झुनो जनरल इन्शुरन्सतर्फे सुरक्षित रस्त्यांसाठी पुढाकार, राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिन्यादरम्यान ‘झुनो ड्रायव्हिंग कोशंट’ उपक्रम

Zuno General Insurance

मुंबई, 16 जानेवारी 2024 (GPN): झुनो जनरल इन्शुरन्स, हा नवीन युगाचा डिजीटल विमा पुरवठादार असून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या रस्ते सुरक्षा महिन्याच्या विद्यमाने रस्तेविषयक सुरक्षा उपक्रमाची घोषणा करताना अभिमान वाटतो आहे. हा उपक्रम दिनांक 12 ते 25 जानेवारी 2024 दरम्यान चालणार असून सुरक्षित रस्त्यांकरिता जबाबदारीने ड्रायव्हिंग करण्याला प्रोत्साहन देणे तसेच रस्ते सुरक्षेविषयक जनजागृती करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय आहे.

आपल्या डिजीटल प्राधान्याला अग्रभागी ठेवत झुनो जनरल इन्शुरन्स तंत्रज्ञानाचा वापर करून रोचक मार्केटींग कॅम्पेनसह घराघरांत संदेश पोहोचविण्याचे काम करते आहे. मुंबई, दिल्ली, गोवा, हैदराबाद आणि बंगळुरू या भारतातील पाच प्रमुख शहरांमध्ये सक्रिय कार्यक्रम चालवण्यासाठी ही मोहीम देशातील बॉलीवूड संचालित पॉप संस्कृतीवर अवलंबून असेल. प्रत्येक शहरात रस्त्यांवरील सिग्नल दीर्घकाळ सुरू ठेवून या संकेतामार्फत नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून अशा स्वरुपाच्या शैलीत सुरक्षाविषयक जागरुकता वाढवून हातभार लावण्यात येईल.

हा उपक्रम झुनो ड्रायव्हिंग कोशंट चॅलेंज (झेडडीक्यू) देखील सादर करेल, जेणेकरून नागरिक झुनो अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित होतील. याद्वारे त्यांना आपल्या ड्रायव्हिंग कौशल्याचे मूल्यांकन करता येईल आणि अॅपच्या माध्यमातून ऑबजेक्टीव्ह स्कोअर मिळू शकेल.

कंपनीने काही सर्व्हेक्षण केली आणि स्वतःच्या ड्रायव्हिंग क्षमतेचे मूल्यांकन करताना लोकांमध्ये एक सामान्य अति आत्मविश्वासाचा पूर्वग्रह असल्याचे या अभ्यासात निदर्शनास आले, 65% पेक्षा अधिक चालकांना त्यांचे ड्रायव्हिंग खूप चांगले आहे असे वाटले. मात्र उलट परिस्थिती अशी की, सुमारे 30-35% चालक हे चांगले किंवा सर्वोत्तम आहेत हे याच विषयावर करण्यात आलेल्या काही केस स्टडींमध्ये आढळले. यामुळे अशा यंत्रणेची नितांत गरज असल्याच्या झुनोच्या विश्वासाची पुष्टी झाली. या अंतर्गत वाहन चालविण्याच्या वर्तनाचे प्रभावीपणे मोजमाप करण्यात येईल आणि लोकांना कालांतराने ते सुधारण्यासाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शन करेल.

झुनो अॅपद्वारे वेग मोजण्यात येतो आणि सर्वसमावेशक ड्रायव्हिंग स्कोअरची गणना करण्यासाठी अचानक ब्रेकिंग, विचलित ड्रायव्हिंग आणि अति-वेग यासारख्या घटकांवर लक्ष ठेवण्यात येते. या अॅपद्वारे मिळणारा स्कोअर केवळ एखाद्याच्या वाहन चालवण्याच्या सवयींबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करत नाही तर सुरक्षित वाहन चालविण्याच्या पद्धतींना देखील प्रोत्साहित करतो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास तुम्ही जितके चांगले वाहन चालवाल, तितका तुमचा स्कोअर अधिक चांगला असेल आणि तुम्ही तुमच्या विमा हप्त्यावर अधिक बचत करू शकाल. वापरकर्ते झुनो अॅप डाउनलोड करून 15 दिवसांचे ड्रायव्हिंग चॅलेंज घेऊ शकतात आणि स्वयं-शोधासह रस्ते सुरक्षा प्रवास करू शकतात.

हाय-फ्रिक्वेन्सी रेडिओ प्लॅटफॉर्मवर खास तयार केलेले ब्रँड स्पॉट लोकांना रहदारीचे नियम पाळणे आणि सुरक्षितपणे वाहन चालवण्याचे आवाहन करतील किंवा त्यांच्या शहरातील बॉलिवूडच्या सर्वात भीतीदायक/प्राणघातक पात्रांशी सामना करावा लागेल.

झुनो जनरल इन्शुरन्स’चे एमडी आणि सीईओ शानाई घोष म्हणाल्या, “रस्ते सुरक्षा ही परस्परांसोबत शेअर करण्याजोगी जबाबदारी आहे आणि आपल्या रस्त्यांवर ड्रायव्हिंगविषयक सकारात्मक परिवर्तनाकरिता झुनो वचनबद्ध आहे. देशातील सुरक्षित रस्त्यांना चालना देण्यासाठी चालकांची भूमिका आणि परिणाम समजून घेण्यासाठी चालकांच्या समुदायावर कायमस्वरूपी छाप पाडण्याचा आमचा उपक्रम आहे. उत्सुकता आणि जुन्या आठवणींच्या मिश्ररुपात प्रेक्षकांना गुंतवून ठेवताना सुरक्षित वाहन चालवण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचे ‘झुनो ड्रायव्हिंग कोशंट’ हे वाहन चालविण्याचे चांगले वर्तन, रस्ते अपघातांशी परस्परसंबंध आणि संपूर्ण समाजावर सकारात्मक परिणाम याबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. वर्तणुकीतील बदलांवर प्रभाव टाकण्यासाठी बक्षिसांचा वापर करून आपण जागरुकतेच्या पलीकडे एक पाऊल पुढे जात आहोत. यात गुंतलेल्या प्रत्येकाला चांगले वाहन चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, ज्यामुळे भारतातील लोकांसाठी रस्ते सुरक्षित होतील, ज्यामुळे अपघात कमी होतील आणि मृत्यू दरात घट होईल. आमच्यासाठी, ही केवळ एक मोहीम नाही तर झुनो ड्रायव्हिंग कोशंटच्या साथीने भारताला अधिक चांगल्या पद्धतीने वेग देण्याच्या दृष्टीने उभारलेली एक चळवळ आहे “.

भारतीय रस्त्यांवर वाईट पद्धतीने ड्रायव्हिंग ही एक गंभीर समस्या ठरली असून देशात रस्ते अपघात वाढले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) आकडेवारीनुसार 2022 मध्ये एकूण अपघातांपैकी सुमारे 72% अपघात आणि रस्ते अपघातातील एकूण मृत्यूंपैकी 71% मृत्यू ओव्हरस्पीडिंगमुळे झाले. या भीतीदायक प्रवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने झुनो जनरल इन्शुरन्सच्या रोमांचक, सक्रियतेच्या नेतृत्वाखालील रस्ते सुरक्षा उपक्रमाचा उद्देश प्रेक्षकांपर्यंत मजेदार आणि आकर्षक पद्धतीने संदेश पोहोचवणे हा आहे.

या उपक्रमात समाविष्ट प्रमुख घटक:

– हाय-फ्रिक्वेन्सी रेडिओ प्लॅटफॉर्मवर झुनोकरिता खास तयार करण्यात आलेले ब्रॅंड स्पॉट्स्.

– ओळखीच्या सिग्नलवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध पात्रे नागरिकांना गुंतवून ठेवतील.

– आपला “सेफ ड्रायव्हिंग स्कोअर” शोधण्यासाठी प्रवर्तकांकडील “ZDQ QR Codes” नागरिकांना प्रोत्साहन देईल.

– लाईव्ह रेडियो सिटी आरजेनी नमूद केल्याप्रमाणे पात्रांचे लाईव्ह लोकेशन आरजे वेळोवेळी कळवत राहतील.

– इंटरसिटी आरजे हँडशेक लिंक, जिथे आरजे पात्रांच्या आगामी उपस्थितीबद्दल एकमेकांना माहिती देतात.

मनोरंजन आणि शिक्षणाच्या संयोगाने झुनो जनरल इन्शुरन्सचे उद्दिष्ट हे रस्ते सुरक्षेवर कायमस्वरूपी परिणाम घडवून आणणे, सर्व रस्ते वापरकर्त्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आहे.

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "झुनो जनरल इन्शुरन्सतर्फे सुरक्षित रस्त्यांसाठी पुढाकार, राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिन्यादरम्यान ‘झुनो ड्रायव्हिंग कोशंट’ उपक्रम"

Leave a comment

Your email address will not be published.


*