बँक ऑफ बडोदाने 30 जून 2023 रोजी समाप्त तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर केले

Bank of Baroda (BoB) Logo

मुंबई७ ऑगस्ट २०२३ (GPN):  बँक ऑफ बडोदाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या 30 जून 2023 रोजी समाप्त तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर केले

ठळक वैशिष्ट्ये

  • बँक ऑफ बडोदाचा (बीओबी) वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत ह्या तिमाहीच्या 87.7 टक्क्यांनी वाढून 4,070 कोटी रुपयांवर पोहोचला.
  • बीओबीने गेल्या 4 तिमाहींपासून सातत्याने 1 टक्क्याहून अधिक आरओए आणि सुमारे 20 टक्के आरओई दिला आहे.
  • नफ्यातील ह्या दमदार वाढीला वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मधील छान ऑपरेटिंग उत्पन्न वाढीची जोड मिळालीमागील वर्षातील ह्या तिमाहीच्या तुलनेत 42.9 टक्के जास्त आहे.
  • वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये निव्वळ व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात (एनआयआय) मागील आर्थिक वर्षाच्या ह्या तिमाहीच्या तुलनेत 24.4 टक्के वाढ झाल्यानेही ऑपरेटिंग उत्पन्नवाढीला आधार मिळालात्याचप्रमाणे व्याजेतर उत्पन्नही गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.8 पटींनी वाढले.
  • कर्जांमध्ये (अॅडव्हान्सेस) 18.0 टक्के वाढ आणि मागील वर्षाच्या तुलनेत 3.27 टक्के दराने वाढून 25 बीपीए गेलेली नेट इंटरेस्ट मार्जिन्स (एनआईएम) ह्यांमुळे मधील वाढ टिकून राहिली  
  • उत्पन्नात झालेली भक्कम वाढ आणि त्यात भर म्हणजे ओपेक्समधील नियंत्रित वाढ ह्यामुळे वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये ऑपरेटिंग नफ्यात ठोस वाढ झालीमागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 73 टक्के अधिक आहे.
  • खर्च व उत्पन्न ह्यांच्यातील गुणोत्तरामध्ये कपात करणे बँकेला शक्य झाले (गुंतवणुकीचे फेरमूल्यांकन वगळता); वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत 166 बीपीएसने कपात होऊन ते 47.43 टक्क्यांवर आले.
  • जीएनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 275 बीपीएसने घट होऊन तो 3.51 टक्क्यांवर आल्यामुळे बीओबीच्या मालमत्तांच्या (असेट) दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहेबँकेचा एनएनपीए मागील वर्षाच्या तुलनेत 80 बीपीएसने सुधार होऊन 0.78 टक्के झाला आहे.
  • प्रोव्हिजन कव्हरेज रेशिओ (पीसीआर) टीडब्ल्यूओसह 93.23 टक्के, तर टीडब्ल्यूओ मध्ये 78.52 टक्के  एवढा  राहिल्याने बीओबीचा सशक्त आहे.
  • असेट दर्जातील ह्या शाश्वत सुधारणेची परिणती म्हणून  वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये पत खर्च मागील वर्षाच्या तुलनेत 5 बीपीएस कमी होऊन 70 बीपीएस राहिलापतखर्चासाठी केलेल्या विवेकपूर्ण तरतुदी वगळल्या असता हा आकडा  वित्तीय वर्ष च्या पहिल्या तिमाही मध्ये  44 बीपीएस राहिला असता.
  • बीओबीच्या जागतिक कर्जवितरणात वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 18.0 टक्के वाढ झालीरिटेल कर्जपुस्तिकेत दमदार वाढ झाल्यामुळे हे साध्य झालेबँकेचे ऑरगॅनिक रिटेल कर्जवितरण 24.8 टक्क्यांनी वाढलेवाहनकर्ज (22.1%), गृहकर्ज (18.4%), व्यक्तिगत कर्ज (82.9%), मॉर्टगेज (तारण) कर्ज (15.8%), शैक्षणिक कर्ज (20.8%) ह्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ही वाढ साध्य झाली आहे.

·       30 जून 2023 ह्या तारखेला बँकेचा एकूण व्यवसाय 21,90,896 कोटी रुपये होताम्हणजेच मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 17.0 टक्के वाढ झाली आहे.

नफाक्षमता

❖             बैंक ऑफ बड़ौदा ने वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये 4,070 कोटी रुपये स्टॅण्डअ लोन       निव्वळ नफ्याची नोंद केली. वित्तीय वर्ष 23 च्या पहिल्या तिमाही मध्ये हा नफा 2,168 कोटी           रुपये होता.

❖             निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) मागील वर्षाच्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढून वित्तीय वर्ष 24     च्या पहिल्या तिमाही मध्ये 10,997 कोटी रुपये झाले.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये जागतिक एनआयएम 3.27% होता, मागील वर्षाच्या           तुलनेत हा 25 बीपीएस अधिक होता.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये देशांतर्गत एनआयएम 3.41% राहिला, मागील          वर्षाच्या तुलनेत त्यात 34 बीपीएस वाढ झाली आहे.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये कर्जवितरणावर मिळणारे उत्पन्न 8.40 टक्के वाढले,   वित्तीय वर्ष 23 च्या पहिल्या तिमाही मध्ये ही वाढ 6.58 टक्के होती.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये ठेवींचा खर्च 4.68% होता. वित्तीय वर्ष 23 च्या    पहिल्या तिमाही मध्ये तो 3.46% होता.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये ऑपरेटिंग उत्पन्न 14,319 कोटी रुपये होता, त्यात        मागील वर्षाच्या तुलनेत 42.9% वाढ झाली.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये ऑपरेटिंग नफा 7,824 कोटी रुपये होता, मागील        वर्षाच्या तुलनेत त्यात 72.8 टक्के वाढ झाली.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये खर्च व उत्पन्नातील गुणोत्तर कमी होऊन 45.36%    राहिले, वित्तीय वर्ष 23 च्या पहिल्या तिमाही मध्ये ते  54.81% होते. वित्तीय वर्ष 24 च्या       पहिल्या तिमाही मध्ये एक्स-ट्रेझरी खर्च व उत्पन्न गुणोत्तरात 168 बीपीएस घट होऊन तो 47.41     टक्क्यांवर आला.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये असेट्सवरील मोबदला (वार्षिक) सुधारून 1.11 टक्के   झाला, वित्तीय वर्ष 23 च्या पहिल्या तिमाही मध्ये तो 0.68 टक्के होता.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये इक्विटीवरील मोबदला (वार्षिक) मागील वर्षाच्या      तुलनेत 640 बीपीएस वाढून 20.03 टक्के झाला.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये एकत्रित तत्त्वावरील निव्वळ नफा 4,452 कोटी रुपये        होता, तर वित्तीय वर्ष 23 च्या पहिल्या तिमाही मध्ये तो 1,944 कोटी होता.

असेट दर्जा

❖             बँकेची एकूण बुडीतकर्जे (ग्रॉस एनपीए) वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये मागील          वर्षाच्या तुलनेत 33.8 टक्क्यांनी कमी होऊन 34,832 कोटी रुपयांवर आली आणि वित्तीय वर्ष      24 च्या पहिल्या तिमाही मध्ये ग्रॉस एनपीए रेशिओ सुधारून  3.51% झाला, वित्तीय वर्ष 23      च्या पहिल्या तिमाही मध्ये तो 6.26% होता.

❖              वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये बँकेचा नेट एनपीए रेशियो विक्रमी नीचांकावर      म्हणजेच 0.78 टक्क्यांवर गेला, आर्थिक वर्ष 23 च्या पहिल्या तिमाहीत तो 1.58% होता.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये बँकेचा प्रोव्हिजन कव्हरेज रेशियो टीडब्ल्यूओसह          93.23%, तर टीडब्ल्यूओ वगळून 78.52% होता.

❖             वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये घसरणीचे प्रमाण कमी होऊन 1.05% झाले,       वित्तीय वर्ष 23 च्या पहिल्या तिमाही मध्ये ते 1.71% होते.

  • वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मधील पतखर्च 0.70% होता. पतखर्चातील विवेकपूर्ण तरतुदी वगळल्या तर तो 44 बीपीएसने कमी होऊ शकतो.

 

भांडवल पर्याप्तता

 

❖             बँकेचा सीआरएआर जून’23 मध्ये 15.84% आहे. जून’23 मधील आकडेवारीनुसार, श्रेणी-1         13.64% (सीईटी-1 at 11.94%, एटी1 1.70%) आणि श्रेणी -II 2.20% आहे.

❖             सीआरएआर आणि सीईटी-1 एकत्रितपणे अनुक्रमे 16.31% आणि 12.51% आहेत.

❖             लिक्विडिटी कव्हरेज रेशियो (एलसीआर) एकत्रित तत्त्वावर 143.6% आहे.

 

व्यावसायिक कामगिरी

❖             बँकेच्या जागतिक कर्जवितरणात 9,90,988 कोटी रुपयांनी वाढ झाली, मागील वर्षाच्या तुलनेत           +18.0% आहे.

❖             बँकेच्या देशांतर्गत कर्जवितरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत +16.8 टक्के वाढ होऊन ती   8,12,626 कोटी रुपयांवर पोहोचली आहेत.

❖             जागतिक ठेवींमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 16.2 टक्क्यांनी वाढ होऊन ती 11,99,908 कोटी   रुपये झाली आहेत.

❖             देशांतर्गत ठेवींमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 15.5 टक्क्यांनी वाढ होऊन ती 10,50,306 कोटी   रुपये झाली असल्याचे जून’23मधील आकडेवारीवरून दिसते.

❖             आंतरराष्ट्रीय ठेवी मागील वर्षाच्या तुलनेत 21.0 टक्क्यांनी वाढून 1,49,602 कोटी रुपयांवर       गेल्या असल्याचे जून’23 मधील आकडेवारीवरून दिसते.

❖             देशांतर्गत सीएएसएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 5.5 टक्के वाढ होऊन तो 4,23,600 कोटी रुपये        झाला आहे.

❖             वाहनकर्जे (22.1%), गृहकर्जे (18.4%), व्यक्तिगत कर्जे (82.9%), मॉर्टगेज (तारण) कर्जे          (15.8%), शैक्षणिक कर्जे (20.8%) ह्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ऑरगॅनिक          रिटेल अॅडव्हान्सेसमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 24.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

❖             कृषी कर्ज पोर्टफोलिओमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 15.1 टक्क्यांनी वाढ होऊन तो 1,27,583    कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

❖             टोटल गोल्ड लोन पोर्टफोलिओ (रिटेल व अॅग्रि मिळून) 40,652 कोटी रुपयांवर गेला आहे, त्यात        मागील वर्षाच्या तुलनेत 32.1% वाढ झाली आहे.

❖             ऑरगॅनिक एमएसएमई पोर्टफोलिओमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 12.7 टक्क्यांनी वाढ होऊन तो         1,09,220 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

30 जून 2023 रोजी समाप्त तिमाहीतील वित्तीय निकाल

तपशील (कोटी रुपयांत) Q1FY23 Q4FY23 Q1FY24 YoY(%)
व्याजापोटी मिळालेले उत्पन्न 18,937 25,857 26,556 40.2
व्याज खर्च 10,099 14,332 15,559 54.1
शुल्क (फी) उत्पन्न 1,277 1,714 1,507 18.0
निव्वळ व्याजापोटी मिळालेले उत्पन्न (एनआयआय) 8,838 11,525 10,997 24.4
ऑपरेटिंग उत्पन्न 10,020 14,991 14,319 42.9
ऑपरेटिंग खर्च 5,492 6,918 6,495 18.3
ऑपरेटिंग नफा 4,528 8,073 7,824 72.8
एकूण तरतुदी (करांव्यतिरिक्त) आणि आकस्मिकता निधी 1,685 1,421 1,946 15.5
एनपीए बुडीत कर्जांपोटी, रिटन-ऑफ (माफ) केलेल्या कर्जांपोटी तरतूद 1,560 320 1,693 8.5
करपूर्व नफा 2,843 6,652 5,878 106.7
करासाठी तरतूद 675 1,877 1,807 167.7
निव्वळ नफा 2,168 4,775 4,070

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदाने 30 जून 2023 रोजी समाप्त तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर केले"

Leave a comment

Your email address will not be published.


*