
Ms. PV Sindhu along with Ajay K Khurana,ED, Bank of Baroda at Bank of Baroda Sun Run 2.0 in Mumbai today
मुंबई, 29 जानेवारी, 2023 (GPN): बँक ऑफ बडोदा सन रन 2.0 आज मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये संपन्न झाला. भारताची बॅडमिंटन सुपरस्टार तसेच बँक ऑफ बडोदा’चे ब्रँड एंडोर्सर माननीय पीव्ही सिंधू आणि बँक ऑफ बडोदाच्या उच्च व्यवस्थापनासह श्री अजय के खुराना, कार्यकारी संचालक, श्री देबदत्त चंद, कार्यकारी संचालक आणि श्री ललित त्यागी, कार्यकारी संचालक या प्रमुख मान्यवरांनी कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी 3500 हून अधिक व्यक्तिंनी कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याने वातावरणात आनंद आणि उत्साहाचा संचार होता. सन रन 2.0 शर्यतीत दोन प्रकार समाविष्ट होते -10 किलोमीटर अंतराची बीओबी प्रो रन आणि 5 किलोमीटरची नॉनटाइम बीओबी फन रन, सोबतच इतर अनेक आकर्षक क्रियाकलापांव्यतिरिक्त झुंबा सत्र आणि गायक, गीतकार आणि संगीतकार प्रवीर बारोट यांच्या लाईव्ह बँड परफॉर्मन्समुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.
10 किलोमीटर शर्यतीत पुरुष आणि महिला वर्गवारीचे सर्वोच्च 3 विजेते खालीलप्रमाणे:
वयोगट: 45 वर्षांपर्यंत | वयोगट: 45 वर्षे आणि त्यावरील | |||
पुरूष | महिला | पुरूष | महिला | |
विजेते | सुशांत जेधे
|
प्राजक्ता शिंदे | आरबीएस मोनी | डॉ इंदू टंडन |
प्रथम उप-विजेते | बबन शिंदे | अमृता पटेल | समीर मांजरेकर | प्रतिभा नाडकर |
द्वितीय उप-विजेते | देवेंद्र चौधरी | साक्षी जड्याल | शिवानंद शेट्टी | डी वंदना चंद्रन |
विजेत्यांकरिता रोख बक्षिसे तर सर्व सहभागींना पदक आणि ई-प्रमाणपत्र मिळाले.
|
Be the first to comment on "बँक ऑफ बडोदा सन रन 2.0 शर्यतीचा उत्साह मुंबईकरांत शिगेला !"