave a comment

Your email address will not be published.


*