मेडिकवर हॉस्पिटल्सचे सुपर स्पेशालिटी क्लिनिक आता उलव्यातही

~ क्लिनिकमध्ये कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, पल्मोनोलॉजी, न्यूरोलॉजी, पेडियाट्रिक, डोके आणि नेक कॅन्सर सर्जरी, यूरोलॉजी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी यासह विविध विभाग उपलब्ध

नवी मुंबई, ८ सप्टेंबर २०२३ (GPN): उलवेकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा आणि उपचार प्रदान करण्यासाठी मेडीकवर हॉस्पिटल्सने उलवे येथे सुपर स्पेशालिटी क्लिनिक सुरू केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केले जाणारे निदान व उपचार पध्दती या साऱ्याचा लाभ आता एकाच छताखाली घेता येणार आहे.  या क्लिनिकचा उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार श्री महेश बालदी जी, उरण मतदार संघ उपस्थित होते. डॉ नवीन केएन (सेंटर हेड मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघर) यांची देखील विशेष उपस्थित होती. सकाळी 9 ते रात्री 9 अशी यावेळेत या क्लिनीमध्ये रुग्णसेवा पुरविली जाणार आहे.

हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अपस्मार, स्मृतिभ्रंश, अल्झायमर, हाडे आणि सांधे समस्या, किडनी स्टोन, प्रोस्टेट वाढणे, किडनी इन्फेक्शन, डोके आणि मानेचा कर्करोग, क्रॉन्स डिसीज, बद्धकोष्ठता, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (बीएस), इन्फ्लेमेटरी बोवेल सिंड्रोम यांमध्ये चिंताजनक वाढ रोग (IBD), सेलिआक रोगाकडे त्वरीत लक्ष देणे आणि वेळीच हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. या आरोग्य समस्या एखाद्या व्यक्तींच्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही परिणाम करतात. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने किंवा वेळीच वैद्यकीय मदत न घेतल्यास लक्षणे, गुंतागुंत वाढून जीव देखील गमवावा लागू शकतो. याकरिता वेळीच निदान व उपचार करणे गरजेचे आहे.

हृदयविकाराच्या प्रकरणांमध्ये जेथे बैठी जीवनशैली आणि  आहाराच्या चूकीच्या सवयींमुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढत आहेत, लवकर वैद्यकीय मदत घेणे हृदयाच्या स्नायूंना होणारे नुकसान टाळता येऊ शकते. नवी मुंबईतील लोकांसाठी वरदान ठरणारे सुपर स्पेशालिटी क्लिनिक सुरू करून मेडिकवर हॉस्पिटल्सने एक मोठे पाऊल उचलले आहे.

डॉ. माताप्रसाद गुप्ता (डीजीएम मेडिकवर हॉस्पिटल्स) सांगतात की आम्ही नवी मुंबईकरांच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे निरोगी आयुष्याची भेट देण्यासाठी  प्रयत्नशील आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ कर्मचारी आणि रुग्णसेवा यावर लक्ष केंद्रित करणारे हे क्लिनीक रुग्णांकरिता वरदान ठरणार आहे. या क्लिनिकच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर दिला जाणारा भर, ज्यामुळे वेळीच निदान व उपचार शक्य होते. दर्जेदार रुग्णसेवा पुरविण्याचे आमचे  उद्दिष्ट आहे जे केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्याचीही काळजी घेते.

उलवे परिसरात ओपीडी क्लिनिक उभारणे हा मेडिकवर हॉस्पिटलचा एक स्तुत्य उपक्रम आहे. या भागातील लोकांना ओपीडीसाठी इतर ठिकाणी जावे लागणार नाही आणि त्यामुळे निश्चितच वेळेची बचत होईल तसेच निदानास विलंब होणार नाही. रूग्ण सेवेबद्दल सदैव तत्पर असणाऱ्या मेडिकवर हॉस्पिटल्सचा खरोखरच अभिमान वाटतो असे श्री महेश बालदीजी यांनी स्पष्ट केले.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "मेडिकवर हॉस्पिटल्सचे सुपर स्पेशालिटी क्लिनिक आता उलव्यातही"

Leave a comment

Your email address will not be published.


*