
From left Patient Prashant Yelawande, 56 with (Right) Dr. Gulshan Rohra, Cardiothoracic Surgeon, Wockhardt Hospitals, Mumbai Central.
मुंबई, 9 जून 2023 (GPN):- 56 वर्षांच्या प्रशांत येळवंडे हे केंद्रीय सरकारचे कर्मचारी असून त्यांना तब्येतीच्या विविध समस्यांनी ग्रासले होते. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करणे गरजेचे होते. प्रशांत यांना सुरुवातीला पाठीच्या खालच्या बाजूला वेदना होत होत्या. त्यांना चालतानाही बराच त्रास सहन करावा लागत होता. डॉ.बेहराम पार्डीवाला यांनी प्रशांत यांच्या काही चाचण्या करायला सांगितल्या होत्या. त्या चाचण्यांमध्ये प्रशांत यांच्या मणक्याच्या खालच्या बाजूला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले होते. अस्थिशल्यचिकीत्सकांच्या मते ही फार मोठी समस्या नव्हती, मात्र डॉ. पार्डीवाला यांना काहीतरी गडबड असल्याचं ठामपणे वाटत होतं. प्रशांत यांचा एमआरआय काढण्यात आला असता त्यांच्या सोवास (Sovas) मध्ये पू झाल्याचे निदान करण्यात आले. हा पू काढण्यात आला मात्र त्यानंतर प्रशांत यांना डाव्या खांद्याच्या खालच्या बाजूस दुखायला लागलं होतं. त्या भागातही पू झाल्याने त्यांना या वेदना होत होत्या असं नंतर निदान करण्यात आलं.
प्रशांत यांच्या शरीरात वारंवार संसर्ग का होतोय हे शोधून काढण्यासाठी डॉ. बेहराम पार्डीवाला, इंटर्नल मेडिसिन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल यांनी अधिकच्या चाचण्या करण्यास सांगितले. बारकाईने तपासणी केली असता ही हृदयातील ट्रायकसपीड झडपेची समस्या असल्याचं दिसून आलं (ही झडप त्यांच्या उजव्या बाजूला असलेल्या वरच्या कप्प्यातून खालच्या कप्प्याला होणारा रक्त पुरवठा नियंत्रित करण्याचे काम करते) या झडपेला संसर्ग झाल्याने हृदयातील एन्डोकारडायटिस नावाच्या स्तराला जंतूसंसर्ग झाला होता. ट्रायकसपीड झडपेला झालेला संसर्ग हा प्रशांत यांच्या समस्येचं मूळ होतं.
रुग्णाला प्रतिजैविके देऊन ट्रायकसपीड झडपेचा जंतूसंसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या उपायानंतरही शरीरातला संसर्ग नियंत्रणात येत नव्हता. यामुळे हृदयविकार शल्यचिकीत्सक डॉ.गुलशन रोहरा यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली. यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये असे दिसून आले की रुग्णाला हृदयाच्या धमनीचाही विकार आहे. यामुळे रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता.
डॉ. गुलशन रोहरा, कार्डिओथोरॅसिक सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल, यांनी सांगितले,” कि आम्ही रुग्णाचा संसर्गाची बाधा झालेला भाग काढून टाकला, ट्रायकसपीड झडप बदलली, हृदयाच्या उजव्या भागातील रक्तपुरवठा सुरळित केला व जाम झालेल्या धमन्यांना बायपास करून रक्तपुरवठा सुरळित करणे व हे सगळे उपाय शस्त्रक्रियेद्वारे करून आम्ही रुग्ण प्रशांत येळवंडे यांना होणाऱ्या त्रासापासून त्यांची मुक्ती केली. शस्त्रक्रियेनंतर प्रशांत यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून ते पूर्वीप्रमाणे हालचालीही विनासायास करू लागले आहेत. त्यांच्यावरील उपचार हे यशस्वी झाल्याची ही पावतीच म्हणता येईल. आमचे एकत्रित उपचार हे रुग्णाला उत्तम सेवा मिळावी आणि लवकर बरा व्हावा यादृष्टीने करण्यात आले होते.”
रुग्णावर केलेली शस्त्रक्रिया ही यशस्वी झाली.शस्त्रक्रियेच्या अवघ्या 48 तासांच्या आतच त्यांनी हालचाल करायला सुरुवात केली. औषधोपचारानंतर प्रशांत हे 45 दिवसानंतर रुग्णालयातून बाहेर पडले. मात्र रुग्णालयातून बाहेर पडत असताना त्यांच्यात नवचैतन्य संचारले होते. ते पूर्वीप्रमाणे विनासायास, विनात्रास हालचाल करू लागले होते आणि कोणत्याही त्रासाशिवाय ते नीटपणे चालू देखील लागले.
संसर्गामुळे रुग्णाच्या हृदयाला बरीच हानी पोहोचली असून, येत्या काळात रुग्णाला पेसमेकर बसवण्याची गरज पडू शकते. पेसमेकर केव्हा बसवायचा हे पुन्हा तपासणीनंतर कळू शकेल. डॉ.बेहराम पार्डीवाला आणि डॉ.गुलशन रोहरा यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रशांत येळवंडे यांच्या अतिशय गुंतागुंतीच्या त्रासाचे निदान आणि उपचार होणे शक्य झाले. अचूक निदान आणि शस्त्रक्रियेमुळे रुग्ण ठणठणीत झाला आणि त्याला पूर्वीप्रमाणे जीवन जगणे शक्य झाले.Ends
Be the first to comment on "एंडोकार्डिटीसच्या संसर्गामुळे झालेली गुंतागुंत आणि त्यावर जोखीमेची कार्डिअॅक शस्त्रक्रिया यामुळे एका पोस्टमनचा जीव वाचवण्यात यश मिळाले"