पॉलीकॅब इंडियाने क्रिकेट विश्वचषकाचा उत्साह साजरा करण्यासाठी एका भव्य ट्रॉफी कार्यक्रमाचे आयोजन केले

Polycab India Limited

Mr. Nilesh Malani, Executive President and Chief Marketing Officer, Polycab India – Photo By GPN

मुंबई सप्टेंबर, २०२३ (GPN)भारतातील आघाडीची इलेक्ट्रिकल उत्पादनांची कंपनी, पॉलीकॅब इंडिया लिमिटेडने मुंबईतील मरीन प्लाझा हॉटेलमध्ये इलेक्ट्रिशियन्ससाठी एका विशेष आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संपूर्ण शहरभरातील इलेक्ट्रिशियन्सनी या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रतिष्ठित विश्वचषक पाहिला, इतकेच नव्हे तर, आपल्या भारतीय संघाला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. इलेक्ट्रिशियन्सची कामाप्रती अढळ निष्ठा व मेहनत यांच्याविषयी कंपनीला वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पॉलीकॅबने या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम एक अनोखा अनुभव तर ठरलाच शिवाय सर्व इलेक्ट्रिशियन्सना आयुष्यात एकदाच मिळणाऱ्या संधीचा लाभ देखील घेता आला. कार्यक्रमासाठी सर्वजण एकत्र आले तेव्हा त्या ठिकाणचे संपूर्ण वातावरण उत्साह व देशप्रेमाने भारून घेणे, सर्वांनी भारतीय संघाला अतिशय जल्लोषात शुभेच्छा दिल्या, त्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संस्मरणीय व आनंददायी ठरला.

एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट  चीफ मार्केटिंग ऑफिसर श्रीनिलेश मलानी यांनी सांगितले, क्रिकेट या खेळाचे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात विशेष स्थान आहेआपल्या देशात क्रिकेट हा निव्वळ खेळ नाही तर सर्व देशवासियांना एकत्र जोडणारी एक भावना आहेआपणां सर्वांना क्रिकेट सामान्यांचा मनमुराद आनंद घेता यावात्यामध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी इलेक्ट्रिशियन्स फार महत्त्वाची भूमिका बजावत असतातआपली घरे आणि देशभरातील स्टेडियम्समध्ये इलेक्ट्रिकल कनेक्शन्स सुरळीतपणे चालत राहतील हे इलेक्ट्रिशियन्स सुनिश्चित करतातत्यामुळे आपण क्रिकेट सामान्यांचा आनंद घेऊ शकतोया ट्रॉफी कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व खेळप्रेमींसाठीदेशभरातील इलेक्ट्रिशियन्स आणि इलेक्ट्रिकल रिटेलर्स यांच्यासाठी एक सार्थक  सर्वांना एकत्र जोडून ठेवणारी संधी निर्माण करू इच्छितोआमची उत्पादने वापरणारे समुदाय आणि ग्राहकांचे कल्याण करणे हे आमचे उद्दिष्ट आहेप्रकाश  आनंद निर्माण करण्यासाठी आपण डिव्हायसेस कनेक्ट करतोत्याप्रमाणेच समुदायांना एकत्र जोडून आनंद साजरा केला जावा असे आम्हाला वाटतेहा उपक्रम आमची मूल्ये दर्शवतोआमच्या सर्व ग्राहकांसाठी प्रभावी अनुभव निर्माण करणे यापुढे देखील आम्ही सुरु ठेवू.” क्रिकेटमुळे लोक कसे एकत्र येतात हे या उपक्रमाने दाखवून दिले आणि आम्हाला एकमेकांच्या मेहनतीचे कौतुक करण्याची संधी मिळवून दिली.Ends

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "पॉलीकॅब इंडियाने क्रिकेट विश्वचषकाचा उत्साह साजरा करण्यासाठी एका भव्य ट्रॉफी कार्यक्रमाचे आयोजन केले"

Leave a comment

Your email address will not be published.


*