
सुधाकर भाऊ घारे यांनी दिल्या कर्जत मधील नुकसानग्रस्थ भागांना भेटी
मुंबई, 21 मे, 2024 (GPN): मागील आठवडाभरात अवकाळी पावसाने बरेच नुकसान केले. यामध्ये प्रामुख्याने विजेचे खांब कोसळल्याने अनेक गावांमधील वीजप्रवाह खंडीत झाला आहे. पोशीर ग्रामपंचायत भागातील तसेचे शेलु ग्रामपंचायत भागातील अनेक ग्रामस्थांनी सुधाकर भाऊ घारे यांना फोन करुन आपल्या अडचणी सांगीतल्या.
त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सुधाकर भाऊ घारे यांनी घटनास्थळी भेटी देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेलेले होते. ग्रामस्थांना सुधाकर भाऊंशी बोलताना भावना अनावर झाल्या. घराचे छत उडुन गेल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी होते. परंतु आपल्या अडचणी समजुन घेण्यासाठी आपला नेता आला याचाही सर्वांना खुप आधार वाटला.
यावेळी ठरावीक कुटुंबाना भाऊंनी तात्काळ वयक्तिक मदत केली. तसेच झालेल्या नुकानीची शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी त्वरीत पंचनामे करण्याची विनंती शासकिय अधिकाऱ्यांना केली. विजप्रवाह खंडीत झाल्याने अनेक कामे ठप्प पडली आहेत त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर काम करण्याच्या सुचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन दिल्या.GPN
Be the first to comment on "सुधाकर भाऊ घारे यांनी दिल्या कर्जत मधील नुकसानग्रस्थ भागांना भेटी : गरजुंना मदत करत शासनाकडुन नुकसानभरपाई भेटण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन"