
Dr. Honey Sawla, Internal Medicine Specialist, Wockhardt Hospitals, Mumbai Central – Photo By GPN
(डॉ. हनी सावला, इंटर्नल मेडिसिन स्पेशलिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल यांचा विशेष लेख)
मुंबई, 21 June, 2023 (GPN):- आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो, हा दिवस म्हणजे जागतिक आरोग्य व कल्याण यावर ‘योग’ या प्राचीन संस्कृतीचा खोलवर असलेल्या प्रभावाचा दाखला आहे. भारतात हजारो वर्षांपूर्वी ‘योग’ ही प्राचीन कला उदयास आली, या कलेनं देशांच्या सीमांसह सांस्कृतिक सीमा देखील ओलांडल्या आहेत तसंच ही संस्कृती सर्वच स्तरातील लोकांमध्ये पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व, योगमुळे ऐक्य-सुसंवाद वाढवण्यास कशी मदत मिळते, जगभरातील नागरिक व समुदायांचे सर्वांगीण कल्याण कसे होऊ शकते, याबाबती माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा जन्म :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्र संघाने वर्ष २०१४ मध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. या प्रस्तावास संयुक्त राष्ट्रांतील सदस्य देशांकडून मिळालेला पाठिंबा म्हणजे योगाभ्यास ही संस्कृती शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक फायद्यांसह सर्वांगिण विकास असल्याची सार्वत्रिकरित्या मान्यता दर्शवते.
डॉ. हनी सावला, इंटर्नल मेडिसिन स्पेशलिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल ह्यांच्या मते शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगाचे खूप फायदे होतात जसे कि
1. शारीरिक फायदे : नियमित योगाभ्यास केल्यास शरीराची लवचिकता-सामर्थ्य वाढते. शरीराचे संतुलन व शरीराची ठेवण सुधारण्यास मदत मिळते. एकूणच आरोग्य निरोगी राहते आणि विविध आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
2. मानसिक फायदे : श्वासोच्छवासावरील नियंत्रण, ध्यानधारणेमुळे मेंदूचे आरोग्य निरोगी राहते, ताण-तणाव, चिंता कमी होते आणि भावनिक संतुलन राखण्यास योगमुळे मदत मिळते.
सजगता व आत्म-जागरूकतेसाठी फायदेशीर:
1. स्वतःशी जोडले जाणे : योगासनांच्या नियमित सरावामुळे आत्म-जागरूकता विकसित होते, आत्मनिरीक्षणासह एखाद्याचे विचार, भावना आणि कृतींचे सखोल आकलन वाढवण्यासही मदत मिळते.
2. दैनंदिन जीवनातील सजगता: योगची मूळ तत्त्व म्हणजे सजगता आणि वर्तमानात लक्ष केंद्रित करणे, योग एखाद्या व्यक्तीस परिपूर्ण आणि जागरूक जीवन जगण्यास सक्षम करते.
योगमुळे अंगी दयाळूपणा, सहानुभूती आणि करुणा या गुणांचा विकास होतो, तसेच योगसंस्कृती व्यक्तींना आसपास वावरणाऱ्या लोकांसह पर्यावरणाशीही सुसंवादी संबंध जोपासण्यासाठी प्रेरित करते. योग एखाद्या गोष्टीचा जागरूकपणे वापर करण्यास, निसर्गाप्रती असलेली जाणीव, निरोगी ग्रह तसंच निसर्गासह संतुलित स्व-अस्तित्व घडवण्यासही प्रोत्साहन देते.
योगमधील नावीन्य:
1..तांत्रिक प्रगती: योग आणि तंत्रज्ञान एकत्रित आल्याने योगाभ्यासाशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म, अॅप्स आणि व्हर्च्युअल क्लासेसची निर्मिती झाली आहे, ज्यामुळे जगभरातील लोकांना योग शिकणे अतिशय सोपे झाले आहे.
2. क्रीएटिव्ह पद्धती : योगमधील नाविन्यपूर्ण शैली
उदाहरणार्थ एरिअल योग, हॉट योग आणि
लाफ्टर योग अशा वेगवेगळे क्रीएटिव्ह प्रकार योगमध्ये पाहायला मिळत आहेत. याद्वारे योगशिक्षक ग्राहकांच्या-विद्यार्थ्यांच्या विविध महत्त्वपूर्ण गरजा- आरोग्यविषयक मागण्या पूर्ण करत आहेत, योगासनांचा सराव करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस व्यक्ती, समुदाय आणि राष्ट्रांना एकत्र आणण्यासाठी योगच्या शक्तीचे प्रतीक आहे. हा दिवस म्हणजे शारीरिक-मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी, सजगतेला चालना देण्यासाठी आणि जागतिक सुसंवादाची भावना जोपासण्यासाठी या प्राचीन संस्कृतीच्या परिवर्तनीय क्षमतेची आठवण करून देतो. हे जग आव्हांनाना मागे टाकून पुढे जात असताना, योगाभ्यासाचे शहाणपण स्वीकारल्यास आणि त्यातील नाविन्यपूर्ण प्रकार आत्मसात केल्यास निरोगी व संतुलित जीवन जगण्यास मदत मिळते आणि यामुळे जगात अधिकाधिक एकमेकांशी जोडले जाण्यासाठी तसंच दयाळूपणा वाढण्यासही योगाभ्यासामुळे प्रोत्साहन मिळते.
———————————————————————————————-
Be the first to comment on "21 जून, आंतरराष्ट्रीय योग दिन जगाला एकत्र आणणारा निरोगी,आरोग्यदायी मार्ग – डॉ. हनी सावला, इंटर्नल मेडिसिन स्पेशलिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल"