
Cube Highways Trust (“CHT”) Logo
१९ एप्रिल २०२३ (GPN)– कॅनेडियन पेन्शन इनव्हेस्टमेंट मॅनेजर ब्रिटिश कोलंबिया इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन (बीसीआय) आणि अबू धाबीचे सॉवरिन गुंतवणूकदार मुबादहा इनव्हेस्टमेंट कंपनी (मुबादला) आता भारतातील क्यूब हायवेज ट्रस्ट (सीएचटी) या इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट ट्रस्टचे (आयएनव्हीआयटी) नवे अँकर गुंतवणुकदार झाले आहेत.
क्यूब हायवे फंड अडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड या आयएनव्हीआयटीच्या गुंतवणूक व्यवस्थापक कंपनीने आपल्या संपूर्ण मालकीच्या कंपनीची ऑर्डिनरी युनिट्स खासगीरीत्या ५२,२५८.२७ दशलक्ष रुपयांना (C$ ६३० दशलक्ष डॉलर्स) ठेवत नोंदणी जाहीर केली आहे. आयएनव्हीआयटीकडे १८ टोल आणि वार्षिक पातळीवर निश्चित रक्कम देणाऱ्या एकूण १,४२३.६० किलोमीटर्स रस्ते मालमत्तेचा समावेश असलेला वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे. बीसीआय, मुबादला आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकदारांनी ऑर्डिनरी युनिट्सला सबस्क्राइब केले आहे.
आयएनव्हीआयटीकडे असलेल्या मालमत्तेच्या पहिल्या टप्प्यात १७ एनएचएआय टोल रस्ता मालमत्ता आणि एक एनएचएआय वार्षिक रक्कम देणाऱ्या रस्ते मालमत्तेचा समावेश आहे. ही रस्ते मालमत्ता ११ राज्यांत वसलेली असून त्यात आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तमिळ नाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. त्याशिवाय पहिला प्रस्ताव देण्याच्या अधिकाराअंतर्गत सीएचटीला सात हायवे मालमत्तेची पाइपलाइन उपलब्ध होण्याची संधी मिळू शकते.
क्यूब हायवेज फंड्स अडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेडचे स्वतंत्र संचालक श्री. यु के सिन्हा (आयएनव्हीआयटेच गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम करणारे) म्हणाले, ‘ही भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासातली विशेषतः आयएनव्हीआयटीसाठीची अतिशय महत्त्वाची घटना आहे. अशा प्रतिष्ठित गुंतवणुकदारांनी क्यूबमध्ये विश्वास दाखवल्याने कंपनी व तिच्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतेला पावती मिळाली आहे. संचालक मंडळ आणि क्यूबचा कर्मचारी वर्ग भागधारकांबरोबर काम करून मूल्यनिर्मिती करत राहाण्यासाठी उत्सुक आहे. अधिक समृद्ध आणि शाश्वत भविष्याकडे होत असलेल्या क्यूबच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे.’
आयएनव्हीआयटीने स्टेट बँक ऑफ इंडासह १०० अब्ज रुपयांचा (C$ १.२ अब्ज) सुविधा करार केला असून ही रक्कम प्राथमिक पोर्टफोलिओमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या कर्जाच्या पुनर्वित्तासाठी वापरली जाणार आहे.
आयएनव्हीआयटीला त्यांच्या कर्ज सुविधांसाठी तीन रेटिंग एजन्सीजद्वारे ‘प्रोव्हिजनल आयएनडी आयआयए/स्टेबल’ रेटिंग देण्यात आले असून या एजन्सीजमध्ये क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेड, आयसीआरए लिमिटेड आणि इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिडेट यांचा समावेश आहे. पोर्टफोलिओचे ट्रॅक रेकॉर्ड, रोख जमा करण्याची रचना (कॅश पुलिंग स्ट्रक्चर), भौगोलिक वैविध्यता, डेट संरक्षक उपाययोजना आणि अनुभवी व्यवस्थापन टीम यांची दखल घेत हे रेटिंग देण्यात आले आहे.
बीसीआयमधील इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिन्यूएबल रिसोर्सेस विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक झमन वेलजी म्हणाले, ‘बीसीआयची क्यूब हायवेमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक ही कंपनी सेवा देत असलेल्या समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करण्याच्या दीर्घकालीन धोरणाशी सुसंगत आहे. त्याशिवाय या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधा क्षेत्र आणि भारतातील आमची गुंतवणूक तसेच कामकाज विस्तारण्यास मदत होतील व पर्यायाने भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लावणे बीसीआयला शक्य होईल. सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्मिती करण्यासाठी क्यूब हायवेजसह काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
मुबादलाच्या पारंपरिक पायाभूत सुविधा विभागाचे कार्यकारी संचालक सईद अरार म्हणाले, ‘रस्ते क्षेत्रात भारतात विकासाच्या विलक्षण संधी उपलब्ध आहेत तसेच इथे पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी चांगले नियमन केलेली बाजारपेठ अस्तित्वात आहे. १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम रस्ते बांधकाम उपक्रमासाठी आणि २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी आगामी संपादनासाठी ठेवणारी क्यूब हायवेज हा मुबादलासाठी रस्ते क्षेत्रात गुंतवणूक करून या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेण्यासाठी अगदी योग्य प्लॅटफॉर्म आहे. जबाबदार गुंतवणूकदार या नात्याने आम्हाला क्यूब हायवेजसह काम करताना आणि भारताच्या रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्राच्या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देत देशाला सामाजिक- आर्थिक लाभ मिळवून देताना आनंद होत आहे.’
क्यूब हायवेजविषयी
क्यूब समूह हा १०० टक्के संस्थात्मक मालकीचा प्लॅटफॉर्म असून त्याला वैविध्यपूर्ण गुंतवणुकदारांचे पाठबळ लाभलेले आहे. त्यात आय स्क्वेयर्ड कॅपिटल ही अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आणि जपान हायवेज इंटरनॅशनल बीव्ही यांचा समावेश आहे. ही कंपनी देशाच्या हायवे क्षेत्रात पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) राबवण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने हायवे प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यात कार्यरत आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या : www.cubehighwaystrust.com
ब्रिटिश कोलंबिया इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन (बीसीआय)
बीसीआय ही कॅनडामधील सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकदारांपैकी एक असून ३१ मार्च २०२२ अखेरीस कंपनीचे २११.१ अब्ज डॉलर्स व्यवस्थापनाअंतर्गत आहेत. व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे स्थित असलेल्या या कंपनीची कार्यालये व्हँकूव्हर आणि न्यू यॉर्क शहरात आहेत. बीसीआयद्वारे निश्चित उत्पन्न आणि खासगी कर्ज, सार्वजनिक आणि खासही इक्विटी, पायाभूत सिविधा आणि अक्षय स्त्रोत, स्थावर मालमत्ता इक्विटी आणि रियल इस्टेट कर्ज इत्यादी क्षेत्रा त गुंतवणूक करते. जागतिक दृष्टीकोन बाळगणारी ही कंपनी बचतीचे उत्पादनक्षम भांडवलात करण्यासाठी पूरक गुंतवणूक संधींच्या शोधात असते व त्याद्वारे ग्राहकांची जोखीम आणि परताव्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर कंपनीचा भर असतो.
बीसीआयच्या पायाभूत सुविधा आणि अक्षय स्त्रोत प्रोग्रॅमचे मूल्य C$२०.२ अब्ज असून कंपनीच्या दीर्घकालीन मालमत्तेमध्ये रेग्युलेटेड युटिलिटीज, उर्जा, दूरसंचार आणि वाहतूक अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यात केल्या थेट गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा समावेश आहे. बीसीआय स्थिर आणि प्रगल्भ रेग्युलेटरी वातावरणात काम करणाऱ्या, भविष्यकालीन भांडवल गुंतवणुकीच्या संधी देणाऱ्या आणि आमच्या ग्राहकांसाठी स्थिर परतावे आणि रोख उत्पन्नाची निर्मिती करू शकणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. हा प्रोग्रॅम उत्तर अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि दक्षिण अमेरिका येथे विस्तारलेला आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या: bci.ca
मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीविषयी
मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी ही सॉव्हरिन गुंतवणूकदार कंपनी असून अबू धाबीच्या सरकारसाठी शाश्वत आर्थिक परताव्यांची निर्मिती करणे हे तिचे ध्येय आहे.
मुबादलाचा २८४ अब्ज डॉलर्सचा (एईडी १०४५ अब्ज) पोर्टफोलिओ सहा खंडांतील विविध क्षेत्रे आणि मालमत्ता विभागांत विस्तारलेला आहे. विविध क्षेत्राची आम्हाला असलेली जाण आणि दीर्घकालीन भागिदारींचा उपयोग करून आम्ही शाश्वत विकास आणि नफ्याला चालना देतो तसेच संयुक्त अरब अमिरातीचे सातत्यपूर्ण वैविध्य आणि अर्थव्यवस्थेच्या जागतिक एकत्रीकरणाला बळ देतो.Ends
Be the first to comment on "क्यूब हायवेज ट्रस्टची भारतात नोंदणी"