FOR ALL PHOTO’S VISIT: OUR FB PAGE
BULDHANA, 19 SEPTEMBER, 2024 (GPN): Many sisters have got financial freedom through the Chief Minister – Majhi Ladki Bahin Yojana launched by the state government under the Women’s Empowerment Mission – ‘Mukhyamantri Mahila Sakthikaran Abhiyan’. From the money received in the bank account, the important and urgent needs are being met along with the educational expenses of the children, household expenses, medication of the elderly etc. The sisters who came to the promise fulfillment ceremony under Chief Minister Mahila Sakthikaran Abhiyan expressed the feeling that this scheme is a big support for all sister beneficiaries.
In Buldana, the honor of the beneficiaries under the Chief Minister’s Women’s Empowerment Mission and the inauguration ceremony of various development works were held on the grounds of Sharda Vidyalaya. Lakhs of sisters from across the district were present on this occasion.
Women from every village in every taluka of the district attended this event. In the ceremony, women sisters welcomed Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar by raising mobile torches and clapping .
Dignitaries also welcomed the beloved sisters by throwing rose petals. Many sisters expressed their gratitude to the Chief Minister and both the Deputy Chief Ministers by tying rakhis on their wrists.
Every household has received support from the amount received from Chief Minister – Majhi Ladki Bahin Yojana. Similarly, the sisters expressed their feeling that women are being empowered due to various schemes of the central and state governments . The faces of the sisters who participated in the program were full of joy and confidence. They expressed the feeling and happiness that now we are not dependent on anyone, our beloved brothers has given us our rightful money.
Mrs. Radha Shivaji Jhalte, Village Borkhade (T.D. Buldana), Mrs. Bhavna Borkhade (Dist. Buldana), Meena Jairam Kahate, Rekha Sunil Nanai, Bharti Sachin Khandare, Sindhu Uberhande of Sindkhed Makhala in Buldana taluka and likewise many other sisters present on the occasion expressed their gratitude and thanked the CM and Both Deputy CM’s for getting Rs. 3000/- for two months of the scheme duly credited in to their bank accounts on 17th August, just in time before the Rakshabandhan festival.
They gave their testimonials in support of the scheme applauding the Mahayuti Alliance in Maharashtra and It’s Leaders.
The verbatim of their testimony is presented as under given to GPN:
रक्षाबंधनाचा सण गोड झाला – राधा झाल्टे
‘रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीची घटना. सण जवळ आला होता, पण हातात पैसे नव्हते. खूप चणचण होती. मुलांना कपडे, स्वत:साठी साडी, शैक्षणिक साहित्य घ्यायचे होते. राख्या खरेदी केलेल्या नव्हत्या आणि इतक्यात…माझ्या फोनवर बँक खात्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आणि माझी चिंता मिटली….‘ माझ्या बँक खात्यात 17 ऑगस्टला योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले. त्यातून माझ्या कुटुंबाचा रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा झाला, अशी प्रतिक्रीया बोरखडे (ता.जि.बुलडाणा) गावातील सौ. राधा शिवाजी झाल्टे यांनी दिली.
भेट भावाची, ठेव मुलांच्या भविष्याची – मीना कहाते
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण‘ योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या योजनेचा अर्ज करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. माझ्या खात्यात बरोबर तीन हजार रुपये जमा झाले. माझी दोन्ही मुले वसतीगृहात शिकतात. या योजनेतून मिळालेले पैसे भावाची भेट म्हणून मुलांचे शैक्षणिक साहित्य, गणवेश खरेदीसाठी उपयोगी पडले. योजनेतून मिळणाऱ्या पैश्यांचा उपयोग मी माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणार, अशी भावना बोरखडे (ता.जि. बुलडाणा) गावातील सौ. मीना जयराम कहाते व रेखा सुनील ननई या दोघी बहिणींनी व्यक्त केली.
संसाराला हातभार लाभला – सिंदखेड माखल्याच्या भगिनींची प्रतिक्रिया
मी व माझे पती दोघेही शेत मजुरीचे काम करतो. घरात नेहमी पैश्याची चणचण होती. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात माझ्या बँक खात्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले. माझ्या कुटुंबासाठी हे पैसे अडचणीच्या काळात घरखर्चासाठी उपयोगी पडले. या पैश्यांमुळे माझ्या संसाराला हातभार लागला असून त्यातून मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व कपड्यांची खरेदी केली. योजनेतून पैसे मिळाल्यानिमित्त मी मुख्यमंत्री महोदयांची आभारी आहे. ही योजना अशीच नियमितपणे सुरु राहावी, अशी प्रतिक्रिया बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड माखल्याच्या भारती सचिन खंडारे व सिंधु उबरहांडे या दोन्ही भगिनींनी व्यक्त केली.
योजनेच्या पैश्यातून घडले शिर्डीदर्शन – अर्चना उबरहांडे
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण‘ योजनेची माहिती व अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी ताईंनी मला मदत केली. या योजनेमुळे आम्हा महिलांना घरातील तातडीची कामे करण्यासाठी आर्थिक हातभार मिळाला आहे. मुलांचे शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय उपचार तसेच घरखर्च भागविण्यासाठी या पैश्यामुळे खूप मोठा आधार मिळाला. खूप दिवसापासून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. मात्र, पैश्याची वानवा असल्यामुळे दर्शन राहून गेले होते. योजनेतून मिळालेल्या पैश्यांमुळे मी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊ शकले, अशी भावना सिंदखेड माखल्याच्या अर्चना उबरहांडे यांनी दिली.
मुख्यमंत्री नावाच्या भावाने दिली कल्याणकारी योजनांची शिदोरी – शीतल महाले
शासनाने केवळ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ दिला नसून महिलांना अनेक कल्याणकारी योजनांची शिदोरी दिली. लेक लाडकी बहिण, माझी मुलगी भाग्यश्री योजना, मुलींना मोफत उच्चशिक्षण, एसटी प्रवासात सवलत या योजनांच्या मदतीने आम्हाला व आमच्या मुलींच्या शैक्षणिक व आर्थिक गरजा पूर्ण करता येणार आहेत. लाडकी बहीण योजनेतून मिळालेली रक्कम ही मुला-मुलींच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी व घरखर्चासाठी उपयोगी पडली. त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानते, अशी भावना बुलडाणा तालुक्यातील मासरुळ येथील रहिवासी शितल विनोद महाले यांनी व्यक्त केली.
Be the first to comment on "‘Mukhyamantri Mahila Sakthikaran Abhiyan’ Beneficiaries felicitated in Chief Minister’s Women’s Empowerment Campaign at Buldana"